दीपक मोहिते,
विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश,
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच विकासकामांनी प्रभावित होऊन वसई विधानसभा क्षेत्रातील विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी रविवार ०७ सप्टेंबर २०२५ रोजी माझ्या हस्ते भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
या जाहीर पक्षप्रवेश सोहळ्यात आम आदमी पार्टीचे नालासोपारा अध्यक्ष आदर्श पांडे,बँक मॅनेजर जे. पी.यादव,शिवसेना शाखा प्रमुख आशुतोष चौरसिया,बहुजन विकास आघाडीचे मनीष,तसेच अमन कन्नोजिया आणि शशांक गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली ४० ते ५० कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
याप्रसंगी सर्व कार्यकर्त्यांचे भाजप परिवारात हार्दिक स्वागत करून त्यांना पक्षाच्या विचारधारेनुसार देशहित व समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.
सदर कार्यक्रमास भाजपा वसई विरार शहर जिल्हा सरचिटणीस बिजेंद्र कुमार, राजेश नायर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

