वाडा प्रतिनिधी,
वाड्यात भगवे शिवबंधन अभियानास सुरुवात, vada
तालुक्यात उद्धव सेनेतर्फे भगवे शिवबंधन अभियानाची खानिवली गटातील गौरापूर गावापासून करण्यात आली. तालुक्यातील शिवसैनिकांनी गावो गावी जाऊन शिवसैनिकांच्या भेटीगाठी घेऊन प्रत्येकाला शिवबंधन बांधण्यात आले.यावेळी गावागावात रिक्त असलेली शाखाप्रमुख व उपशाखा प्रमुख पदावर नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख गोविंद पाटील,तालुकाप्रमुख निलेश पाटील,सचिव सागर पाटील,ज्येष्ठ शिवसैनिक समीर भानुषाली,भाई कराळे,प्रभाकर कराळ,उपविभाग प्रमुख अनिल डबके,पालसई शाखाप्रमुख स्वप्नील पाटील,असनस शाखाप्रमुख चेतन जाधव,कलंबई शाखाप्रमुख नवनीत हिरवे,आंवढा शाखाप्रमुख नरेश पाटील,सोशल मीडिया कक्षाचे सागर पाटील,आदींसह पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

