पालघर,
बोईसर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे डबे घसरले,
आज दुपारी बोईसर रेल्वे स्थानकाजवळ एका मालगाडीचे चार डबे रुळावरून अचानक घसरले.मात्र या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.दुर्घटनेची खबर मिळताच रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी येवून पाहणी केली.
आज दुपारच्या सुमारास बोईसर रेल्वे स्थानकातून धीम्या गतीने जाणाऱ्या मालगाडीचे चार डबे अचानक घसरले.गाडीचा वेग कमी असल्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही.तसेच उपनगरीय सेवेवर त्याचा कोणताही परिणाम जाणवला नाही.उपनगरीय सेवा सुरळीत सुरू होती.मात्र लांब पल्ल्याच्या गाड्या थोड्या विलंबाने धावत होत्या.मालगाडीचा वेग कमी असल्यामुळे रेल्वेचे कोणतेही नुकसान झाले नाही,तसेच जीवितहानीही झाली नाही.या घटनेनंतर रेल्वेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घसरलेले डबे पूर्वपदावर आणण्याचे काम सुरू केले.

