Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” वास्तवाचे भान,” निसर्गाचे संवर्धन ही काळाची गरज, दरवर्षी जगभरात जागतिक निसर्ग संवर्धन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो.यंदाची थीम आहे,” लोक व हिरवाई यांच्यामध्ये समन्वय साधणे, निसर्ग संवर्धनात डिजिटल प्रक्रियेला प्राधान्य देणे,” हा दिवस साजरा करण्यामागे निसर्ग व पर्यावरणाचे महत्व लोकांना कळावे,असा आहे.निकोप पर्यावरण हा निरोगी व मानवी जीवनाचा स्थिर पाया आहे,हे मान्य करण्यासाठी जगभरातील देशात जनजागृती मोहिमा राबवण्यात येत असतात.त्यामागे नैसर्गिक वातावरणातून नामशेष होणारे प्राणी व वृक्षसंपदा वाचवणे,असा उद्देश आहे.पृथ्वी वाचवण्यात पाणी,हवा,माती,ऊर्जा, खनिजे,वृक्षसंपदा,प्राणी व पक्षी जगवण्यासाठी नैसर्गिक संसाधनाच्या संवर्धनाची नितांत गरज आहे.पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो,त्यामुळे सध्या आपण ग्लोबल वॉर्मिंग,विविध प्रकारचे आजार,वातावरणात होणारे धोकादायक बदल,अवकाळी…

Read More

पालघर, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे.जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १४४७.९ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.गेल्या वर्षी १८०८.३ मि.मी.पाऊस पडला होता. गेल्या पंधरा दिवसापासून सलग पडणाऱ्या पावसाने काल दिवसभर विश्रांती घेतल्यानंतर आज सकाळी पुन्हा हजेरी लावली.सकाळी दोन तास पावसाने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले.जिल्ह्यातील वैतरणा धरण सोडल्यास धामणी,मोडकसागर ही धरणे,कवडास,वांद्री हे बंधारे,विरार पूर्वेस असलेली उसगाव व पेल्हार ही छोटी धरणे तुडुंब भरली.तर सूर्या, पिंजाळ व देहर्जे या नद्यांच्या पाण्याची पातळी सतत वाढत आहे.काही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.पुन्हा जोरदार वृष्टी झाल्यास पाण्याच्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे प्रशासनाने या नद्यांच्या…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” सूर्य देखील खुदकन हसला असेल, पाच दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुणे येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली होती.त्याच्या या टीकेला खा.सुप्रिया सुळे यांनी सडेतोड उत्तर दिले होते.त्यानंतर शरद पवार यांनीही अमित शहा यांना त्याच भाषेत पलटवार केला.शरद पवार हे कधीही कोणावर वैयक्तिक पातळीवर उतरून टीका करत नाहीत.पण अमित शहा यांनी ज्या भाषेत त्यांना लक्ष्य केले,त्यामुळे त्यांनी आपला संयम सोडला व शहा यांना चांगलेच फैलावर घेतले.शरद पवार यांनी केलेला पलटवार हा ” ऍक्शनवर रीऍक्शन,” अशा सदरात मोडणारा आहे.या सर्व घडामोडींवर आता भाजपचे बोलघेवडे प्रवक्ते अकलेचे तारे तोडू लागले आहेत.देवेंद्र फडणवीस यांच्या…

Read More

शासनाच्या महत्वकांक्षी योजना जनतेपर्यंत पोहोचवा- पालकमंत्री चव्हाण, पालघर, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना,मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना,मुख्यमंत्री वयोश्री योजना,मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना व इतर महत्त्वाच्या योजना राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी योजना असून त्या नागरिकापर्यंत पोहोचवाव्यात,असे निर्देश सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. महसूल सप्ताहाच्या माध्यमातून नागरिकांनी आपली प्रलंबित कामे पूर्ण करून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा,असे आवाहन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी यावेळी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहामध्ये महसूल सप्ताहाचा शुभारंभ पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम,खा.डॉ.हेमंत सवरा, आ.श्रीनिवास वनगा,सुनील भुसारा,जिल्हाधिकारी गोविंद बोडके,वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल…

Read More

पालघर, बोईसर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे डबे घसरले, आज दुपारी बोईसर रेल्वे स्थानकाजवळ एका मालगाडीचे चार डबे रुळावरून अचानक घसरले.मात्र या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.दुर्घटनेची खबर मिळताच रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी येवून पाहणी केली. आज दुपारच्या सुमारास बोईसर रेल्वे स्थानकातून धीम्या गतीने जाणाऱ्या मालगाडीचे चार डबे अचानक घसरले.गाडीचा वेग कमी असल्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही.तसेच उपनगरीय सेवेवर त्याचा कोणताही परिणाम जाणवला नाही.उपनगरीय सेवा सुरळीत सुरू होती.मात्र लांब पल्ल्याच्या गाड्या थोड्या विलंबाने धावत होत्या.मालगाडीचा वेग कमी असल्यामुळे रेल्वेचे कोणतेही नुकसान झाले नाही,तसेच जीवितहानीही झाली नाही.या घटनेनंतर रेल्वेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घसरलेले डबे पूर्वपदावर आणण्याचे काम…

