- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
- डोनाल्ड ट्रम्प ; … तर असा मित्र नसलेलाच बरा,
- पूर्वी कार्यकर्त्यांची ओळख ” पायपुसणी, ” अशी होती, आता ” अंधभक्त,” अशी झाली आहे…
- ममता बॅनर्जी यांचा उद्धव ठाकरे होणार…
- अपेक्षेप्रमाणे सेनेचे रविंद्र फाटक यांनी बाजी मारली,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, संपादकीय पानासाठी लेख, आमची मान शरमेने खाली गेली.. बदलापूर येथे घडलेल्या घटनेने महाराष्ट्राची मान शरमेने झुकली गेली.या घटनेमध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद असून त्यांनी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्यामुळे बदलापूरकरांचा संताप अनावर झाला व जमाव बेकाबू होत गेला.जमावाचा आवेश बघून पोलीस व अन्य शासकीय यंत्रणा हतबल झाल्या होत्या.सकाळी नऊच्या सुमारास सुरू झालेले रेलरोको आंदोलन तब्बल सात ते आठ तास सुरू होते.जमाव इतका प्रक्षुब्ध झाला होता कि आरोपीला आमच्या ताब्यात द्या किंवा त्याला भररस्त्यात फाशी द्या, मागणी लावुन धरली होती.ही घटना घडल्यानंतर सुमारे सात दिवसांनी आंदोलन झाले,त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.काही राजकीय शक्तींनी एकत्र येऊन हे आंदोलन भडकवले,असा आरोप करण्यात…
दीपक मोहिते, भयावह स्थिती, निवडणूक पुढे ढकलणे ; ” आजचे मरण उद्यावर,” केंद्रीय निवडणूक आयोगाने झारखंड व महाराष्ट्र विधानसभा निवडणुका एक महिना पुढे ढकलल्या आहेत.वास्तविक या निवडणुकाही जम्मू-काश्मीर व हरियाणा या दोन राज्यासोबत होणे गरजेचे होते.पण केंद्र सरकारच्या दबावाखाली आयोगाने हा निर्णय घेतला आहे.या निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात आयोगाने जी कारणे सांगितली आहेत, ती हास्यास्पद तर आहेतच पण त्यांच्या स्वायतत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहेत. केंद्रीय निवडणुकीची गेल्या १० वर्षाची वाटचाल ही कायम वादाच्या भोवऱ्यात सापडली.त्यांची प्रत्येक कृती ही विशिष्ट पक्षाकडे झुकणारी राहिली.त्यामुळे या संस्थेची विश्वासार्हता धोक्यात आली आहे.१९९० पूर्वी निवडणूक आयोग हे काँग्रेसच्या कलेनुसार वागत होते.पण आयोगाच्या मुख्य आयुक्तपदी टी.एन.शेषन यांची…
दीपक मोहिते, सूर्यातीर, सरकारने आमच्या पाठीशी उभे राहावे,मच्छिमार समाजाची अपेक्षा, अडीच महिन्याच्या विश्रांतीनंतर उद्यापासून मासेमारीचा हंगाम पुन्हा सुरू होत आहे.त्यामुळे समुद्रकिनारी असलेल्या मच्छिमार गावांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.दरवर्षी १ जून ते नारळी पौर्णिमे दरम्यान सरकार सक्तीची बंदी लादत असते.पावसाळ्यात होणारी मासेमारी व्यवसायाला मारक तर असते.कारण हा कालावधी माश्याचा प्रजनन काळ असतो.तसेच समुद्रातील वादळी हवामान मच्छीमारांच्या जीवावर उठणारे असते.त्यामुळे सरकार दरवर्षी खोल समुद्रातील मासेमारीवर बंदी घालत असते.सरकारच्या या निर्णयाला मच्छिमार संघटनांचा एकमुखी पाठिंबा मिळतो,कारण या निर्णयामागे सरकारचा हेतू हा प्रामाणिक आहे. गेल्या काही वर्षात समुद्रात प्रदूषण,वादळी हवामान,अन्य राज्यातील मासेमारी बोटींचे आक्रमण,वाढते तेलक्षेत्र व भर समुद्रात प्रकल्प उभारणे,इ.कारणामुळे मत्स्यउत्पादनावर चांगलाच परिणाम होत गेला.…
