वाड्यात सर्वत्र भक्तिमय वातावरण…..
पहील्या श्रावण सोमवारी भाविकांची शिवमंदिरात मोठी गर्दी,
वसंत भोईर,वाडा
यंदा श्रावणाची सुरुवात गेल्या शुक्र.पासून झाली असून आज पहील्या सोमवारच्या निमित्ताने शिवमंदिरांमध्ये पहाटेपासूनच शिवभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.आज श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी कुडूस,कोंढले,नारे, घोडमाळ,नागनाथ मंदिर व तिलसेश्वर येथे श्रावणी सोमवारनिमित्त मध्यरात्री पासूनच अभिषेक व सर्पदर्शन घेण्यासाठी शिवमंदिरात शिवभक्तांची मोठी गर्दी झाली होती.शिवभक्तांना त्रास होऊ नये,म्हणून ग्रामस्थ व मंदीर प्रसानाने विशेष खबरदारी घेतली होती.पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त वाडा तालुक्यातील शिवमंदिरे भाविकांनी गजबजून गेली होती.भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या.
श्रावण महिन्याचा पहिला सोमवार सर्वात महत्वाचा मानण्यात येतो.पहाटेची महाआरती करत मुख्य शिवलिंगावर दुग्धाभिषेक, डमरु आणि शंखनाद करण्यात आला.दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मंदिरात बैठक व पाण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहीती श्री हनुमान गावदेवी मंदिर ट्रस्ट कुडूसचे संचालक संतोष चौधरी यांनी दिली.पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त तालुक्यातील शिव मंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती. तालुक्यात श्रावणी सोमवारनिमित्ताने सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

