Author: दीपक मोहिते

… आणि खडतर प्रवासाची पायपीट थांबली, गारगाव व डाहे शाळेतील विद्यार्थ्यांना सायकलची भेट   वाडा :दि.१३ पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातून अलीकडे समोर आलेल्या बातम्यांमध्ये, विद्यार्थी नद्या ओलांडून आणि कठीण डोंगरी व दुर्गम रस्त्यांवरून शाळेत जात असल्याचे दिसून आले. अनेक विद्यार्थी आजही शाळेत पोहोचण्यासाठी दररोज ३ कि.मी.हून अधिक अंतर पायी चालत प्रवास करतात. अशा पार्श्वभूमीवर जुनून फाउंडेशनने या भागातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या उपक्रमाअंतर्गत, १२ जुलै २०२५ रोजी जुनून फाउंडेशनच्या सहकार्याने जिल्हा परिषद शाळा गारगाव आणि जिल्हा परिषद शाळा डाहे (जिल्हा: पालघर) येथील विद्यार्थ्यांसाठी सायकल वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वाडा तालुक्यातील या ग्रामीण भागातील जे विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” मॅडम,महानगरपालिका व नगरविकास विभागाची मिलीभगत आहे… काल विधानसभेत नालासोपाऱ्याच्या आमदारांनी वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती.त्यामध्ये त्यांनी आपल्या भाषणात तीन मुद्दे उपस्थित केले.ओसी न मिळालेल्या इमारतींना पाणी देण्यात यावे,अशा पद्धतीने बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना काळ्या यादीत टाकणे व भविष्यात या बिल्डर्सना पुन्हा बांधकाम परवानग्या देण्यात येऊ नये,असे या तीन महत्वाच्या मुद्द्यांचा समावेश होता.हे तिन्ही मुद्दे सर्वसामान्य जनतेच्या हिताशी संबंधित आहेत.पण त्यांनी ज्या बिल्डरांनी या इमारती बांधल्या त्यांना जबर दंड ठोठावला पाहिजे अशी मागणी देखील करायला हवी.सरकारकडून तशी कारवाई झाली तर या तालुक्याला लागलेला कॅन्सर कायमचा नाहीसा होऊ शकतो.त्याच बरोबर त्यांनी बोगस ओसीचा प्रश्न…

Read More

दीपक मोहिते, अनधिकृत बांधकामाचा हव्यास, वसई,विरार परिसर दरवर्षी जलमय का होतो ? आम्ही वसईकरांनी जगायचं तरी कसं ? वसई,विरार,नालासोपार्‍याचा भाग एकेकाळी हरितपट्टा म्हणून ओळखला जात होता. या भागातील ताज्या भाज्या, फळे,फुले याची शेती / बागायती करणाऱ्या शेतकऱ्यांना मुंबईची बाजारपेठ जवळचहोती. मुंबईपासून अवघ्या पन्नास कि.मी.अंतरावर असलेल्या वसई-विरारच्या हरितपट्ट्याला पर्यावरणाच्या दृष्टीने विशेष महत्त्व होते. समुद्र,खाड्या,नारळी पोफळीच्या बागा,शेती, बागायती,पानवेली,वसईची केळी,फुले व भाज्या,ही या भागाची खासियत होती. तथापि,गेल्या तीन दशकांत या हरित पट्ट्यात अनिर्बंध बांधकामे उभी राहिली.चाळी, इमारतींची नवनवी निवासी संकुले आकार घेऊ लागली. त्यात समुद्र किनारे,खाड्या, खारफुटीची जंगले,मिठागरे व गावेच्या गावे नष्ट झाली.या हरितपट्ट्यात सिमेंट कॉंक्रिटची जंगले उभी राहिली. एकेकाळी शांत,सुंदर,अशी ओळख असलेल्या…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” एकनाथ शिंदे अडचणीत ; त्यांच्या गटाचे अनेक मंत्री व आमदारांचे पाय खोलात… महायुती सरकारमधील संजय शिरसाट,संजय गायकवाड, संजय राठोड व भरत गोगावले,या चार सहकाऱ्यामुळे शिंदे सध्या चांगलेच अडचणीत आले आहेत.शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाठ व संजय राठोड हे दोन मंत्री आर्थिक गैरव्यवहार,तर आ.संजय गायकवाड हे गुंडगिरी व भरत गोगावले मंत्रिपदावर असताना रस्त्यावर उतरून आंदोलन करणे व टायर जाळणे,असे प्रकार करत असल्यामुळे दस्तूरखुद्द मुख्यमंत्री फडणवीस शिंदे यांच्यावर नाराज झाले आहेत.त्यांनी शिंदे गटाच्या संजय राठोड यांना अलीकडेच दणका दिला आहे.मंत्र्यांवर होणाऱ्या आरोपांच्या मालिकांमुळे धनंजय मुंडे यांच्यानंतर मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा कोणाचा क्रमांक लागणार याची कुजबूज आता आमदारांमध्येच सुरू झाली…

Read More

दीपक मोहिते, ” गंडांतर,” पंतप्रधान मोदी विरुद्ध सरसंघचालक मोहन भागवत ; ट्वेन्टी – ट्वेंटीची मॅच सुरू… नागपूर येथे ९ जुलै रोजी झालेल्या संघाचे ज्येष्ठ नेते मोरोपंत पिंगळे यांच्या पुस्तक प्रकाशन प्रसंगी सरसंघचालक मोहन भागवत यांनी पिंगळे यांची आठवण काढताना ते म्हणाले,” मी जेव्हा उभा राहतो,तेंव्हा लोक माझ्यावर हसायचे,तेंव्हा मला वाटायचं की लोक मला आता गांभीर्याने घेत नाहीत.तुम्ही शाल दिली,पण मला त्याचा अर्थ माहीत आहे.जेंव्हा वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी खांद्यावर शाल पडते,याचा अर्थ आपण आता म्हातारे झालो आहोत आणि आता आपण बाजूला झाले पाहिजे,याची जाणीव होते.त्याच दिवशी केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा अहमदाबाद येथे झालेल्या ” सहकार संवाद,” या कार्यक्रमात बोलताना…

