तलासरी प्रतिनिधी,
पूरग्रस्त वडवली गावाची पालकमंत्र्यांनी केली पाहणी,
पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी तलासरी तालुक्यातील पूरग्रस्त वडवली गावाची पाहणी करून बाधित शेतकऱ्याकडून नुकसानीची माहिती घेतली.यावेळी त्यांच्या सोबत खा.हेमंत सावरा, आ.राजेंद्र गावित,मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे,जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड,तलासरी तहसीलदार अमोल पाठक,वडवली गावाचे सरपंच प्रमोद ओझरे,माजी सभापती नंदू हाडळ,त्यांच्या सह अनेक अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते
तलासरी भागात गेल्या आठवड्यात झालेला मुसळधार पाऊस आणि कुरझे धरणाचे चे दरवाजे उघडले होते.त्यामुळे वेरोली नदीला पूर येऊन नदी काठच्या वडवली,सवणे,वंकास गावातील ८९ घरात पाणी शिरून नुकसान झाले तर २५ घरांची पडझड झाली होती.
यामदध्ये वडवली गावातील नवापाडा -२७ ओझरपाडा –
२६, हडळपाडा -१३,सवणे पाटिलपाडा -१२,वडवली सोनारपाडा – ७,वंकास – ८ घरामध्ये दीड फूट पाणी घरात शिरून घरातील समानासह, अन्न धान्याचेहीनुकसान झाले.
पालघर जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी पाहणी केली होती आणि त्यानंतर पालकमंत्री गणेश नाईक यांनी पाहणी करून वडवली नवापाडा आणि ओझरपाडा येथील नुकसानग्रस्ताकडून माहिती घेतली व मदतीचे आश्वासन दिले.यावेळी नियमातील अटी शिथिल करून बाधिताना शासनाकडून जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करू,असे त्यांनी आश्वासन दिले.

