दीपक मोहिते,
आ.स्नेहा दुबे पंडित यांची सहसंयोजकपदी नियुक्ती,
वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांची यांची आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानाच्या सहसंयोजकपदी निवड करण्यात आली आहे.प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी त्यांना काल नियुक्तीचे पत्र दिले आहे.त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर ही महत्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आल्याचे पक्षाच्या सूत्राने आज मध्यमाना सांगितले.
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी भाजपच्या पाच जणांची आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान समितीवर नियुक्त्या केल्या.त्यामध्ये ऍड.माधवी नाईक,प्रदेश सरचिटणीस,ऍड.आ.स्नेहा दुबे पंडित,आ.विक्रम पाचपुते,आ.अमल महाडिक व आ.प्रताप अडसड,या पाच जणांचा समावेश आहे.२५ सप्टें. २०२५ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती दिनी सुरू होणारे हे अभियान २५ डिसें.२०२५ भारतरत्न श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी जयंती दरम्यान हे अभियान पार पडणार आहे.या कालावधीत ही समिती या अभियानामध्ये विविध उपक्रम हाती घेणार आहे.स्वदेशी उत्पन्नाचा वापर व स्वदेशी नितीमत्तेवर आधारित सामाजिक जीवनशैली, अशा दोन महत्वाच्या विषयावर हे अभियान राबवण्यात येणार असल्याचे भाजपच्या सूत्राने माध्यमांना दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे.त्यांच्या या नियुक्तीचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.आ.स्नेहा दुबे पंडित यांनी गेल्या सहा महिन्यात राबवलेल्या विविध उपक्रमाची ही एकप्रकारे पोचपावती असल्याचे मानण्यात येत आहे.

