वसंत भोईर,वाडा
किरीट सोमय्या यांनी कुडूस व वडवली ग्रामपंचायतीना भेटी देऊन जन्मप्रमाणपत्रा बाबतची घेतली माहिती,
भाजपचे नेते व माजी खा.किरीट सोमय्या यांनी आज वाडा तालुक्यातील कुडूस व वडवली,या ग्रामपंचायतीला भेट देऊन जन्मनोंदणी प्रमाणपत्र यासंदर्भात माहिती घेतली.यावेळी त्यानी ग्रामसेवकाला अनेक प्रश्न विचारले.
राज्यात मोठ्या स॔ख्येने बांगलादेश घुसखोर आले असून त्याबाबत किरीट सोमय्या राज्यभर फिरून माहिती घेत आहेत.याचाच एक भाग म्हणून वाडा तालुक्यातील काल त्यांनी कुडूस व वडवली,या ग्रामपंचायतीत विलंबित जन्म नोंदणी व प्रमाणपत्र १ जाने.२०२४ ते १ जाने.२०२५ या दोन वर्षांत या दोन्ही ग्रामपंचायतीकडून किती विलंबित जन्मनोंद करण्यात आली.त्या विषयीची संख्या व किती लोकांना यादरम्यान अनुपलब्धता प्रमाणपत्र देण्यात आली याबाबतची माहिती माहितीच्या अधिकारात त्यांनी मागवली आहे.या माहितीसाठी त्यांनी काल कुडूस व वडवली ग्रामपंचायतीना भेटी देऊन ग्रामपंचायत अधिकारी यकडून माहिती जाणून घेतली.जन्मप्रमाणपत्र कशाच्या आधारावर तुम्ही देता ? असा प्रश्न त्यांनी ग्रामपंचायत अधिकारी किरण हरड यांना विचारले असता, त्यांनी ग्रामपंचायतीत असलेल्या नोंदीनुसार जन्म प्रमाणपत्र देत असल्याचे सांगितले.
यावेळी वाड्यातील प्रदूषण करणा-या कंपन्यासंदर्भात त्यांना पत्रकारांनी छेडले असता पालघरच्या जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव यांच्याशी मी दूरध्वनीवरून संपर्क साधून प्रदूषण करणा-या कंपन्या बंद करण्याची मागणी केली आहे,असे सांगून येत्या ४८ तासांत त्या बंद होतील,असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.भिवंडी वाडा रस्त्याच्या दुरवस्थेवर प्रश्न विचारला असता,त्यावर त्यांनी बोलायचे टाळले.
किरीट सोमय्या यांच्यासमवेत भाजपचे स्थानिक कार्यकर्ते मंगेश पाटील,मोनिष पाटील,हेमंत पष्टे,आदी उपस्थित होते.त्यांच्या या भेटी दरम्यान वाडा पोलीसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

