गावाच्या विकासासाठी सदैव तत्पर,— आ.हरिश्चंद्र भोये
जव्हार प्रतिनिधी –
ग्रुप ग्रामपंचायत देहरे-देवगाव यांच्यातर्फे आज देहरे विक्रमगड विधानसभा आमदार हरिश्चंद्र शेवंती सखाराम यांचा नागरी सत्कार करण्यात आला.पारंपरिक वाद्य,फुलांची उधळण आणि जल्लोषात आमदारांचे त्यांच्या मूळ गावी भव्य स्वागत करण्यात आले.
५ सप्टें. शिक्षक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात आमदारांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच देहरे ग्रामपंचायत हद्दीतील सर्व शिक्षकांचा आमदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात भोये यांची पत्नी ज्योतीताई भोये, जि.प. माजी सदस्य अशोक भोये, तालुका शहराध्यक्ष कुणाल उदावंत, आदिवासी सेविका पुरस्कार विजेत्या मीराताई महाले,सरपंच जितेश भोये आदी मान्यवर उपस्थित याप्रसंगी उपस्थित होते.
सत्कारानंतर आपले मनोगत व्यक्त करताना आ. हरिश्चंद्र भोये आपल्या भाषणात म्हणाले,
“ गावाच्या विकासासाठी मी सदैव तयार आहे.युवकांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करून पुढे यावे,यासाठी लवकरच गावात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा आपला प्रयत्न आहे.महिला बचत गटांनी उद्योग व व्यवसायाच्या वृद्धीकडे वाटचाल करावी,शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा,व्यवसायासाठी कर्ज अन्य काही अडचणी असल्यास मी वैयक्तिक मदत करीन.या सोहळ्याला गावातील ज्येष्ठ मान्यवर, महिला बचत गट,युवक वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे आयोजन ग्रुप ग्रामपंचायत देहरे-देवगाव यांच्यातर्फे करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जयदेव घेगड यांनी केले.

