Author: दीपक मोहिते

नदीम शेख,पालघर खावडा ट्रान्समिशन प्रकल्पासाठी टीएलआर सर्व्हे वेगाने सुरू, मुसळधार पावसात पालघर जिल्ह्यातील वाडा,विक्रमगड, आणि जव्हार तालुक्यांसह ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात टीएलआर ( तालुका भूमी अभिलेख निरीक्षक ) सर्व्हे वेगात सुरू आहे.खवडा प्रकल्पासाठी जमीनभरपाई दरांची अंतिम ठरवण होण्याआधीचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. हा प्रकल्प रेसोनिया लिमिटेड ( पूर्वी स्टरलाइट पावर ट्रांसमिशन लिमिटेडचा पायाभूत सुविधा विभाग ) कंपनीकडून उभारण्यात येत आहे.या अंतर्गत ग्रीन एनर्जी ट्रान्समिशनसाठी जमिनीच्या हक्कसंपादनाचा आणि वीज वाहिन्या टाकण्याचा मार्ग खुला करण्याचे काम सुरू आहे.गुजरातमधील कच्छ प्रदेशातून,जेथे भारतातील सर्वात मोठे सौर आणि हरित ऊर्जा प्रकल्प आहे,वीज वाहतूक करण्यासाठी ही पायाभूत यंत्रणा उभी राहणार आहे.महाराष्ट्रात विजेच्या मागणीपेक्षा पुरवठा…

Read More

जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, जव्हार तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा न्याहाळे खुर्द येथे सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले.या उपक्रमात गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक येथील सेवानिवृत्त आदर्श शिक्षिका सुलभा मोहिनीराज जोशी,त्यांच्या कन्या मृदुला गोखले,आणि पुत्र आशिष जोशी यांनी पुढाकार घेतला. या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.तसेच,शाळा प्रवेश उत्सव आणि कैलासवासी मोहिनीराज जोशी ( माजी मुख्याध्यापक, गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक ) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यार्थ्यांसाठी लेझीम संचाचे वाटप करण्यात आले.या उपक्रमात तुलसी स्टील, सहकार नगर,पुणे यांच्याकडून पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी चटईचे वाटप करण्यात आले.त्याचप्रमाणे, पद्माकर भिसे…

Read More

दीपक मोहिते, शिंदे गटाचे आ.संजय गायकवाड मारहाण प्रकरणी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात… शिवसेनेचे ( शिंदे गट ) वादग्रस्त आ.संजय गायकवाड हे मंत्रालयाशेजारी असलेल्या कँटिंनच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी अडचणीत आले आहेत.आज घडलेल्या या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून,गायकवाड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.आ.गायकवाड यांच्यावर यापूर्वी देखील मारहाण केल्याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. संजय गायकवाड यांनी कँन्टीनमध्ये देण्यात येणाऱ्या जेवणाच्या दर्जाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.त्यांचा आरोप आहे की,कँन्टीनमधून देण्यात आलेली डाळ,ही शिळी आणि वास येणारी होती.याबाबत कँन्टीन व्यवस्थापकाशी त्यांचा वाद झाला.हा वाद इतका विकोपाला गेला की, गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला जबर मारहाण केली.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार,गायकवाड यांनी व्यवस्थापकाला धारेवर धरत कठोर शब्दांत सुनावले.…

Read More

सुरेश वैद्य,पालघर पर्यायी रस्त्याची दुरूस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन, नवली रेल्वे फाटक बंद केल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून पर्यायी मार्गाची तात्काळ दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नवली व परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे. नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड यांची भेट घेऊन त्यांना नागरिकांच्या होणार्‍या गैरसोयीची सविस्तर माहिती दिली. नवली रेल्वे फाटक परिसरात अनेक शाळा,तहसील कार्यालय,तलाठी कार्यालय, शासकीय आरोग्य केंद्र असुन येथे येणाऱ्या नागरिकांची सतत वर्दळ सुरु असते.पूर्व भागातील नवली,वेवूर, डॉ.आंबेडकरनगर, भीमाईनगर,कमारे,वरखुंटी, भोगोलेपाडा अशा अनेक गावपाड्यातील शेकडो ग्रामस्थ,असंख्य विद्यार्थी, नोकरदार यांना दैनंदिन कामासाठी पूर्व-पश्चिम रहदारीचा एकमेव जवळचा मार्ग म्हणजे नवली रेल्वेफाटक असल्याचे या शिष्टमंडळांने यावेळी निदर्शनास आणून दिले.सदर…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” अर्थविभागाच्या दिशाहीन व आत्मकेंद्रित कारभारामुळे राज्य आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर… सध्या अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या मंत्र्यांची एक महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ” वर्षा,” येथे ही बैठक झाली.या बैठकीसाठी भाजपचे मंत्री आणि वरिष्ठ नेते देखील उपस्थित होते.या बैठकीमध्ये मंत्र्यांनी गेल्या सहा महिन्यात केलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला.राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे,असे संकेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत दिले. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या निवडणुकांबाबत राज्याच्या जनतेमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.गेल्या आठवड्यात राज व उद्धव या ठाकरे बंधुचा विजयी मेळावा झाला.या मेळाव्यानंतर…

