दीपक मोहिते,
” वास्तवाचे भान,”
निसर्गाचे संवर्धन ही काळाची गरज,
दरवर्षी जगभरात जागतिक निसर्ग संवर्धन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो.यंदाची थीम आहे,” लोक व हिरवाई यांच्यामध्ये समन्वय साधणे, निसर्ग संवर्धनात डिजिटल प्रक्रियेला प्राधान्य देणे,”
हा दिवस साजरा करण्यामागे निसर्ग व पर्यावरणाचे महत्व लोकांना कळावे,असा आहे.निकोप पर्यावरण हा निरोगी व मानवी जीवनाचा स्थिर पाया आहे,हे मान्य करण्यासाठी जगभरातील देशात जनजागृती मोहिमा राबवण्यात येत असतात.त्यामागे नैसर्गिक वातावरणातून नामशेष होणारे प्राणी व वृक्षसंपदा वाचवणे,असा उद्देश आहे.पृथ्वी वाचवण्यात पाणी,हवा,माती,ऊर्जा,
खनिजे,वृक्षसंपदा,प्राणी व पक्षी जगवण्यासाठी नैसर्गिक संसाधनाच्या संवर्धनाची नितांत गरज आहे.पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो,त्यामुळे सध्या आपण ग्लोबल वॉर्मिंग,विविध प्रकारचे आजार,वातावरणात होणारे धोकादायक बदल,अवकाळी पाऊस, ग वादळे इ.समस्यांना तोंड देत आहोत.येणाऱ्या पिढीला चांगले जीवन जगता यावे,यासाठी निकोप निसर्गाचे संगोपन करणे,ही आता काळाची गरज ठरली आहे.निसर्गाचा कोप कसा असतो,याचा अनुभव आपण गेल्या काही वर्षात अनेकदा घेतला आहे.त्यामुळे निसर्गाचे संवर्धन ही चळवळ होणे,आवश्यक आहे.

