दिपक मोहिते,
” हल्लाबोल,”
राज्यात सध्या विदूषकांची कमी नाही…
राज्यमंत्री मंडळातील काही उपद्व्यापी मंत्र्यामुळे सरकारची अब्रू दररोज वेशीवर टांगली जात आहे.मुख्यमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस, या उपद्व्यापी मंत्र्यांना आवर घालण्याकामी प्रथमदर्शनी अपयशी ठरल्याचे पाहायला मिळत आहे.श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनला सुमित फॅसिलिटीज,या बदनाम कंत्राटी कंपनीकडून देणग्या मिळाल्या संदर्भात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.या फाउंडेशनचा सर्वेसर्वा असलेला अमित साळुंखे,हा सध्या झारखंड राज्याच्या अँटीकरप्शन ब्युरोच्या कोठडीची हवा खात आहे.त्याच्यावर ६ हजार कोटी रु.चा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आहे.हा अमित साळुंखे हा श्रीकांत शिंदे यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगण्यात येत आहे.तर दुसरीकडे एकाच खात्याच्या दोन मंत्र्यामध्ये चांगलीच जुंपली आहे.राज्याचे कृषिमंत्री सध्या रमीमध्ये मग्न आहेत.संजय गायकवाड लंगोट बांधून आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहेत.तर संजय शिरसाठ हे नोटा भरलेल्या बॅगा घेऊन फिरू लागले आहेत.
दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे-हिंजवडी भागातील आयटी पार्क दुसऱ्या राज्यात चालले म्हणून गळा काढताना भल्या पहाटे पाहायला मिळाले.पण गेली अनेक वर्षे सत्तेत असताना कंपन्या राज्याबाहेर का जात आहेत ? भल्या पहाटे आपण कामाला लागत असताना अशी परिस्थिती का निर्माण होते,याचा त्यांनी गांभीर्याने विचार करायला हवा.गेली अनेक वर्षे तुम्ही सत्तेत आहात,पुण्याचे तारणहार आहात,मग अशी स्थिती का निर्माण झाली ? या प्रश्नाचे उत्तर पवार दिले पाहिजे.हेच अजित पवार आता धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद देण्याची भाषा करू लागले आहेत.हा निव्वळ कोडगेपणा असून त्यांना पुन्हा मंत्रिपद दिल्यास देशमुख कुटुंबाच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे होईल.त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांची ही मनिषा पूर्ण होऊ देता कामा नये.पहाटे लवकर उठून कामाला लागणारे मंत्री म्हणून ओळख असणाऱ्या अजित पवार यांचा घोडा सध्या चौफेर उधळू लागला आहे,त्यांना फडणवीस यांनी वेळीच लगाम घातला पाहिजे.
एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटी गाठताना जे हवशे नवशे सोबत घेतले,तेच लोक आता शिंदेंना डोकेदुखी ठरू लागले आहेत.त्यांचा एक सहकारी मंत्री सरकारला ” भिकारी,” म्हणतो,याचा अर्थ सर्वसामान्यजनांनी कसा लावायचा ? अशा घटनांमुळे राज्यात सध्या गोंधळाचे वातावरण आहे.आपले मंत्रीपद टिकेल कि नाही,याची शाश्वती नसताना संजय शिरसाठ हे राज्यमंत्री माधुरी मिसाळ याना त्यांच्या अधिकाराविषयी खडे बोल सूनावतात,हे न्यायाला धरून नाही.सहा महिन्यांपूर्वी लाडक्या बहिणींचा उदो उदो करणाऱ्या संजय शिरसाठ यांनी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना किती अधिकार आहेत ? या विषयी झापणे,हे त्यांचे वागणे मर्यादा ओलांडणारे आहे.त्यामुळे या सर्व मंत्र्यांवर फडणवीस यांनी कारवाईचा बडगा उगारायला हवा.अन्यथा ” म्हातारी मेल्याचं दुःख नाही,पण काळ मात्र नक्कीच सोकावणार,”