दीपक मोहिते, फ्रंटलाईन, अजित पवार यांना पुणे जिल्ह्यात भाजपकडून ” घरचा आहेर,” अजित पवार गट व भाजपमध्ये गळती सुरू झाली आहे.सिंदखेडराजाचे आ.शिंगणे हे पुन्हा शरद पवार गटात जाण्याची शक्यता आहे.मी नाईलाजास्तव अजित पवार यांच्यासोबत गेल्याचे त्यांनी नुकतेच माध्यमांना सांगितले.त्यानंतर अवघ्या आठ तासात आ.पंकजा मुंडे यांच्या जवळच्या समर्थकांनी मराठा नेते जरांगे पाटील यांची भेट घेऊन उमेदवारी मागितली आहे.त्यामुळे लवकरच अनेक जण महायुतीला राम राम ठोकून परतीच्या प्रवासाला लागतील,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील राजकीय वातावरण महायुतीला पोषक नाही,हे लक्षात घेऊन महायुतीचे आमदार,पदाधिकारी व कार्यकर्ते आता ” सुबहका भुला,शामको घर लौटा,” च्या तयारीत आहेत. अजित पवार गटाला सोबत घेतल्यापासून महायुतीमध्ये सुंदोपसुंदीला…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” लाडक्या बहिणी,लबाड भावंडाना ओवाळतील असे वाटत नाही… राज्यात ” मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी,” योजनेचा सध्या प्रचंड डंका पिटण्यात येत आहे.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार,हे तिघे राज्यातील इतर सर्व प्रश्न संपल्यात जमा असल्याच्या आवेशात या योजनेच्या प्रचारात उतरले आहेत.ही योजना पुढेही चालू राहणार,उलट बहिणींना मिळणाऱ्या रकमेत आणखी वाढ होणार आहे,मात्र त्यासाठी बहिणींनी आम्हाला पुन्हा संधी दिली पाहिजे,बटन दाबले पाहिजे,असे कोकलत सुटले आहेत.मुख्यमंत्री शिंदे यांनी तर बहिणीच्या हिताच्या आड येणाऱ्यांना जोडा दाखवा,असे आवाहन केले.एक मुख्यमंत्री इतक्या खालच्या पातळीवर येऊन अशाप्रकारचे बेलगाम वक्तव्य करतो,हे राज्याच्या राजकारणाच्या इतिहासात प्रथमच घडत आहे.तर फडणवीस हे ” बहिणींच्या अर्जावर विरोधकांनी…
वसई, वसई येथे परिवहन कार्यालयाचे भूमिपूजन संपन्न, उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे घोंगडे खूप वर्षांपासून भिजत पडले होते.या प्रश्नी वसईचे आ.हितेंद्र ठाकूर यांनी सतत पाठपुरावा केल्यानंतर अखेर हा प्रश्न मार्गी लागला. १५ वर्षांपूर्वी नव्याने विरार पूर्व भागात सुरू झालेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला जागा अपुरी पडत होती. दररोज हजारो नागरिक आपली वाहने घेऊन विरारच्या कार्यालयात विविध कामासाठी येत असतात,त्यामुळे अवघ्या तीन वर्षात सदर जागा अपुरी पडू लागली.त्यानंतर हे कार्यालय वसई येथे व्हावे,अशी मागणी होऊ लागली.या सर्व घडामोडीनंतर आ.हितेंद्र ठाकूर यांनी हा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारी मांडला.त्यांच्या प्रयत्नाला यश आले.वसई पूर्व भागात जागा उपलब्ध करण्यात आली.काल त्याचे भूमिपूजन पार पडले.या समारंभास पालकमंत्री रविंद चव्हाण,खा.डॉ…
दीपक मोहिते, वास्तव, पाण्याच्या शोधात बिबट्यांचा शहरी भागात मुक्तवावर, गेल्या काही वर्षात बिबट्याचा मनुष्यवस्तीमध्ये मुक्त वावर सुरू झाला आहे.मध्यंतरी भाईंदर,चेना ब्रिज व आता वाडा तालुक्यात काही बिबट्यांचा वावर पाहायला मिळाला. एरवी बिबट्यांचे दर्शन दुर्लभ असताना हे बिबटे डोंगर कपारी व जंगलातून खाली का उतरू लागले आहेत ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.पर्यावरण,प्रदूषण व मानवाचा हव्यासपणा,अशी तीन कारणे या ज्वलंत प्रश्नाच्या मागे असल्याचे दिसून आले आहे.जंगलपट्टी मध्ये वाढत असलेल्या झोपडपट्ट्या,जंगलातील वृक्षांची बेसुमार कत्तल व डोंगर पोखरून होणारी माती चोरी आदी कारणांमुळे हिंस्त्र श्वापदे आता जंगलाबाहेर पडू लागली आहेत.जंगलातील पाण्याचे साठे आटले असून ही श्वापदे पाण्याच्या शोधात शहरात फिरू लागली आहेत.जंगलात मानवाचा…
