Author: दीपक मोहिते

वसंत भोईर, कौटुंबिक वादातून काकीनेच दिली पुतण्याला मारण्याची सुपारी, वाडा शहरातील आगरआळी या भागात राहणाऱ्या ऋषिकेश मनोरे या तरूणावर काल अज्ञात हल्लेखोरांनी रात्री साडेआठच्या सुमारास घरी जात असताना जैन मंदिराजवळ उभ्या असलेल्या तीन अनोळखी इसमांनी त्याच्यावर हल्ला चढवला.या हल्ल्यात तो गंभीर जख्मी झाला.त्याच्यावर सध्या ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचारा सूरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. सुशांत चिडे, तुषार मनवर, यश करंजे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फाॅरेन्सीक व्हॅन व अंगुली मुद्रा तज्ञ यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.सदर गुन्ह्य़ाचे घटनास्थळी असलेले साक्षीदारंकडे पोलिसांनी विचारणा केली व शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली.त्यामध्ये मोटारसायकलवरून तीन…

Read More

दीपक मोहिते, करदात्यांची हलाखीची परिस्थिती, फक्त अलीबाबा गजाआड होऊन चालणार नाही,तर रांजणात लपून बसलेल्या ४० चोरानाही पकडा… सर्वसामान्य नागरिकांच्या हजारो कोटी रु.चा चुराडा करणाऱ्या माजी आयुक्त अनिलकुमार पवार याला काल आपल्याच घरात चोरासारखे लपून बसावे लागले.यालाच आपण नियतीचा खेळ असे म्हणतो.आंदोलनातील नेत्यांना आपल्या कार्यालयात प्रवेश करू न देणाऱ्या या भ्रष्ट माणसाला आयुष्यभराचा धडा मिळाला.सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी घराचे कुलूप तोडून त्याला ताब्यात घेतले व सलग दहा ते बारा तास त्याच्यावर प्रश्नाचा भडीमार केला.या भडीमारात तो व त्याचे कुटुंबीय पार कोसळून गेले होते.महानगरपालिकेची ९०० कोटीची एफडी कोणी तोडली व ते पैसे कुठे गेले ? याची चौकशी केली पाहिजे.तसेच आपल्या कार्यकाळात कोणकोणत्या बिल्डर्सवर…

Read More

दीपक मोहिते, आणखी एका अति. आयुक्तांचा गळा आवळला जाणार…. अखेर आज वसई विरार शहर महानगरपालिकेत दुसरी महत्वाची विकेट पडली.आयुक्त अनिलकुमार पवार यांची नुकतीच बदली झाली होती.त्यानिमित्ताने काल त्यांना मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला.या समारंभाच्या दुसऱ्याच दिवशी भले पहाटे ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा गळा आवळला.यापूर्वी आयुक्त राठोड यांचीही पवार यांच्यासारखीच सत्कार सोहळ्याच्या दिवशीच नगरविकास विभागाने गळा आवळला होता.त्यांचा निरोपसंमारभ ज्या दिवशी आयोजित करण्यात आला होता,त्याच दिवशी त्यांच्या हाती निलंबनाची नोटीस पडली.त्यामुळे ते समारंभ स्थळी फिरकले नाहीत.बिचारे त्यांचे चाहते कित्येक तास ताटकळत उभे राहून अक्षरशः कंटाळून गेले होते.त्यानंतर मनपा प्रशासनाने तो कार्यक्रम सरळ गुंडाळून टाकला होता.वास्तविक अनिल पवार या महाभागाने गेल्या तीन वर्षात…

