- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- कर्जमाफीने शेतकरी कर्जमुक्त होत नाही तर तो अधिक कर्जबाजारी होत असतो,
- ” होय, मी व्हेंटिलेटरवर असलेल्या महानगरपालिकेचा सन्माननिय नागरिक आहे, “…
- यंदाचा पाऊस भातशेतीला दिलासा देणारा….
- मी ज्या नालासोपारा मतदारसंघातून येतो…
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” दोघे एकमेकांना कधी मिठी मारणार ? राज्यात सर्वत्र संभ्रमावस्था… सेनेचे मुखपत्र असलेले ” सामना,” दैनिकात उद्धव व राज,या दोघांची बातमी आज छायाचित्रासह प्रसिद्ध झाल्यामुळे एकत्र येण्याच्या प्रक्रियेवर शिक्कामोर्तब झाल्याचे संकेत मिळाले आहेत.प्रकरणी हे दोघे एकमेकांना कधी टाळी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे दोघे जर आजच्या घडीला एकत्र आले तरी त्यांची ही गळाभेट किती काळ टिकेल ? याविषयी साशंकताच अधिक आहे.” आमच्या देवाला बडव्यांनी घेरले आहे,यापासून सुरू झालेल्या गृहकलहाचा प्रवास बाळासाहेबांना ” चिकन सुप आणून देण्या,” पर्यंत येऊन ठेपला आहे.पण कालांतराने भाजपच्या झंझावातापुढे या दोघांचा सुपडा साफ झाला. त्यामुळे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत आपलं काही खरं…
दीपक मोहिते ” हल्लाबोल,” ” अनाथ मुलांच्या पोटावर पाय देणारे महायुती सरकार अडचणीत येण्याची शक्यता… आदिवासी,सामाजिक न्याय व महिला व बालकल्याण विभागाच्या बालसंगोपन निधीवर डल्ला मारणारे महायुती सरकार राज्याला कोणत्या दिशेने नेऊ पाहत आहे.असा प्रश्न विरोधक नव्हे तर महायुती सरकारचे मंत्रीच विचारू लागले आहेत.येणाऱ्या काळात लाडक्या बहिणी योजनेसाठी पैसा उभा करण्यासाठी सध्या तीन इंजिनचे हे सरकार आता कोणत्याही थराला जाऊ शकते.या योजनेमुळे सरकारला दगाफटका होऊ शकतो,कारण विकासकामे ठप्प झाली तर लोकांना काय उत्तरे देणार अशा विवंचनेत मंत्री व सत्ताधारी पक्षाचे आमदार सापडले आहेत. सरकारच्या अशा वागण्यामुळे विरोधक नव्हे तर सत्ताधारी पक्षाचे मंत्रीच हैराण झाले आहेत.अशा परिस्थितीत अर्थमंत्री अजित पवार यांनी…
दीपक मोहिते, ” एक महत्वाचे पाऊल,” १ ऑक्टो.२०२६ पासून १६ व्या जनगणनेला होणार सुरुवात, भारतात १ ऑक्टोबर २०२६ पासून जनगणनेला सुरुवात होणार आहे.ही जनगणना दोन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे.या जनगणनेचे विशेष म्हणजे यावेळी जातनिहाय जनगणना केली जाणार आहे.लडाख, जम्मू-काश्मीर,हिमाचल प्रदेश व उत्तराखंड,या बर्फाळ प्रदेश असलेल्या राज्यांमध्ये १ ऑक्टो.२०२६ पासून सुरुवात होणार आहे.तर,देशाच्या उर्वरित भागात १ मार्च २०२७ पासून ही जनगणना करण्यात येणार आहे.यावेळी जनगणनेच्या कागदपत्रांमध्ये जातीचा कॉलम ( स्तंभ/रकाना ) सामाविष्ट करण्यात आला आहे. जनगणना करणारे कर्मचारी प्रत्येक घराघरांत जाऊन लोकांची माहिती गोळा करतील.यामध्ये त्यांच्या जातीबाबतची माहितीही घेण्यात येणार आहे. जातनिहाय लोकसंख्या व समाजातील विविध वर्गांची आर्थिक,सामाजिक स्थिती जाणून…
