दीपक मोहिते,
” एक महत्वाचे पाऊल,”
१ ऑक्टो.२०२६ पासून १६ व्या जनगणनेला होणार सुरुवात,
भारतात १ ऑक्टोबर २०२६ पासून जनगणनेला सुरुवात होणार आहे.ही जनगणना दोन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे.या जनगणनेचे विशेष म्हणजे यावेळी जातनिहाय जनगणना केली जाणार आहे.लडाख, जम्मू-काश्मीर,हिमाचल प्रदेश व उत्तराखंड,या बर्फाळ प्रदेश असलेल्या राज्यांमध्ये १ ऑक्टो.२०२६ पासून सुरुवात होणार आहे.तर,देशाच्या उर्वरित भागात १ मार्च २०२७ पासून ही जनगणना करण्यात येणार आहे.यावेळी जनगणनेच्या कागदपत्रांमध्ये जातीचा कॉलम ( स्तंभ/रकाना ) सामाविष्ट करण्यात आला आहे.
जनगणना करणारे कर्मचारी प्रत्येक घराघरांत जाऊन लोकांची माहिती गोळा करतील.यामध्ये त्यांच्या जातीबाबतची माहितीही घेण्यात येणार आहे. जातनिहाय लोकसंख्या व समाजातील विविध वर्गांची आर्थिक,सामाजिक स्थिती जाणून घेणे,असे दोन मुख्य उद्देश,या जातीनिहाय जनगणनेमागे आहेत.
२०११ साली देशाची १५ वी जनगणना झाली होती. त्यानंतर १६ वी जनगणना २०२१ साली होणे व्हायला हवी होती पण
करोनामुळे ती स्थगित करण्यात आली.
भारतात २०११ साली शेवटची जनगणना करण्यात आली होती.तत्पूर्वी,दर १० वर्षांनी देशात जनगणना केली जात होती.त्यानुसार २०२१ मध्ये जनगणना करणं अपेक्षित होतं.मात्र,केंद्रातील मोदी सरकारने जनगणना करण्यास सतत टाळाटाळ केली.सुरुवातीला करोनामुळे जनगणनेचा निर्णय स्थगित केल्याचं सांगितलं जात होतं. मात्र,देश करोनाच्या संकटातून मुक्त झाल्यानंतरही जनगणना करण्याबाबत मोदी सरकारने सतत चालढकल केली.त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून विरोधी पक्षांनी,प्रामुख्याने काँग्रेस व खा.राहुल गांधी यांनी जनगणनेची मागणी लावून धरली.त्यांनी ही जनगणना जातनिहाय व्हावी,अशीही मागणी रेटली.अखेर गेल्या महिन्यात केंद्र सरकारने जनगणना करण्याचा निर्णय घेतला.
२०११ साली करण्यात आलेल्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या १२१ कोटी इतकी होती.तर २००१ साली देशाची लोकसंख्या १०२ कोटी इतकी होती.दरम्यान,आता २०१६-२०२७ मध्ये जनगणना केली जाणार असून जनगणनेचं चक्र बदललं जाईल,असं सांगण्यात येत आहे.
१ ऑक्टो.२०२६ पासून सुरू होणारी जनगणना दोन टप्प्यात करण्यात येणार आहे.
यावेळी जनगणनेवेळी जातनिहाय लोकसंख्या मोजण्यात येणार आहे.
बर्फाळ प्रदेश असलेल्या राज्यांमध्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये जसे की जम्मू-काश्मीर,लडाख, हिमाचल प्रदेश व उत्तराखंडमध्ये ऑक्टोबर २०२६ पासून जनगणना सुरू होणार आहे.
जनगणनेत लोकसंख्या शास्त्रीय,सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक माहिती गोळा केली जाते.याद्वारे लोकांची संख्या,वय,लिंग, शिक्षण,व्यवसाय व इतर महत्त्वाची माहिती गोळा केली जाते.तसेच पुरुषांची संख्या किती ? महिलांची किती ? लोकांमधील शिक्षणाचं प्रमाण किती ? व्यवसाय व बेरोजगारीचं प्रमाण किती ? याबाबतची माहिती गोळा करण्यात येणार आहे.ही माहिती वेगवेगळ्या सामाजिक,आर्थिक व राजकीय कारणांसाठी वापरली जाते.सरकारी धोरण तयार करणे,नियोजन करणे, एखाद्या भागाचा विकास करण्यासाठी ही माहिती उपयोगी पडते.
जातीनिहाय जनगणनेचा उपयोग विकास योजना आखणे,समाजातील कोणत्या घटकाला किती हिस्सा मिळावा,कोणते घटक वंचित आहे,या सर्व गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी होत असतो.

