- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर : खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार….
- ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज,
- भारतीय संविधानाचे देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान,
- मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात,
- प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक….
- अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली,
- ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार, कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता,
- कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,
Author: दीपक मोहिते
जव्हार,प्रतिनिधी, झाप ग्रा.पं.च्या ग्रामसभेत विकासाचे अनेक ठराव संमत, जव्हार तालुक्यातील झाप ग्रामपंचायतची ग्रामसभा सरपंच एकनाथ दरोडा यांच्या अध्यक्षतेखाली आनंदी वातावरणात पार पडली.या ग्रामसभेत शिक्षण,आरोग्य, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकी यांना प्राधान्य देणारे अनेक ठराव मंजूर करण्यात आले. या ग्रामसभेत नाशिक येथे सुरू असलेल्या रोजंदारी शिक्षकांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यात आला. शिक्षकांना बाह्य स्त्रोतांमार्फत आदेश न देता थेट रोजंदारीवरच नियुक्ती द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रातील अन्यायकारक मध्यस्थी टळून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची हमी मिळणार आहे.तसेच शालेय मुलांना मिळणारे मध्यान्ह भोजन पुन्हा शाळांमधूनच देण्यात यावे,असे ठरवण्यात आले.या निर्णयामुळे मुलांना ताजे व पौष्टिक अन्न मिळणार असून,स्थानिक स्वयंपाकी महिलांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार…
दीपक मोहिते, निर्मळ येथे २३ व २४ ऑगस्ट रोजी दोन दिवसीय हवामान परिषद २०२५ चे आयोजन, आपली वसई, आपला विकास आणि युथ फॉर युनिटी अँड व्हॉलंटरी अॅक्शन (युवा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २३ व २४ ऑगस्ट २०२५ रोजी समाज सेवा मंडळ हॉल,निर्मल नाका,वसई ( पश्चिम ) येथे हवामान परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. वसई-विरारचे होणारे नागरीकरण,शेती,मासेमारी व उपजीविकेवर होणारा परिणाम,वसईतील लोकांचा सततचा पर्यावरण विषयक सुरु असलेला संघर्ष याबाबत चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.शहराच्या लोकसंख्येचा मोठा वाटा असलेल्या श्रमिकांच्या वस्त्यांना बहुतेकदा हवामानाच्या परिणामांचा सर्वात आधी सामना करावा लागतो.वारंवार येणारे पूर, अपुरा ड्रेनेज किंवा उपजीविकेच्या जागा गमावल्यामुळे बांधकाम, बाजारपेठ किंवा लघु उद्योगांमध्ये…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” शिंदे गटाचा बालेकिल्ला उध्वस्त करण्यासाठी भाजपचे फोडाफोडीचे राजकारण सुरू, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून फोडाफोडीच्या राजकारणाने चांगलाच वेग घेतला आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून या खेळीला प्राधान्य देण्यात येत आहे.निवडणुका जाहीर होण्यापूर्वी फोडाफोडीचे राजकारण करून राजकीय पक्षांना खिळखिळे करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.पालघर जिल्ह्यात अशाप्रकारची मोहीम सुरू झाली आहे.विरोधी पक्षासह मित्र पक्ष देखील त्यांच्या नजरेतून सुटलेले दिसत नाहीत.त्यांच्या या खेळीचा दणका मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाला नुकताच बसला आहे. काल पालघर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम,तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार गट ) नंदकुमार पाटील,त्यांच्या पत्नी रेश्मा पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सारिका निकम,शिरगावचे…