Read More

जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे माणुसकीची छत्री,आणि वृक्षलागवड कार्यक्रम संपन्न, जव्हार तालुक्यातील रामनगर कातकरीपाडा या गावाच्या शाळेत यारी दोस्ती फाऊंडेशन पालघरतर्फे माणुसकीची छत्री, शैक्षणिक आणि एक सदस्य एक वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न झाला. यारी दोस्ती ग्रुप मधील सर्व मित्रांनी निधी जमा करून निस्वार्थ भावनेने गरजूंना मदत करण्याचे ठरवले.या निधीमधून माणुसकीची छत्री म्हणून या पावसाळ्यात पालघर जिल्ह्यातील गरजू व्यक्तीचा शोध घेवून त्यांना छत्री वाटप केले.शाळेतील मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेत उत्कृष्ट चित्र रेखाटणाऱ्या मुलांना ग्रुपतर्फे बक्षीसे देवून गौरवण्यात आले.त्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच पर्यावरण संरक्षण म्हणून सर्व सदस्यांनी या पावसाळ्यात एक वृक्ष लागवड करून…

Read More

जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे लोकसंख्या दिन साजरा, जव्हार तालुक्यातील गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथे काल जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून अर्थशास्त्र विभागातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. एम.आर.मेश्राम आणि उपप्राचार्य डॉ.सुरेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या कार्यक्रमात इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ.शैलेश बगडाने यांनी प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जागतिक लोकसंख्येच्या वाढत्या प्रमाणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्या सोडवण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांचा सखोल ऊहापोह केला.त्यांनी विद्यार्थ्यांना समाजातील जबाबदार नागरिक म्हणून लोकसंख्या नियंत्रणाबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात वाणिज्य विभागाचे प्रा.महेंद्र जाधव आणि प्रा.प्रताप देवरे यांनीही आपल्या भाषणातून लोकसंख्या नियंत्रणच्या…

Read More

दिपक मोहिते, ” निवडणूक रणसंग्राम,” स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार… राज्य निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्यात घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त माध्यमाच्या हाती आले आहे.राज्यातील ६७६ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या गेल्या पाच वर्षांपासून रखडल्या आहेत.गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने या निवडणूका घेण्यासंदर्भात आयोगाला निर्देश दिल्यानंतर निवडणूक आयोगाची यंत्रणा सक्रिय झाली आहे.या निवडणुका सर्वसाधारणपणे ऑक्टो.ते डिसें.दरम्यात होतील,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी आयोगाला ६ लाख ५० हजार ईव्हीएम मशिन्सची आवश्यकता आहे.पण त्या मशीन्स सध्या उपलब्ध नसल्यामुळे आयोग या निवडणुका तीन टप्यात घेण्याचा विचार करत आहे. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी या निवडणुकीसाठी १…

Read More

दीपक मोहिते, “हल्लाबोल,” भाग क्र.२,( अंतिम ) जनसुरक्षा विधेयक २०२५ ; मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना गुंडाळले, काल कोणताही गोंधळ न होता,जनसुरक्षा विधेयक २०२५ बहुमताने संमत झाले.मार्क्स.कम्यु.पक्षाचे कॉ.विनोद निकोले या एकमेव आमदाराने या विधेयकाला सभागृहात विरोध केला.विरोधी पक्षाचे सर्व आमदारांनी या विधेयकाला मूक संमती दिली.त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीप्रमाणे शब्दांचा धूर्त खेळ करत विरोधकांना आपल्यासमोर लोटांगण घालायला लावले. या विधेयकातील अनेक तरतुदी,या लोकशाहीला मारक असून कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या नावाखाली सरकारला अमर्याद अधिकार मिळणार आहेत.”अर्बन नक्षलवाद,” वाढत असल्याची भिती दाखवत सरकारने हे विधेयक आणले आहे.”अर्बन नक्षलवाद रोखणे,” हा एकमेव उद्देश असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत…

Read More

सचिन पाटील,विरार विवा महाविद्यालय येथे ” अकाउंटिंग म्युझियम ऑफ इंडिया,” चे भव्य उद्घाटन विवा महाविद्यालयाचे यंदाचे वर्ष हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे.विवा महाविद्यालय ही फक्त एक शैक्षणिक संस्था नसून पालघर जिल्ह्यातील आजच्या घडीला गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे,विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणारे, उद्योजक निर्माण करणारे, विविध व्यवसायिक अभ्यासक्रम शिकवणारे नामांकित महाविद्यालय आहे. विवा महाविद्यालय आणि द इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंटस् ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार क्षितीज ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच गुरू पौर्णिमादिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमांतर्गत “अकाउंटिंग म्युझियम ऑफ इंडिया” या अनोख्या आणि ऐतिहासिक संग्रहालयाचे भव्य उद्घाटन पार पडले. या आगळ्यावेगळ्या म्युझियमचे उद्घाटन आयसीए संस्थेचे पदाधिकारी केतन साईया ( चेअरमन,डबल्यू आईआरसी…

Read More