Read More

वाड्यात सर्वत्र भक्तिमय वातावरण….. पहील्या श्रावण सोमवारी भाविकांची शिवमंदिरात मोठी गर्दी, वसंत भोईर,वाडा यंदा श्रावणाची सुरुवात गेल्या शुक्र.पासून झाली असून आज पहील्या सोमवारच्या निमित्ताने शिवमंदिरांमध्ये पहाटेपासूनच शिवभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.आज श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी कुडूस,कोंढले,नारे, घोडमाळ,नागनाथ मंदिर व तिलसेश्वर येथे श्रावणी सोमवारनिमित्त मध्यरात्री पासूनच अभिषेक व सर्पदर्शन घेण्यासाठी शिवमंदिरात शिवभक्तांची मोठी गर्दी झाली होती.शिवभक्तांना त्रास होऊ नये,म्हणून ग्रामस्थ व मंदीर प्रसानाने विशेष खबरदारी घेतली होती.पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त वाडा तालुक्यातील शिवमंदिरे भाविकांनी गजबजून गेली होती.भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. श्रावण महिन्याचा पहिला सोमवार सर्वात महत्वाचा मानण्यात येतो.पहाटेची महाआरती करत मुख्य शिवलिंगावर दुग्धाभिषेक, डमरु आणि शंखनाद करण्यात आला.दर्शनासाठी…

Read More

दीपक मोहिते, ” जनतेच्या पैश्याची उधळपट्टी,” तीन इंजिनच्या निर्लज्ज सरकारने राज्य भिकेला लावायचे ठरवले आहे… ” गतिमान सरकार,” व ” महाराष्ट्र आता थांबणार नाही,” अशा दोन गोंडस टॅगलाईनचा आधार घेत देवेंद्र फडणवीस सरकारने जनतेच्या पैश्याची कशी उधळपट्टी चालवली आहे,हे ” मुख्यमंत्री लाडकी बहीण,” योजनेतील गैरव्यवहारातुन समोर आले आहे.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी तीन इंजिन सरकारने ” मुख्यमंत्री लाडकी योजना,” धुमधडाक्यात सुरू केली.अपेक्षेप्रमाणे सरकारला त्या निवडणुकीत प्रचंड फायदा झाला.पण आता या योजनेत झालेले आर्थिक घोटाळे पाहून दस्तुरखुद्द फडणवीस देखील चक्रावून गेले आहेत. ही योजना बहिणीसाठी लागू असताना १४ हजार २८९ लाडक्या भावांनी २१ कोटी रु.वर डल्ला मारत सरकारला…

Read More

जव्हार प्रतिनिधी, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश, जव्हार शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षांचे शेकडो कार्यकर्ते,पदाधिकारी आणि युवकांनी आज भाजपात जाहीर प्रवेश केला. हा भव्य प्रवेश सोहळा आ. हरिश्चंद्र भोये यांच्या उपस्थितीत आमदार कार्यालयात संपन्न झाला. नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेला हा पक्षप्रवेश महत्त्वपूर्ण मानला जात आहे. युवक,महिला व उद्योजक यांच्या एकत्रित प्रवेशामुळे भाजपाचे संघटन बळकट झाले असून,यामुळे जव्हार नगरपरिषदेत गेली अनेक वर्षे असलेली राष्ट्रवादी व शिवसेनेची सत्ता डगमगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.गेल्या काही आठवड्यांपासून प्रत्येक प्रभागातील कार्यकर्ते भाजपात प्रवेश करत आहेत. ही एक नव्या राजकीय समीकरणाची सुरूवात असल्याचे सांगण्यात येत आहे.भाजपाच्या विचारधारेवर विश्वास ठेवत,विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित…

Read More

दिपक मोहिते, ” अभूतपूर्व घटना,” गृहकलह कधीही फायदेशीर ठरत नसते ; ठाकुरांनी देखील ठाकरे बंधूप्रमाणे विचार करावा, पाण्यात कितीही जोराने काठी मारली तरी पाणी वेगळे होत नाही.काही काळ तरंग उठतात,पण पुन्हा ते एकजीव होत असतात.तसंच कौटुंबिक नात्यात घडत असतं.आज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनसेचे नेते राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर गेले होते.त्यांच्या या भेटीवर भाष्य करताना उद्धव ठाकरे यांनी ” आज मला खूप आनंद झाला,” अशी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.त्यांच्या या भेटीमुळे राज्यात नवीन पर्वाला सुरुवात झाल्याचे मानण्यात येत आहे. ” हिंदी सक्ती,” च्या विषयावरून राज ठाकरे यांनी महिन्याभरापूर्वी उद्धव ठाकरे यांना टाळी दिल्यानंतर या दोघा…