अनंत संख्ये, बोईसर तारापूर येथे वायुगळती ; चौघाचा मृत्यू तर दोन जण जख्मी, काल दुपारी बोईसर – तारापूर औद्योगिक वसाहतीमधील मेडले फर्मास्युटिकल लिमिटेड या केमिकल कंपनीच्या युनिट क्र.एफ – १३ च्या नायट्रोजन रिऍक्शन टाकीतून गॅसगळती होऊन चार कामगार मृत्यूमुखी पडले.तर अन्य दोघेजण गंभीर झाले. दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान ही दुर्घटना घडली असुन कंपनीत कामकाज सुरु असताना अचानक ही गळती सुरु झाली.या दुर्घटनेत कल्पेश राऊत,वय ४३ राहणार मु.पो चिंचणी,ता. डहाणू,बंगाली ठाकूर,वय ४६, राहणार-अथमलगोला,पटना ( बिहार ), धीरज प्रजापती,वय -३१, राहणार – शिवाजीनगर, सालवड ( बोईसर ) कमलेश यादव,वय-३१ राहणार,शिवाजीनगर,सालवड ( बोईसर ),मुळगाव – सेठाकोली,पोस्ट – बैजाबारी रौनापार,आजमगड ( यू.पी.) या…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आता सुरू झालीय,श्रेयवादाची जीवघेणी लढाई… वसई-विरारच्या नागरिकांचे सध्या कौतुक करावे,तेवढे थोडे आहे.कारण,या उपप्रदेशातील जनता खूप सोशिक आहे.गेली अनेक वर्षे हालअपेष्टा सहन करत या उपप्रदेशातील लाखो कुटुंबे आपले जीणे जगत आले आहे.दरवर्षी उन्हाळ्यात निर्माण होणारी भीषण पाणीटंचाई,मरणप्राय वेदना देणारी वाहतूक कोंडी,अनधिकृत फेरीवाल्यांचे पदपदावरील अतिक्रमण,अनधिकृत रिक्षा व्यवसाय व मनमानी पद्धतीने व्यवसाय करणारे मुजोर रिक्षाचालक,भ्रष्ट लोकप्रतिनिधी ( सत्ताधारी व विरोधक ) हप्तेवसुलीसाठी वखवखलेले पोलीस,अश्मयुगातील रस्त्यांना लाजवणारे खड्डे पडलेले रस्ते,अनधिकृत बांधकामाचा जीवघेणा सुळसुळाट,अनधिकृत बांधकामात सर्वसामान्य गरजूची होत असलेली फसवणूक,मड्याच्या टाळूवरील लोणी ओरबडणारे मनपाचे अधिकारी व ठेकेदार,या सगळ्यांना सहन करण्याची ऊर्जा वसईकर जनतेच्या ठायी ठायी आहे.ही ऊर्जा त्यांच्यामध्ये कुठून येते ?…
जव्हार प्रतिनिधी, मुसळधार पावसामुळे पिंपळशेत-खरोंडा पूल गेला वाहून, जव्हार तालुक्यात दोन दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत.अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवरील अरुंद पुलांवर पाणी आल्यामुळे अनेक गावातील जनजीवन विस्कळीत झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे गेल्या दोन दिवसापासून विद्यार्थी तसेच ग्रामस्थांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागले.पिंपळशेत खरोंडा परिसरातील खरोंडा, माडवीहिरा,हुंबरण या गावांना जोडणारा पूल पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेला. परिणामी या मार्गाने येजा करणारे शालेय विद्यार्थी, शेतकरी व ग्रामस्थांचे हाल झाले. हेदीचापाडा येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच शेतकऱ्यांना शेतीकामामध्ये अडचणी येत आहेत.ग्रामस्थांनी आठवण करून दिली की, सन २०२२-२३ या वर्षी २७ जुलै २०२३…
