वसई,
वसई येथे परिवहन कार्यालयाचे भूमिपूजन संपन्न,
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे घोंगडे खूप वर्षांपासून भिजत पडले होते.या प्रश्नी वसईचे आ.हितेंद्र ठाकूर यांनी सतत पाठपुरावा केल्यानंतर अखेर हा प्रश्न मार्गी लागला.
१५ वर्षांपूर्वी नव्याने विरार पूर्व भागात सुरू झालेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला जागा अपुरी पडत होती.
दररोज हजारो नागरिक आपली वाहने घेऊन विरारच्या कार्यालयात विविध कामासाठी येत असतात,त्यामुळे अवघ्या तीन वर्षात सदर जागा अपुरी पडू लागली.त्यानंतर हे कार्यालय वसई येथे व्हावे,अशी मागणी होऊ लागली.या सर्व घडामोडीनंतर आ.हितेंद्र ठाकूर यांनी हा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारी मांडला.त्यांच्या प्रयत्नाला यश आले.वसई पूर्व भागात जागा उपलब्ध करण्यात आली.काल त्याचे भूमिपूजन पार पडले.या समारंभास पालकमंत्री रविंद चव्हाण,खा.डॉ हेमंत सावरा,लोकनेते आ.हितेंद्र ठाकूर,आ.क्षितिज ठाकूर,आ.राजेश पाटील,माजी खा.राजेंद्र गावित,जिल्हाधिकारी गोविंद बोडके,पालघर जिल्हा परिषदचे अध्यक्ष प्रकाश निकम,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे,माजी महापौर नारायण मानकर,सचिन पाटील,कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर ,इतर मान्यवर व कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

