दीपक मोहिते,
माणुसकीला काळिमा फासणारी घटना,
रणरागिणी म्हणून ओळख असणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या प.बंगालच्या राजधानीत आर.जी.कर मेडिकल कॉलेज व रुग्णालयात एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली.या घटनेतील संजय रॉय या गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली असली तरी तपासात पोलीस व रुग्णालय प्रशासन लपवालपवी करत असल्यामुळे देशाच्या शहरात डॉक्टर रस्त्यावर उतरले आहेत.या ट्रेनी डॉक्टर महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचे उघडकीस आले आहे.
याप्रकरणी पोलीस व रुग्णालय प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.या प्रकरणातील गुंतागुंत लक्षात घेऊन कोलकत्ता उच्च न्यायालयाने सदर प्रकरण सीबीआयकडे सोपावण्याचा आदेश दिला आहे.दरम्यान पोलिसांनी १२ जणांना ताब्यात घेतले आहे.सीबीआय आता सामूहिक बलात्कार झाला का ? या घटनेत एकूण किती आरोपी होते ? सदर महिलेच्या अंगावरील जखमा पाहून या घटनेत एकाचा नाहीतर अधिक गुन्हेगारांचा समावेश असावा,असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.या सर्व बाबीचा सीबीआय तपास करणार आहे.कोलकत्ता पोलिसांच्या तपासात अनेक त्रुटी असून ज्या सेमिनार हॉलमध्ये ही घटना घडली.त्या महिलेचा मृतदेह ९ ऑगस्ट रोजी रक्ताच्या थारोळ्यात सापडला होता,तो हॉल देखील पोलिसांनी सील केला नाही,असा आरोप आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांनी केला आहे.पिडीत महिलेला न्याय मिळवून देण्याऐवजी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे.
Trending
- इन्फ्लुएन्सर्स आणि युट्युबर्ससाठी आचारसंहिता लागु करण्याचा प्रश्न विचारधीन ?
- कैसा हराया….?
- रियल इस्टेट व्यवसाय, हा नियोजनबद्ध विकासाचा पाया होऊ शकत नाही,
- निर्गुंतवणुकीचे धोरण पुन्हा सक्रिय ; बँकिंग क्षेत्रापासून सुरुवात, आयडिबीआयची ६०.७२ % मालकी फेअरफॅक्सकडे…
- पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे महत्वाचे आहे,
- माजी आ. हितेंद्र ठाकूर यांच्या राजकारणाला ओहोटी,
- पर्यटन,उपजीविका व मूलभूत सुविधावर भर द्या – मनोज रानडे,
- येणाऱ्या काळात पाकिस्तानची अर्थव्यवस्था पार रसातळाला जाणार…