जव्हार, प्रतिनिधी, जव्हार येथे विद्यार्थिनींना मौलिक मार्गदर्शन, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, गोरठण येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी माl अशोक पाटील ( जि.प. पालघर ) यांनी नुकतीच भेट दिली.यावेळी विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांना जीवनात निश्चित ध्येय ठेवण्याचे व आत्मविश्वासाने वाटचाल करण्याचे मौलिक मार्गदर्शन केले.या प्रसंगी त्यांनी विद्यार्थिनींना स्वावलंबन, इंग्रजी संवादकौशल्य, संगणकाचा वापर आणि सततच्या चाचण्यांमधून आत्मविश्वास वाढवणे, याविषयी महत्त्व पटवून दिले. दर शनिवारी इंग्रजी संवादाचा सराव करणे, संगणकाचा अधिकाधिक वापर करणे, इंग्रजी,गणित व विज्ञान या विषयांच्या दर महिन्याच्या चाचण्या घेणे, स्वतःची ओळख निर्माण करून विद्यालयाचे नाव उज्ज्वल करणे, अशा सूचना केल्या. अशोक पाटील यांनी भेटी दरम्यान शाळेतील भौतिक सुविधा पाहून समाधान व्यक्त केले.शिक्षक…
सुरेश काटे, तलासरी, वडवली पुनर्वसन शाळेत सुसज्ज ग्रंथालय, तलासरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वडवली पुनर्वसन या शाळेत बुधवारी आधुनिक व सुसज्ज ग्रंथालयाचे लोकार्पण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या कार्यक्रमास तलासरी तालुक्याचे सहा. गटविकास अधिकारी प्रदीप डोलारे,गटशिक्षणाधिकारी निमिष मोहिते आणि यशराज रिसर्च फाउंडेशनच्या अध्यक्षा दिपाली भानुशाली यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यशराज रिसर्च फाउंडेशनने तलासरी तालुक्यातील २५ शाळांमध्ये दर्जेदार वाचनसाहित्याने समृद्ध ग्रंथालये उभारण्याचा उपक्रम हाती घेतला होता आणि तो यशस्वीपणे पूर्ण करून २५ शाळांना दर्जेदार ग्रंथालय निर्माण करून दिली आहेत. या ग्रंथालयात आवश्यक फर्निचर,टेबल,खुर्च्या,कपाटे, ग्रंथालय चालवण्याची संपूर्ण प्रणाली,आकर्षक भिंत पेंटिंग, स्टेशनरी,घड्याळ,चटई तसेच घरी पुस्तक वाचनासाठी देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात…
वसंत भोईर,वाडा लाळ्या-खुरकत रोगप्रतिबंधात्मक लसीकरणाचा शुभारंभ, वाडा तालुक्यात लाळ्या खुरकत रोगाची बाधा होऊ नये यासाठी गुरांच्या लसीकरणाच्या ७ व्या फेरीचा शुभारंभ नुकताच पालघर येथे करण्यात आला. जिल्हा पशुसर्वचिकित्सालय येथील सहाय्यक आयुक्त डॉ. शिल्पा कारगिलवार यांच्या हस्ते नेहरोली येथे करण्यात आला.यावेळी पशुपालक तसेच पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. वाडा तालुक्यात २० व्या पशुगणनेनुसार २२ हजार ७४ गोवर्गीय तसेच १० हजार ९१८ म्हैस वर्गीय असे एकूण ३२ हजार ९९२ एवढे पशुधन आहे. काही दिवसापूर्वी तालुक्यातील चिखले,कोणे, मालोंडे,नेहरोली या गावामधील काही पशुपालकांच्या जनावरामध्ये खुरामध्ये जखमा झाल्यामुळे जनावरे लंगडत असल्याची माहिती पशुपालकांनी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे दिली होती.जिल्हा स्तरावर याची तातडीने दखल घेऊन…
दीपक मोहिते, ” युतीचा निर्णय अंगलट,” बेस्ट निवडणूक ; मराठी मतदारानीही उद्धव / राज यांना झिडकारले, बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत युती करणाऱ्या शिवसेना ( उबाठा ) व मनसेचे चांगलेच पानिपत झाले.सत्तेच्या राजकारणात मतदार राज ठाकरे यांच्या पक्षाला थारा देत नाहीत,हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.मराठी भाषिकांच्या अस्मितेला फुंकर मारत उद्धव व राज हे दोघे ठाकरे बंधू निवडणुकीच्या रिंगणात उतरले खरे,पण त्यांना बहुतांश मराठी मतदार असलेल्या बेस्टच्या कामगारांनी आपल्या पतपेढीत प्रवेश करू दिला नाही. वेळोवेळी आपली राजकीय भूमिका बदलणाऱ्या राज ठाकरे यांचा हात हातात घेणाऱ्या उद्धव याना या निवडणुकीत जबर फटका बसला.गेले ९ वर्षे पतपेढी आपल्या ताब्यात राखणाऱ्या उद्धव ठाकरे यांना मतदारांनी…