Read More

दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” राज्यात सध्या विदूषकांची कमी नाही… राज्यमंत्री मंडळातील काही उपद्व्यापी मंत्र्यामुळे सरकारची अब्रू दररोज वेशीवर टांगली जात आहे.मुख्यमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस, या उपद्व्यापी मंत्र्यांना आवर घालण्याकामी प्रथमदर्शनी अपयशी ठरल्याचे पाहायला मिळत आहे.श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनला सुमित फॅसिलिटीज,या बदनाम कंत्राटी कंपनीकडून देणग्या मिळाल्या संदर्भात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.या फाउंडेशनचा सर्वेसर्वा असलेला अमित साळुंखे,हा सध्या झारखंड राज्याच्या अँटीकरप्शन ब्युरोच्या कोठडीची हवा खात आहे.त्याच्यावर ६ हजार कोटी रु.चा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आहे.हा अमित साळुंखे हा श्रीकांत शिंदे यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगण्यात येत आहे.तर दुसरीकडे एकाच खात्याच्या दोन मंत्र्यामध्ये चांगलीच जुंपली आहे.राज्याचे कृषिमंत्री सध्या रमीमध्ये मग्न आहेत.संजय…

Read More

” दीपक मोहिते,” ” बॉटमलाईन,” ” कारगिल विजय दिन ; ” दक्षिण आशियात भारतच दादा,” दरवर्षी संपूर्ण भारतात ” कारगिल विजय दिन,” साजरा करण्यात येतो.युद्धविषयक असलेले सर्व आंतरराष्ट्रीय कायदे धाब्यावर बसवत पाकिस्तानच्या लष्कराने आपल्या भूभागात घुसखोरी करत आपला भूभाग ताब्यात घेतला होता.३ मे १९९९ रोजी पाक लष्कराने घुसखोरी केली होती.त्यांनी कारगिलमधील अनेक टेकड्यावर ताबा मिळवला.सुमारे ८५ दिवसाच्या लढाईनंतर भारताने आपला भुभाग पुन्हा ताब्यात घेतला व पाक घुसखोरांना यमसदनी धाडले. या युद्धात झालेल्या पराभवामुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगलीच निंदानालस्ती झाली.भारताच्या तोफखान्याच्या माऱ्यासमोर पाक सैन्याची अक्षरशः धुळदाण उडाली व भयभीत झालेले लष्करप्रमुख मुशरफ यांनी पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ याना युद्ध थांबवण्यासाठी साकडे…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” नियती कोणाला सोडत नाही,आणि कोणाला अमरपट्टा देखील देत नाही,”… नियती,ही सर्वश्रेष्ठ असून ती कोणालाही सोडत नाही,वेळ आली की भल्याभल्याना ती दणका देत आली आहे.ती पृथ्वीवर जन्माला आलेल्या प्रत्येक सजीवाला ” येथेच कर,आणि येथेच भोग,” अशा न्यायाने वागवत आली आहे.पण तरीही माणूस आपल्या वागण्यात सुधारणा करत नाही,त्यांच्यामधील अहंकार त्यांना तसे करू देत नाही.माजी उपराष्ट्रपती जगदीप धनकड,हे हल्लीच्या काळातील नियतीचा दणका मिळाल्याचे उत्तम व ताजे उदाहरण आहे.आज त्यांची झालेली केविलवाणी परिस्थिती लक्षात घेऊन अहंकाराने पालथे पडणाऱ्या प्रत्येक राजकारणी व्यक्तीने धडा शिकवायला हवा. माजी उपराष्ट्पती जगदीप धनकड यांनी प.बंगालच्या राज्यपालपदी कार्यरत असताना संविधानाच्या साऱ्या मर्यादा ओलांडल्या होत्या. त्यांनी…

Read More