दिपक मोहिते,
” हल्लाबोल,”
आ.बाबाजानी दुरानी लवकरच शरद पवार गटात,
अजित पवार गटाचे आ.बाबाजानी दुरानी यांनी महायुतीमध्ये काम करताना अवघडल्यासारखे वाटते.विचारात फरक पडल्यामुळे आपण पक्षावर ( अजित पवार गट ) नाराज असल्याचे स्पष्ट केले आहे.काल त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्या पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली.त्यांचे अजित पवार गटाला ” जय महाराष्ट्र,” करणे,हा अजित पवार गटाला मोठा झटका असल्याचे मानण्यात येते आहे.
आ.बाबजानी दुरानी हे अजित पवार गटाचे परभणी जिल्हाध्यक्ष आहेत.या अगोदर त्यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली होती.तेंव्हापासून ते पुन्हा स्वगृही परततील,अशी चर्चा सुरू झाली होती.ते विधान परिषदेचे सदस्य असून लवकरच त्यांचा कार्यकाळ संपणार आहे.तो संपला की. ते शरद पवार गटात सहभागी होणार आहेत.काल त्यांच्या मोठ्या मुलानेही शरद पवारसोबत एका कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती.त्यांचा हा निर्णय अजित पवार गटाला मोठा धक्का मानण्यात येतो.पक्षाचा मराठवाड्यातील मुस्लिम चेहरा म्हणून त्यांची ओळख होती.त्यांच्या जाण्याने मराठवाड्यातील अनेक जागांवर अजित पवार यांच्या गटाला फटका बसेल,अशी शक्यता व्यक्त व्यक्त करण्यात येत आहे.