सचिन परब,वसई तब्बल एक दशकानंतर वसईची आमसभा संपन्न, वसई तालुक्यात २०१४ नंतर प्रथमच वसई पंचायत समितीची आमसभा उत्साहात पार पडली. वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांच्या अध्यक्षतेखाली ही आमसभा आयोजित करण्यात आली होती. सहा महिन्यापूर्वी वसईत नेतृत्व बदल झाल्यावर तथा एका दशकाच्या कालावधीनंतर पहिल्यादाच झालेल्या या आमसभेला ३१ ग्रामपंचायतीचे सरपंच,पदाधिकारी, ग्रामविकास अधिकारी , गावकरी सर्व शासकीय विभागाचे विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी स्थित होते. विशेष म्हणजे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आ.स्नेहा यांची ही पहिलीच आमसभा होती.या आमसभेच्या अध्यक्षा तथा आ.स्नेहा दुबे पंडित यांनी वसईत कार्यरत विविध शासकीय विभागांचा आमसभेत सविस्तर आढावा घेतला आणि वसईच्या सर्वांगीण विकासासाठी जे काही शक्य होईल,ते करण्याचे…
तलासरीत पोलिसांचा रूटमार्च सुरेश काटे,तलासरी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर तलासरीत पोलिसांचा रूट मार्च, बकरी ईद,सणानिमित्त तलासरी पोलीस ठाणे ते तलासरी नाका – पाटीलपाडा – गोदावरी कॉलेज – तलासरी बाजार पेठ- संजविनी हॉस्पिटल – सुतारपाडा- शिवमंदीर सुन्नी रजा जामा सुन्नी मजीद – असा पोलिसांनी रूट मार्च काढला त्यानंतर उधवा दूरक्षेत्र परिसरातही य उधवा कानलपाडा- सुन्नी जुम्मा मस्जिद उधवा – उधवा बाजारपेठ- शिंदापाडा असा पोलिसांतर्फे रूट मार्च करण्यात आला आहे. या रूट मार्च मध्ये रुट मार्च मध्ये पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार,उप विभाग डहाणू स्ट्रायकिंग,आरसीपी मुख्यालय पालघर,होमगार्ड व कर्मचारी सहभागी झाले होते. खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलिसांनी हे रूट मार्चचे आयोजन केले होते.
सुरेश वैद्य,पालघर पालघर जिल्ह्याची मान्सूनपूर्व आरोग्य तयारी पूर्ण, आरोग्य विभाग सज्ज, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य साथीच्या आजारांवर वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा परिषद पालघर आरोग्य विभागाने मान्सूनपूर्व कृती आराखडा २०२५-२६ जाहीर केला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पत्रकार परिषदेत या आराखड्याची सविस्तर माहिती देण्यात आली. डेंग्यू,मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस, हिपॅटायटीस,गॅस्ट्रो आणि चिकनगुनिया यांसारख्या आजारांचे वेळीच निदान आणि उपचारासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यात रॅपिड रिस्पॉन्स टीम कार्यरत असून, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्यात आली आहेत.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गरोदर माता, स्तनदा माता आणि पाच वर्ष वयाच्या बालकांसाठी २४ तास संदर्भ सेवा…
संजय लांडगे,वाडा धानाची बोनस रक्कम शेतकऱ्यांना तातडीने देण्यात यावी, आदिवासी विकास महामंडळाकडून खरेदी केलेल्या धानाची ( भात ) बोनस रक्कम तातडीने संबंधित शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांनी वाड्याचे तहसीलदार यांच्याकडे मागणी केली आहे. आदिवासी विकास महामंडळाकडे वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी भातविक्री कामी नोंदणी केली आहे.नोंदणी केलेल्या प्रत्येक शेतकऱ्यास बोनस देण्याचे शासनाचे धोरण आहे,असे असतांना वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांना आजतागायत बोनसची रक्कम अदा करण्यात आलेली नाही. सध्या शेतीचा हंगाम सुरू असून,पेरणीची कामे सुरू झाली आहेत.मात्र शेतकऱ्यांकडे शेतीच्या या हंगामासाठी पुरेसे पैसे नसल्याने त्यांना पेरणी करणे शक्य होत नाही.त्यामुळे भातशेती लागवडीखाली येणार नाही व मजूरांच्या हाताला काम देखील मिळणार नाही.त्यामुळे संबंधित मंडळाकडे नोंदणी…