पोषण आहारात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार- रविंद्र चव्हाण, डहाणू, काही दिवसांपूर्वी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत आश्रमशाळांमधील ३०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा झाल्याची दुर्घटना घडली होती. आश्रमशाळांमधील पोषण आहारात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.कांबळगाव येथील आश्रमशाळेच्या परिसरात असलेल्या मध्यवर्ती स्वयंपाकगृहाला पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केली,त्यावेळी ते बोलत होते. या पाहणी दौऱ्यात त्यांच्या सोबत पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम खा.डॉ.हेमंत सवरा आदी मान्यवर होते. पोषण आहाराबाबत इतरही काही तक्रारी होत्या.जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी या तक्रारीसदर्भात माहिती जाणून घेतली,असे पालकमंत्री चव्हाण यांनी…
पालघर, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शुभारंभ, आज पालघर जिल्हा ” मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने,” चा शुभारंभ करण्यात आला. सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री पालघर रविंद्र चव्हाण यांनी आभासी पद्धतीने या योजनेचा शुभारंभ केला. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम,खासदार डॉ.हेमंत सवरा, जिल्हाधिकारी गोविंद बोडके,मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, समाज कल्याण समिती सभापती मनीषा निमकर,महिला व बालकल्याण समिती सभापती रोहिणी शेलार, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संदीप पावडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. जिल्हाभरातून जवळपास २ हजार महीला या कार्यक्रमास उपस्थित होत्या. ज्या महिलांच्या खात्यात या योजनेअंतर्गत पैसे जमा झाले आहेत,त्यांना प्रतिनिधिक स्वरूपात अधिक स्वरूपात धनादेशाचे…
दीपक मोहिते, माणुसकीला काळिमा फासणारी घटना, रणरागिणी म्हणून ओळख असणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या प.बंगालच्या राजधानीत आर.जी.कर मेडिकल कॉलेज व रुग्णालयात एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली.या घटनेतील संजय रॉय या गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली असली तरी तपासात पोलीस व रुग्णालय प्रशासन लपवालपवी करत असल्यामुळे देशाच्या शहरात डॉक्टर रस्त्यावर उतरले आहेत.या ट्रेनी डॉक्टर महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलीस व रुग्णालय प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.या प्रकरणातील गुंतागुंत लक्षात घेऊन कोलकत्ता उच्च न्यायालयाने सदर प्रकरण सीबीआयकडे सोपावण्याचा आदेश दिला आहे.दरम्यान पोलिसांनी १२ जणांना ताब्यात घेतले आहे.सीबीआय आता सामूहिक बलात्कार झाला का ? या घटनेत एकूण…