Read More

सचिन पाटील,वसई, नालासोपारा येथे वारीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, नालासोपारा यंग स्टार ट्रस्टतर्फे आयोजित आषाढी एकादशी निमित्त ” वारी विठ्ठलाची,” या उपक्रमाला भर पावसात नालासोपाऱ्याच्या चे नागरिकांनी प्रतिसाद दिला. ” विठ्ठल माझा….. मी विठ्ठलाचा,” या नादाने संपूर्ण नालासोपारा शहर दुमदुमले.बार्शी येथील वारकरी गुरुकुलमधील लहान वारकऱ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.राजीव गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालावर तमाम वारकऱ्यांना उत्साहीत केले. यावेळी निघालेल्या दिंडीत लहान मुले,शालेय विद्यार्थी,तरुण,ज्येष्ठ नागरिकानी सहभागी झाले होते.यातील काही मुलांनी विठ्ठल रखुमाई संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम,वासुदेवाची वेशभूषा केली होती. सदर कार्यक्रमास माजी आ.क्षितीज ठाकूर इतर सहकाऱ्यासह सहभागी झाले होते.तसेच सदर कार्यक्रमास अतुल साळुंखे, किशोर पाटील,नरेश जाधव, शुभांगी गायकवाड हे उपस्थित होते.सदर…

Read More

वसंत भोईर,वाडा वाड्यात मनसे व शिवसेनेकडून ( उबाठा ) सरकारचा निषेध, मीरा – भाईंदरमध्ये एका गुजराती व्यापा-याला मारहाण केल्यावरून मोर्चा काढण्यात आला होता.त्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी आज मीरा भाईंदर शहरात मराठी एकीकरण समिती व महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना यांच्यातर्फे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारून कार्यकर्त्यांची धडपकड केल्याच्या निषेधार्थ वाड्यात मनसे व शिवसेनेकडून वाडा बसस्थानकासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली., सरकार व पोलीस यांचा निदर्शकानी जोरदार निषेध केला.कार्यकर्त्यांनी यावेळी हाताला काळ्या रिबीनी बांधल्या होत्या. या आंदोलनात मनसेचे तालुकाप्रमुख कांतीकुमार ठाकरे,शिवसेना उबाठा पक्षाचे तालुकाप्रमुख निलेश पाटील, मनसे व शिवसेना पक्षाचे पदाधिकारी दिपक ठाकरे,…

Read More

जव्हार येथे वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रम संपन्न. जव्हार प्रतिनिधी- श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा ( ता. अलिबाग,जि.रायगड ) यांच्या प्रेरणेने आणि सौजन्याने तसेच श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मरणार्थ श्री बैठक कळमविहिरा येथील सदस्यांनी वृक्षारोपण व संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम राबवला.या उपक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे निसर्गाशी नाळ जुळवणारा,भावी पिढीला शुद्ध पर्यावरण देण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. पर्यावरण पूरक वृक्षांचे रोपण करून निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यात आला.यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून ग्रामपंचायत शिरोशी सरपंच कु.योगिता यशवंत शेंडे,उपसरपंच दीपक शंकर पवार,प्रमोद गोविंद शेंडे, तुकाराम गणपत मुकणे,मोहन कामडी आदी मान्यवर उपस्थित होते.श्री बैठक सदस्य,ग्रामस्थ तसेच जयेश्वर विद्यामंदिर,डेंगाचीमेट येथील विद्यार्थीनी या…

Read More

दीपक मोहिते, मनसेचा भव्य मोर्चा ; सरकारची अब्रू गेली… आज मनसेने मीरा-भाईंदर शहरामध्ये मोर्चाचे आयोजन केले होते.पण त्यास पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे मनसेच्या सैनिकांचा संताप अनावर झाला व मराठी भाषिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले.सकाळी पोलीस व मनसे सैनिक यांच्यात सुमारे दोन तास झटापट झाली.मनसे सैनिक मागे हटण्याचे नाव घेत नव्हते.अखेर सरकारला झुकावे लागले व त्यांनी मोर्चाला परवानगी दिली. आज पहाटे मनसेचे नेते अविनाश जाधव यांना व त्याच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांनी धरपकड केली.या घटनेनंतर आज सकाळी मराठी भाषिकांचा मीरा रोड परिसरात जनसागर लोटला.सुरुवातीला पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली होती,पण अचानक त्यांनी दिलेली परवानगी रद्द केली.या घडामोडीमुळे पोलीस यंत्रणेवर सरकारचा दबाव असल्याचे स्पष्ट झाले.त्यानंतर मनसेचे…

Read More

दीपक मोहिते, पळा,पळा,कोण पुढे पळे तो… राजकारणात आता नीतिमत्ता,तत्व विचारधारा व स्वाभिमान,यांस काडीचीही किंमत उरली नाही.सत्ता प्राप्त करण्यासाठी ” काय पन,” ही नवीन संस्कृती उदयाला आली आहे.भाजपने तर ” कंबरेचे सोडून डोक्याला बांधले, ” आहे.यापूर्वी काँग्रेसने देखील हेच केले होते.त्यांच्या काळातच आयाराम – गयाराम संस्कृतीला खतपाणी घालण्यास सुरुवात झाली होती.आता फक्त बाजू बदलली गेली आहे.त्या काळात भाजप ” आम्ही इतरापेक्षा वेगळे,” ( party with difference,) अशी पोपटपंची करत असत,आज त्याच भाजपने मळकटलेली अंतर्वस्त्रे धुण्यासाठी भलेमोठे वॉशिंग मशीन आणले आहे. त्याकाळी काँग्रेसजनांना सत्तेशिवाय श्वास घेववत नव्हता,आज तशीच स्थिती भाजपची झाली आहे.पक्षांतर कायदा भाजप व त्यांच्या मित्रपक्षांनी मोडीत काढला आहे.दर दिवशी इकडून…

Read More