दीपक मोहिते, महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईडीच्या धाडीचे सत्र पुन्हा सुरू, महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पुन्हा ईडीचे हत्यार उपसले आहे.आज मुंबई व केरळ राज्याच्या प्रमुख शहरात ईडीने धाडी टाकल्या.त्यामध्ये आदित्य ठाकरे यांचा जिगरी दोस्त दिनो मोरीयाचा समावेश आहे.तसेच ठाणे,वसई-विरार,उल्हास नगर या महानगरपालिका व पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने ईडीचे पुढील लक्ष्य आहे.इडीच्या धाडी पुन्हा सुरू झाल्यामुळे राजकीय नेते व अधिकाऱ्यामध्ये सध्या भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिठी नदीचा गाळ उपसण्याच्या निविदेत १३०० कोटींचा आर्थिक घोटाळा झाल्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्या मित्रमंडळीवर सुमारे आरोप ठेवण्यात आले होते.या प्रकरणी अटकेत असलेल्या एका संशयीत आरोपीने या प्रकरणात माझा काही संबंध नसून पैश्याची जी काही देवाणघेवाण झाली,ती…
वसंत भोईर,वाडा किरीट सोमय्या यांनी कुडूस व वडवली ग्रामपंचायतीना भेटी देऊन जन्मप्रमाणपत्रा बाबतची घेतली माहिती, भाजपचे नेते व माजी खा.किरीट सोमय्या यांनी आज वाडा तालुक्यातील कुडूस व वडवली,या ग्रामपंचायतीला भेट देऊन जन्मनोंदणी प्रमाणपत्र यासंदर्भात माहिती घेतली.यावेळी त्यानी ग्रामसेवकाला अनेक प्रश्न विचारले. राज्यात मोठ्या स॔ख्येने बांगलादेश घुसखोर आले असून त्याबाबत किरीट सोमय्या राज्यभर फिरून माहिती घेत आहेत.याचाच एक भाग म्हणून वाडा तालुक्यातील काल त्यांनी कुडूस व वडवली,या ग्रामपंचायतीत विलंबित जन्म नोंदणी व प्रमाणपत्र १ जाने.२०२४ ते १ जाने.२०२५ या दोन वर्षांत या दोन्ही ग्रामपंचायतीकडून किती विलंबित जन्मनोंद करण्यात आली.त्या विषयीची संख्या व किती लोकांना यादरम्यान अनुपलब्धता प्रमाणपत्र देण्यात आली याबाबतची माहिती…
नदीम शेख,पालघर १५ व्या वित्त आयोगाकडून मिळालेल्या लाखो रु.च्या निधीच्या दुरुपयोग, १५ व्या वित्त आयोगातर्फे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था मूलभूत सेवा पुरवण्यासाठी मिळालेल्या निधीचा दुरुपयोग केल्याचा आरोप कुडणवासियांनी केला आहे.या निधीचा वापर स्वच्छता,पाणीपुरवठा आणि पाण्याचा पुनर्वापर,यांसारख्या कामांसाठी केला जातो.परंतु प्रशासनच्या उदासीनतेमुळे ठेकेदारांकडून नित्कृष्ट दर्जाची कामे केल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत, असाच एक प्रकार पालघर तालुक्यातील कुडण ग्रामपंचायतीमध्ये पाहायला मिळाला आहे. कुडण ग्रामपंचायत हद्दीतील “अ,” प्रभागात पंधरा वित्त आयोग योजनेतून सोलर पंप योजना,बोअरवेल व पाणी टाकी,यासाठी यंत्रणा राबवण्याच्या नावाखाली राज एंटरप्राइजेस या ठेकेदाराकडून रु.४ लाख ६८ हजार १२० रु. रकमेचे निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले होते. या कामात शासनाच्या…
