पालघर,
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शुभारंभ,
आज पालघर जिल्हा ” मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने,” चा शुभारंभ करण्यात आला. सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री पालघर रविंद्र चव्हाण यांनी आभासी पद्धतीने या योजनेचा शुभारंभ केला.
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम,खासदार डॉ.हेमंत सवरा, जिल्हाधिकारी गोविंद बोडके,मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, समाज कल्याण समिती सभापती मनीषा निमकर,महिला व बालकल्याण समिती सभापती रोहिणी शेलार, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संदीप पावडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
जिल्हाभरातून जवळपास २ हजार महीला या कार्यक्रमास उपस्थित होत्या.
ज्या महिलांच्या खात्यात या योजनेअंतर्गत पैसे जमा झाले आहेत,त्यांना प्रतिनिधिक स्वरूपात अधिक स्वरूपात धनादेशाचे वाटप करण्यात आले.तसेच प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेतर्गत दोन महिलांना प्रतिनिधिक स्वरूपात गॅसचे वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी या योजनेबद्दल बोलताना भविष्यात कुठलंही सरकार येऊ द्या,ही योजना कोणीही बंद करू शकणार नाही, असे सांगितले.तसेच ही योजना जिल्हाभरात प्रभावीपणे राबवल्याबद्दल आणि कार्यक्रमाचे कमी वेळेत उत्तम नियोजन केल्याबद्दल जिल्हा परिषद प्रशासन,महीला व बालविकास अधिकारी प्रवीण भावसार,सर्व अंगणवाडी सेविका,मदतनीस,बचत गटाच्या सिआरपी ताई, यांच्यामुळे या योजनेचे काम जिल्ह्यात प्रभावीपणे होऊ शकले,असे प्रतिपादन त्यांनी केले.
खा.डॉ.हेमंत सवरा यांनी योजनेअंतर्गत खात्यात पैसे जमा झालेल्या महिलांचे अभिनंदन केले.तसेच या योजनेचा जिल्ह्यातील सर्व लाभार्थी महिलांनी लाभ घ्यावा,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले.
अंगणवाडी सेविका,आशा,ग्रामसेवक, आपले सरकार सेवा केंद्र यांच्या सर्वांच्या मदतीमुळे हे शिवधनुष्य पेलता आलं,अशा भावना मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी व्यक्त केल्या.
महीला व बालकल्याण समिती सभापती रोहिणी शेलार,सभापती मनीषा निमकर यांनी उपस्थित सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रवीण भावसार,जिल्हा महीला व बालकल्याण अधिकारी मल्लिनाथ कांबळे,बालविकास प्रकल्प अधिकारी,यांच्या नियोजनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी लाभार्थी महिलांनी आपले मनोगत व्यक्त करून रक्षाबंधनच्या आधी ३०००/- रु.खात्यात जमा झाल्याबद्दल तसेच दर महिन्याला पंधराशे रु.क मिळणार असल्याने शासनाचे आभार मानले.
या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी,जिल्हा पुरवठा अधिकारी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

