दीपक मोहिते,
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईडीच्या धाडीचे सत्र पुन्हा सुरू,
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पुन्हा ईडीचे हत्यार उपसले आहे.आज मुंबई व केरळ राज्याच्या प्रमुख शहरात ईडीने धाडी टाकल्या.त्यामध्ये आदित्य ठाकरे यांचा जिगरी दोस्त दिनो मोरीयाचा समावेश आहे.तसेच ठाणे,वसई-विरार,उल्हास नगर या महानगरपालिका व पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने ईडीचे पुढील लक्ष्य आहे.इडीच्या धाडी पुन्हा सुरू झाल्यामुळे राजकीय नेते व अधिकाऱ्यामध्ये सध्या भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिठी नदीचा गाळ उपसण्याच्या निविदेत १३०० कोटींचा आर्थिक घोटाळा झाल्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्या मित्रमंडळीवर सुमारे आरोप ठेवण्यात आले होते.या प्रकरणी अटकेत असलेल्या एका संशयीत आरोपीने या प्रकरणात माझा काही संबंध नसून पैश्याची जी काही देवाणघेवाण झाली,ती दिनो मारीयो यांच्याशी संबधित आहे,असे आपल्या जबानीत सांगितल्यानंतर ईडीने आज दिनो मोरीयो यांच्या निवासस्थानी धाडी टाकल्या.या प्रकरणातील मध्यस्थ केतन कदम व जय जोशी हे दोघे सध्या अटकेत आहेत.त्यांच्या जबानीवरून या धाडी पडल्याचे सांगण्यात येत आहे.दिनो मोरीयो हा अभिनेता असुन तो आदित्य ठाकरे यांचा जिवलग मित्र आहे.महानगरपालिका निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने आदित्य ठाकरे यांना अडचणीत आणण्यासाठी कंबर कसल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.या सर्व घडामोडीनंतर ईडीची ठाणे व वसई-विरार शहर महानगरपालिकेचे काही बदली होऊन गेलेले,सध्या कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांवर कुऱ्हाड कोसळणार आहे.या अधिकाऱ्यांच्या जबानीतून ईडीचे अधिकारी नेतेमंडळीना टार्गेट करतील,अशी चर्चा सर्वत्र होत आहे.विशेषकरून वसई विरार मनपात प्रतिनियुक्तीवर आलेले व पुन्हा मूळ जागी परतलेल्या अधिकाऱ्यांची सध्या झोप उडाली आहे.
Trending
- आयाराम गयारामचे आवागमन तूर्तास थंडावले आहे…
- आम्हा मतदारांची ” सनद, “
- स्था.स्व.सं.च्या निवडणुका पुढील महिन्यात तरी होतील का ?
- कातकरी मुलीची घरकाम व मच्छीच्या कामासाठी पिळवणूक,
- राज्याचा विभागीय असमतोल दूर करण्याची गरज….
- जेंव्हा रस्त्यावरील खड्डे बोलू लागतात…
- बिहारचा निकाल रालोआच्या विरोधात गेल्यास राज्यातील स्था.स्व.सं.च्या निवडणुका लांबणीवर पडतील…
- एका होतकरू तरुणाचे अभूतपूर्व धाडस,

