वसंत भोईर,
कौटुंबिक वादातून काकीनेच दिली पुतण्याला मारण्याची सुपारी,
वाडा शहरातील आगरआळी या भागात राहणाऱ्या ऋषिकेश मनोरे या तरूणावर काल अज्ञात हल्लेखोरांनी रात्री साडेआठच्या सुमारास घरी जात असताना जैन मंदिराजवळ उभ्या असलेल्या तीन अनोळखी इसमांनी त्याच्यावर हल्ला चढवला.या हल्ल्यात तो गंभीर जख्मी झाला.त्याच्यावर सध्या ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचारा सूरू आहेत.
पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे.
सुशांत चिडे, तुषार मनवर, यश करंजे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फाॅरेन्सीक व्हॅन व अंगुली मुद्रा तज्ञ यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.सदर गुन्ह्य़ाचे घटनास्थळी असलेले साक्षीदारंकडे पोलिसांनी विचारणा केली व शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली.त्यामध्ये मोटारसायकलवरून तीन जण जाताना आढळून आले. मोबाईलचे टाॅवर लोकेशन पाहिले असता ते वाडा शहरामध्ये असल्याचे स्पष्ट झाले.आरोपींनी या घटनेत वापरलेली स्कुटी ही वाडा शहरातील अशोक वन येथे सोडल्याची माहिती मिळाली. गुन्ह्य़ातील तीन संशयित इसम फिरत असल्याचे दिसून आले.त्यानंतर त्याच दिवशी दिवसभर फिर्यादीचे वडील नितीन मनोरे हे फिर्यादी यांचे सोबत होते त्यामुळे फिर्यादीवर हल्ला करता आला नाही.१९ जुलै रोजी ते इंद्रप्रस्थ या बारमध्ये ब-याच वेळ मद्यपान करताना दिसले.नंतर ते नांदगाव नाशिक येथे असल्याची माहिती प्राप्त झाली.नाशिक येथे पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व वाडा पोलिसांनी त्यांना शिताफिने अटक केली.त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपण हा गुन्हा केल्याची कबुली दिली.हा गुन्हा करणेसाठी त्यांना फिर्यादीची काकी राधिका मनोरे ऊर्फ राधिका जाधव यांनी १ लाख रू.ची सुपारी दिल्याचे सांगितले.सदर महिला सध्या फरारी असून पोलीस तिचा कसून शोध घेत आहेत.त्यांच्यात कौटुंबिक वाद असल्यामुळे तिने सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले आहे.जखमी ऋषिकेशवर ठाणे येथील ज्युपिटर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी वाडा पोलीस पुढील तपास करत आहेत.

