दीपक मोहिते,
” फ्रंटलाईन,”
पालघर जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता जि.प.व आठ प.स.वर महायुतीचेच वर्चस्व राहणार आहे…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या एकूण तीन टप्यात होणार असल्याचे निवडणूक आयोगातर्फे नुकतेच स्पष्ट करण्यात आले आहे.पहिल्या टप्यात जिल्हा परिषदा / पंचायत समित्या,दुसऱ्या टप्यात नगरपरिषदा / नगर पंचायती व तिसऱ्या टप्यात महानरपालिका यांच्या निवडणुका होणार आहेत.पहिल्या टप्यात जिल्हा परिषदेच्या ५७ व आठ पंचायत समित्याच्या एकूण ११४ जागासाठी सर्वप्रथम निवडणुका होतील.विसर्जित जिल्हा परिषदेत भाजप – सेना ( शिंदे गट ) महायुतीचे वर्चस्व होते.आगामी निवडणुकीतही त्यांचेच वर्चस्व राहील,असा अंदाज आहे.
जिल्हा परिषद व आठ पंचायत समितीच्या तालूकानिहाय जागा…
१ ) पालघर तालुका – जिल्हा परिषद गट – १७,
पं.स.-३४,
२ ) वसई तालुका – जिल्हा परिषद गट – ०४,
पं.स.-०८,
३ ) तलासरी तालुका – जिल्हा परिषद गट – ०५
पं.स.- १०,
४ ) वाडा तालुका – जिल्हा परिषद गट -०६,
पं.स.- १२,
५ ) मोखाडा तालुका – जिल्हा परिषद गट – ०३,
पं.स.- ०६,
६ ) जव्हार तालुका – जिल्हा परिषद गट – ०४,
पं.स.- ०८,
७ ) डहाणू तालुका – जिल्हा परिषद गट – १३,
पं.स.- २६,
८ ) विक्रमगड तालुका – जिल्हा परिषद गट -०५,
पं.स.- १०,
पालघर जिल्हा परिषद एकूण गट – ५७,
पालघर जिल्ह्यातील ०८ पंचायत समितीचे एकूण गण – ११४,
news 27.in media निवडणूक अंदाज,
निवडणुकीनंतर जिल्हापरिषदेत अशी स्थिती निर्माण होऊ शकते.
भाजप – १४,
शिवसेना शिंदे गट – १८,
शिवसेना ( उबाठा ) – १२,
मार्क्स.कम्यु.- ०३,
बविआ – ०३,
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – ०२,
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – ५,
पंचायत समिती निवडणुकीनंतर निर्माण होणारे राजकीय पक्षाचे वर्चस्व…
१ ) तलासरी – भाजप,
२ ) मोखाडा – शिवसेना शिंदे गट,
३ ) जव्हार – भाजप,
४ ) वाडा – भाजप,*
५ ) विक्रमगड – भाजप,
६ ) डहाणू – भाजप,
७ ) पालघर – शिवसेना शिंदे गट,
८ ) वसई – भाजप – बविआ,समसमान संधी,
*वसई पंचायत समिती अधांतरीत होण्याची दाट शक्यता,*
या निवडणुकीपूर्वी आयाराम गयारामाना वेग आला तर मात्र निवडणुकीचे अंदाज विस्कळीत होण्याची शक्यता आहे.पालघर तालुक्यात जो राजकीय सर्वाधिक जागा जिंकेल,त्या पक्षाचा झेंडा जिल्हा परिषदेवर फडकेल.या निवडणुकीत भाजप व सेना, ( शिंदे गट ) एकत्रितपणे लढले तर महायुतीचे जिल्हा परिषदेवर हमखास सत्ता येईल.ते एकत्र लढल्यास शिवसेनेला ( उबाठा ) जबर फटका बसू शकतो. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राष्ट्रवादी ( शरद पवार ) राष्ट्रवादी ( अजित पवार ) बहुजन विकास आघाडी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,या पाच राजकीय पक्षांकडे कणखर नेतृत्व नसल्यामुळे या पक्षांना भरीव कामगिरी करणे,अशक्य आहे. गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेना वगळता बविआ, काँग्रेस,राष्ट्रवादी ( शरद पवार ) या पक्षांना भरीव कामगिरी करता आली नाही. या जिल्ह्यात राष्ट्रवादी ( अजित पवार ) गटाचे अस्तित्व असुन नसल्यासारखे आहे. त्यामुळे हा पक्ष साधी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवण्याच्या फंदात पडत नाही.तसेच बोईसर विधानसभा मतदारसंघातील वसईचा भाग वगळता पालघर जिल्ह्यात बहुजन आघाडीला बिलकुल जनाधार नाही. २००९,२०१४ व २०१९ या तीनही निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला वसईतील मतदारांनी तारले. पण २०२४ च्या निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व उमेदवार विलास तरे यांनी ठाकुरांचा हा बालेकिल्ला उध्वस्त केला. वसई तालुका वगळता बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पक्षाचा विस्तार करण्यासंदर्भात तसेच लोकांच्या प्रश्नाकडे कायम दुर्लक्ष केल्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांनी इव्हिएम मशीनमधून आपला रोष व्यक्त केला.दारुण पराभव झाल्यानंतरही याविषयी आत्मपरीक्षण करण्यास त्यांचे नेते तयार नाहीत.त्यामुळे जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत फारसा प्रभाव नसेल. तसेच त्यांच्या पक्षाच्या धडाडीच्या नेत्या मनिषा निमकर यांनी शिंदे गटाची वाट धरली व प्रवीण राऊत हे देखील बाजूला झाल्यामुळे बविआ सध्या अत्यंत क्षीण झाली आहे.आजच्या घडीला शिंदे गट सर्वच बाबतीत सक्षम असुन भाजपसोबत मैत्रीपूर्ण लढत झाली तरी जिल्हा परिषदेत तो क्रमांक १ चा पक्ष असू शकतो.

