Author: दीपक मोहिते

तलासरी प्रतिनिधी, पूरग्रस्त वडवली गावाची पालकमंत्र्यांनी केली पाहणी, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी तलासरी तालुक्यातील पूरग्रस्त वडवली गावाची पाहणी करून बाधित शेतकऱ्याकडून नुकसानीची माहिती घेतली.यावेळी त्यांच्या सोबत खा.हेमंत सावरा, आ.राजेंद्र गावित,मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे,जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड,तलासरी तहसीलदार अमोल पाठक,वडवली गावाचे सरपंच प्रमोद ओझरे,माजी सभापती नंदू हाडळ,त्यांच्या सह अनेक अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते तलासरी भागात गेल्या आठवड्यात झालेला मुसळधार पाऊस आणि कुरझे धरणाचे चे दरवाजे उघडले होते.त्यामुळे वेरोली नदीला पूर येऊन नदी काठच्या वडवली,सवणे,वंकास गावातील ८९ घरात पाणी शिरून नुकसान झाले तर २५ घरांची पडझड झाली होती. यामदध्ये वडवली गावातील नवापाडा -२७ ओझरपाडा – २६, हडळपाडा -१३,सवणे पाटिलपाडा…

Read More

वाडा प्रतिनिधी, ग्रीन सोल फाउंडेशनच्या ब्रँड अँम्बेसेंडरपदी मोहन पाटील, वाडा तालुक्यातील चिंचघर येथील रहीवासी व पेशाने शिक्षक असलेले मोहन पाटील (गुरुजी) यांची मुंबई येथील एका कार्यक्रमात ग्रीन सोल फाउंडेशनच्या ब्रँड अँम्बेसिडरपदी निवड करण्यात आली.यावेळी फाउंडेशनतर्फे पाटील यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. ग्रीन सोल फाउंडेशनच्या ब्रँड अँम्बेसिडरपदी झालेली निवड ही त्यांची प्रतिभा,मेहनत आणि समर्पणाचे हे एक उत्तम फळ आहे.मोहन पाटील हे गेली ३० वर्ष आदिवासी भागात प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत आहेत. ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ते अहोरात्र झटत असतात. गेल्या काही वर्षांपासून ग्रीन सोल फाउंडेशनमध्ये कोऑडिनेटर म्हणून काम करत असताना पालघर व ठाणे जिल्ह्यातील हजारो…

Read More

जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन मोठ्या उत्साहात साजरा, जव्हार तालुका ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे आयोजित जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन व संस्थेचा वर्धापन दिन संस्थेचे अध्यक्ष विनायक शेळके यांच्या अध्यक्षतेखाली, “नवतरुण” प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन व साने गुरुजी यांच्या ‘खरा तो एकचि धर्म’ या प्रार्थनेने सुरुवात झाली. संस्थेचे दिवंगत सभासद यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली. वर्धापनदिना निमित्त स्मरणिका २०२५ प्रकाशन करण्यात आले.प्रा. हर्षद मेघपुरिया सर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह पाहून मला माझ्या वडिलांची आठवण झाली.ते या संस्थेचे सभासद होते व ते आनंदाने जगले.आपण सर्वांनी संस्थेच्या माध्यमातून जो एकोपा निर्माण…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” सरन्यायधीशांवर हल्ला ; हा संविधानाच्या मूलभूत गाभ्यावर हल्ला, आजवर धर्माने न्यायदान क्षेत्र वागळता इतर सर्व क्षेत्रात घुसखोरी केली.काल घडलेल्या घटनेने न्यायालये देखील आता सुटू शकलेली नाहीत,हे स्पष्ट झाले आहे. आज सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीशांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे न्यायालयात काही काळ गोंधळ उडाला होता.या वकिलाला बाहेर काढताना, त्याने ” सनातनचा अपमान भारत सहन करणार नाही, ” असं म्हटलं आहे. ही घटना घडत असताना सरन्यायाधीश गवई मात्र शांत होते आणि त्यांनी खटल्याची सुनावणी तशीच सुरू ठेवली. तो बूट सरन्यायाधीश आणि न्यायमूर्ती चंद्रन यांना लागून त्यांच्या मागच्या बाजूला पडला. नंतर त्या वकिलाने न्यायमूर्तींची माफी मागितली आणि सांगितलं…

Read More

दीपक मोहिते, बविआचा मनपा मुख्यालयावर धडक मोर्चा, वसई,नालासोपारा व वसई शहरातील रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात काल बहुजन विकास आघाडीने नालासोपाऱ्याचे माजी आ. क्षितिज ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला.यावेळी त्यांनी आपल्या भाषणात मनपा प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले.रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यामुळे लोकांचे जीव जात असून अधिकाऱ्यांना त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही,असा थेट आरोप त्यांनी यावेळी केला. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास हा मोर्चा काढण्यात आला होता.या मोर्च्यात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.गणेशोत्सव व नवरात्रीच्या काळात नागरिकांना या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागला.या तीन शहरातील रस्त्याची अवस्था ” रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते,” अशी बिकट अवस्था झाल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट…

