जव्हार प्रतिनिधी,
राष्ट्रवादी व शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश,
जव्हार शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षांचे शेकडो कार्यकर्ते,पदाधिकारी आणि युवकांनी आज भाजपात जाहीर प्रवेश केला. हा भव्य प्रवेश सोहळा आ. हरिश्चंद्र भोये यांच्या उपस्थितीत आमदार कार्यालयात संपन्न झाला.
नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेला हा पक्षप्रवेश महत्त्वपूर्ण मानला जात आहे. युवक,महिला व उद्योजक यांच्या एकत्रित प्रवेशामुळे भाजपाचे संघटन बळकट झाले असून,यामुळे जव्हार नगरपरिषदेत गेली अनेक वर्षे असलेली राष्ट्रवादी व शिवसेनेची सत्ता डगमगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.गेल्या काही आठवड्यांपासून प्रत्येक प्रभागातील कार्यकर्ते भाजपात प्रवेश करत आहेत. ही एक नव्या राजकीय समीकरणाची सुरूवात असल्याचे सांगण्यात येत आहे.भाजपाच्या विचारधारेवर विश्वास ठेवत,विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्ती,महिला बचत गटांच्या कार्यकर्त्या आणि उच्चशिक्षित तरुणांनी पक्षात प्रवेश केला आहे.या सोहळ्यात हॉटेल व्यवसायिक सावन तारापूरवाला,युवा नेतृत्व सिद्धार्थ नामदेव बल्लाळ,महिला बचत गटाच्या सदस्य,तसेच तेजस्वी युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष कुणाल उदावंत,विलास चव्हाण,सुमित तारापूरवाला, विशाल तपासे,हरेश चव्हाण, महेश तारापूरवाला आदी मान्यवर उपस्थित होते.