Read More

दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” आ.बाबाजानी दुरानी लवकरच शरद पवार गटात, अजित पवार गटाचे आ.बाबाजानी दुरानी यांनी महायुतीमध्ये काम करताना अवघडल्यासारखे वाटते.विचारात फरक पडल्यामुळे आपण पक्षावर ( अजित पवार गट ) नाराज असल्याचे स्पष्ट केले आहे.काल त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्या पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली.त्यांचे अजित पवार गटाला ” जय महाराष्ट्र,” करणे,हा अजित पवार गटाला मोठा झटका असल्याचे मानण्यात येते आहे. आ.बाबजानी दुरानी हे अजित पवार गटाचे परभणी जिल्हाध्यक्ष आहेत.या अगोदर त्यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली होती.तेंव्हापासून ते पुन्हा स्वगृही परततील,अशी चर्चा सुरू झाली होती.ते विधान परिषदेचे सदस्य असून लवकरच त्यांचा कार्यकाळ…

Read More

दीपक मोहिते, ” व्यक्तीविशेष,” पंकजा मुंडे ; अखेर राजकीय वनवास संपला, गेल्या महिन्यात माजी मंत्री व स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार पंकजा मुंडे यांचा सात वर्षाचा राजकीय वनवास संपुष्टात आला.देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ग्रामविकासमंत्री पदावर असताना त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने त्यांना प्रदीर्घ वनवास भोगावा लागला होता.ते वक्तव्य काय होते ते पहा,त्यावेळी त्या म्हणाल्या,” मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल,” या त्यांच्या एका वाक्यानंतर भाजपमधील अदृश्य शक्ती सक्रिय झाल्या व त्यांनी पंकजा मुंडे यांना हा राजकीय वनवास घडवून आणला.मंत्रीपदाच्या काळात त्यांच्यावर विद्यार्थ्यांच्या चिक्की खरेदीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला होता.त्यावेळी विरोधकांना माहिती पुरवणारे कोण होते,हे जगजाहीर आहे.त्यामुळे येथे त्यांचे नाव घेणे योग्य होणार नाही.२०१९…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” राज्य दिवाळखोरीच्या वाटेवर, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारतर्फे प्रस्तावित करण्यात आलेली ” लाडकी बहीण,” योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.या योजनेला राज्याच्या वित्त विभागाने विरोध केला होता,असे उघडकीस आले आहे.पण सरकारने ती कार्यान्वित करून स्वतःचा अट्टाहास पूर्ण केला आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात राज्याच्या डोक्यावर असलेला ८ कोटी रु.चा बोझा हा दहा लाख कोटीच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे.शासन जाहीर करत असलेल्या योजनांसाठी पैसा आणायचा कुठून ?अशा संकटात वित्त विभाग सापडला आहे. या योजनेला लागणारा पैसा आणणार कुठून असा प्रश्न विचारत एका वित्त अधिकाऱ्याने ही योजना व्यवहार्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.राज्य सरकारला हा एकप्रकारे ” घरचा आहेर,” मिळाला आहे.तर अनेक अर्थतज्ञानी…

Read More

विवा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीला नॅकचे ” बी ++,” मानांकन, पालघर, विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित तसेच मुंबई विद्यापीठ संलग्नित विवा इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी, विरार कॉलेजने राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यापन परिषद ” नॅक,” च्या प्रथम मूल्यांकनामध्ये २.८४ सीजीपीए गुणांकनासह ” बी प्लस प्लस,” (बी++) मानांकन प्राप्त केले आहे. बी.फार्मसी हा अभ्यासक्रम वर्ष २०१० सुरू करण्यात आला, त्यानंतर फार्मसीला मिळालेल्या वाढत्या प्रतिसादामुळे २०१३ साली स्वतंत्रपणे विवा इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी या महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली.अशीच प्रगती करत असताना २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी संख्या ६० वरून १०० इतकी वाढवून मिळाली. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात एम्. फार्मसी फार्माकोलॉजी हा विषय घेऊन अभ्यासक्रम देखील…

Read More

दिपक मोहिते, आ.हितेंद्र ठाकूर पुन्हा रिंगणात असतील…! पळा पळा कोण पुढे पळे तो..! आगामी विधानसभा निवडणुकीत वसई व नालासोपारा मतदारसंघात अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने या दोन्ही मतदारसंघात तुफान बॅटिंग केल्यामुळे भाजपमध्ये इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी झालेली पाहायला मिळते.तर याच निवडणुकीत शिवसेनेच्या ( उबाठा ) भारती कामडी यांनीही लक्षणीय मते मिळवत दुसरा क्रमांक मिळवला.त्यामुळे महाविकास आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेनेच्या ( उबाठा ) अनेक इच्छुकांनी उमेदवारी मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. वसई व नालासोपारा विधानसभा हे दोन्ही मतदारसंघ आ.हितेंद्र ठाकूर यांचे गड असून २००९ चा एकमेव अपवाद वगळता अन्य सर्व निवडणुकांमध्ये आ.ठाकूर यांचे कायम…

Read More