Read More

दीपक मोहिते, रामनाथ गोयंका ; थोर पत्रकार व स्वातंत्र्यसैनिकाला शतशः प्रणाम, इंडियन एक्‍स्प्रेस वृत्तपत्रसमूहाचे संस्थापक अध्यक्ष आणि स्वातंत्र्य चळवळीतील ज्येष्ठ नेते रामनाथ गोयंका यांचा आज स्मृतिदिन असुन पत्रकारिता क्षेत्रात तो उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होईल किंवा नाही, हे सांगता येणार नाही.कारण हल्लीची गोदी मिडिया या थोर पत्रकार व स्वातंत्र्यसैनिकाची दखल घेईल,असे वाटत नाही. रामनाथ गोयंका यानी आणिबाणीच्या काळात सरकारशी जो लढ़ा दिला,त्याची नोंद जगभरातील देशाच्या माध्यमानी त्याकाळी घेतली होती.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यानी आपला वृत्तपत्र समूह नेटाने चालवला.सरकारने प्रसिद्धि माध्यमावर लादलेली सारी बंधने त्यानी मोठ्या धाडसाने झुगारली व आपल्या व्यवसायाशी ते आपल्या पत्रकारितेशी कायम प्रामाणिक राहिले.त्याकाळात सरकारने माध्यमांची प्रचंड गळचेपी चालवली होती,परंतु…

Read More

दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” कोणाच्याही कोंबड्याच्या आरवण्याने एकदाचे उजडू द्या… स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष सध्या जागे झाल्याचे पाहायला मिळत आहे.सत्ताधारी पक्षाची मंडळी सरकारमधील आपल्या नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन मागण्याची निवेदने देत सुटले आहेत.तर कालचे सत्ताधारी आता विरोधात आल्यानंतर मोर्चे काढू लागले आहेत.सदर बाब वसईकर जनतेसाठी सुखद असली तरी त्यामधून नक्की काय निष्पन्न होणार ? हे येणाऱ्या काळात वसईच्या जनतेला अनुभवायला मिळणार आहे.या सर्व घडामोडीसंदर्भात करदात्यांनी फारसे मनाला लावून घेता कामा नये.कारण हे सारे उपद्व्याप ” राजकीय कुरघोडी,” या सदरात मोडत असतात. असो,कुणाच्याही कोंबड्याच्या आरवण्याने एकदाचे उजडू द्या,अशा निर्णयाप्रत वसई – विरारची जनता आली आहे.या उपविभागातील अंतर्गत रस्त्याची…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.२६, वर्षानुवर्षे साथ देणारा हा प्रभाग बविआच्या हातून निसटू शकतो… प्रभाग क्र २६ हा सुशिक्षित असा प्रभाग आहे,या प्रभागाचा आनंद नगर,स्टेला v अन्य काही परिसर व्यापारी क्षेत्र म्हणून ओळखला जातो.हा परिसर रेल्वे स्थानकाला लागून असल्यामुळे येथे व्यापार – उदिमाला सुगीचे आले आहेत,आजही ते व्यापारी वैभव टिकून आहे. हा प्रभाग गेली अनेक वर्षे बहुजन विकास आघाडीच्या कायम पाठीशी उभा राहिला.पण सध्या तशी परिस्थिती उरलेली नाही.त्यांच्या एका बड्या नेत्याने गेली अनेक वर्षे पक्षाच्या दैनंदिन कामापासून स्वतःला दूर राखले आहे.अंतर्गत वाद व मतभेदापायी येथील नागरिकांमध्ये लोकप्रिय असलेला हा नेता गेली अनेक वर्षे राजकीय पटलावरून नाहीसा झाला आहे.त्याचा…

Read More

दीपक मोहिते, वसईतील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी तातडीने मान्य,दुरुस्तीच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरु, वसईच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या आ.स्नेहा दुबे पंडित यांनी वसईतील महत्वाचे रस्ते,उड्डाणपूल व रेल्वे ओव्हर ब्रिजच्या कामांना गती देण्यासाठी ३० सप्टें.२०२५ रोजी वर्षा या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेमध्ये वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण एम.एम.आर.डी.ए.तर्फे करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले होते. तथापि,याविषयीची प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात करणे व काम पूर्ण करणे या दरम्यान लागणाऱ्या कालावधीत नागरिकांचा त्रास कमी व्हावा,यासाठी तातडीने हे रस्ते किमान वाहतूक योग्य करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे मुख्यमंत्री यांनी…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.२५, मिश्र लोकसंख्येचा प्रभाग बविआ राखणार का ? हा प्रभाग वसई गाव म्हणून ओळखला जातो.स्थानिक व बाहेरून स्थलांतरीत झालेले नागरिक,अशी रचना या प्रभागाची आहे.हिंदू,ख्रिस्ती व मुस्लिम अशी मिश्र लोकवस्ती या प्रभागात पाहायला मिळते.शहरी भागाला लागून असलेल्या परिसरात टोलेजंग इमारती व गावात छोटेखानी कौलारू घरे असे या प्रभागाचे स्वरूप आहे.महानगरपालिका स्थापन होण्यापूर्वी येथे सुमारे अनेक वर्षे वसई नगरपालिका अस्तित्वात होती. या नगरपालिकेच्या काळात अनेक नागरी समस्या भेडसावत होत्या,त्याचे प्रमाण हल्ली कमी झाले आहे.मात्र या प्रभागाचा नियोजनबद्ध विकास मात्र होऊ शकला नाही.त्यामुळे अरुंद रस्ते,वाहतूक कोंडी,मार्केट,वाहनतळ व अन्य नागरी समस्या आजही ” जैसे थे,” स्थितीच आहेत.नगरपरिषद काळात…

Read More