- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर : खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार….
- ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज,
- भारतीय संविधानाचे देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान,
- मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात,
- प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक….
- अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली,
- ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार, कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता,
- कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” दरवर्षी वसई पुराच्या पाण्यात का बुडते ? शासनकर्त्यांच्या हलकटपणापायी वसईकर होतोय उध्वस्त… दरवर्षी पाण्यात बुडणाऱ्या वसई तालुक्याला वाचवायचे असेल तर,शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था,राजकीय पक्ष व नागरिकांनी एकत्र येऊन संयुक्त प्रयत्न करण्याची गरज आहे.असे प्रयत्न होणार नाहीत,याची खात्री नसतानाही आपण वसईकर नागरिक भाबडी आशा बाळगून असतो. असो, या आणीबाणीच्या प्रसंगी राजकीय नेते व कार्यकर्त्यानी एकमेकांची उणी – दुणी काढण्याऐवजी नैसर्गिक आपत्ती निवारणाच्या कामी स्वतःला झोकून दिल्यास नागरिकांना काही अंशी दिलासा मिळू शकतो.ते न करता एकमेकांना दोष देणे व नागरिकांचे ” आम्हीच कैवारी,” अशा अविर्भावात सध्या पाण्यात उभे राहून नेत्यांचे जे फोटोसेशन सुरु आहे,ते अत्यंत किळसवाणे आहेच,पण माणूसकीला…
दीपक मोहिते, सुविधांमुळे अतिवृष्टीमध्ये नागरिकांना मिळाला दिलासा, वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात आज प्रचंड प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शहरातील काही ठिकाणी सखल भाग व रस्त्यांवर पाणी साचले होते, तसेच काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले होते. महानगरपालिकेतर्फे जलमय झालेल्या भागातील पाणी काढण्यासाठी ५४ संक्शन पंपांची व्यवस्था करण्यात आली आहे.संक्शन पंप लावून विविध ठिकाणी साचलेले पाणी काढण्यात आले आहे. तसेच काही ठिकाणी जेसीबी द्वारे पाणी जाण्याचे मार्ग मोकळे करण्यात आले असून काही ठिकाणी पाणी काढण्याचे काम सुरू आहे. महानगरपालिका क्षेत्रात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची एनडिआरएफ ची एक टीम ही कार्यरत ठेवण्यात आली आहे. पावसाचे पाणी साचल्यामुळे जेथे नागरिक अडकले होते, त्या ठिकाणी महापालिकेच्या…
सुरेश काटे,तलासरी मुसळधार पावसामुळे तलासरीतील जनजीवन विस्कळीत, तलासरी तालुक्यात गेल्या दोन दिवसापासुन पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पार विस्कळीत झाले आहे.तालुक्याच्या अनेक भागात नदी नाल्यावरून पाणी वाहत असल्यामुळे अनेक गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटला आहे.तलासरी भागात आज दिवसभरात मि.मि.पावसाची नोंद झाली. तालुक्यात झालेल्या पावसामुळे कोणतीही दुर्घटना घडली नसल्याचे तलासरी महसूल आणि पोलिसाकडून सांगण्यात आले. सततच्या पावसामुळे तालुक्यातील कोचाई – अन्वीर रस्त्यावरील नाल्यावरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद पडली असुन अनेक गावाचा संपर्क तुटला आहे.तसेच सूत्रकार – वेलूगांव रस्त्यावरील काळू नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे या रस्त्यावरून केंद्रशासित दादरा नगर हवेली कडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.या परिसरात…
दीपक मोहिते, माणुसकीचा झरा, बहुजन विकास आघाडीकडून हजारो बाधित कुटुंबांना दिलासा, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने वसई विरार परिसराला अक्षरशः झोडपून काढले.या अशा नैसर्गिक आपत्तीमुळे या भागातील लोकांचे जनजीवन पार विस्कळीत झाले.अनेक भागातील नागरी वसाहतीमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेक कुटुंबाच्या घरात आज चूल पेटू शकली नाही.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन माजी आ.हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या बहुजन विकास आघाडी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्याना लोकांच्या मदतीसाठी पाचारण केले होते. आज पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिवसभर भरपावसात बाधित कुटुंबांना अन्नपाकीटे वाटप,साचलेल्या पावसाळी पाण्याचा निचरा होण्याचे मार्ग मोकळे करणे,जेसीबीद्वारे माती हटवणे इ.कामे वेगाने हातावेगळी केली.त्यामुळे लोकांना मोठ्याप्रमाणात दिलासा मिळू शकला. वसईचे माजी आ.हितेंद्र ठाकूर हे नैसर्गिक…
आदिवासींच्या संसाराला गवताच्या काडीचा आधार, वसंत भोईर गवत विक्रीचा भूमिपुत्रांना आधार, पालघर जिल्ह्यातील आदिवासींना पावसाळ्यातील चार महिन्यांपैकी दोन महिने शेती कामांमध्ये रोजगार मिळतो,मात्र उर्वरित दोन महिने त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे गांव परिसरातील हिरवे गवत कापून त्याच्या विक्रीतून संसारला आधार उपलब्ध होत असतो. प्रतिवर्षी येथील आदिवासींना या माध्यमातून चांगला रोजगार मिळतो. जिल्ह्यातील डहाणू,तलासरी, जव्हार,मोखाडा,विक्रमगड, वाडा या तालुक्यातील हजारो आदिवासी कुटुंबे उन्हाळ्यातील आठ महिने रोजगारासाठी शहरी भागात स्थलांतर करत असतात तर उर्वरित चार महिने आपल्या मूळगावी परतून शेती,मजुरी करतात.पावसाळ्यात शेतीची कामे संपल्यानंतर गांव परिसरातील माळरानावर उगविलेले गवत विक्रीतून प्रति दिवस, ३०० ते ५०० रु. कमवतात. या हंगामात कुठेही रोजगार उपलब्ध नसताना हजारो…
दीपक मोहिते, सागरी सुरक्षा;सरकार संवेदनशील असायला हवे, आपल्या देशातील समुद्रकिनारे किती असुरक्षित आहेत,हे आजवर घडलेल्या अनेक घटनावरून सिद्ध झाले आहे.समुद्रात एखादी घटना घडली कि स्थानिक ग्रामस्थ तटरक्षक दल,बंदर विभाग व स्थानिक सागरी पोलीस ठाण्याना कळवतात.त्यानंतर तपास यंत्रणा सक्रिय होत असतात.वास्तविक या अशा संवेदनशील समुद्रकिनाऱ्यावर राज्याच्या गृहखात्याने स्पे. इंटलीजन्स यंत्रणा कार्यान्वित करण्याची नितांत गरजेचे आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सतत घडणाऱ्या घडामोडी,सीमेवर निर्माण झालेली युद्धसदृश्य स्थिती,लक्षात घेता पालघर जिल्ह्याच्या पश्चिमेस लागून असलेल्या किनारपट्टीवर सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करणे ही काळाची गरज ठरली आहे.सुरक्षेच्या दृष्टीने ही समुद्रकिनारपट्टी अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखली जाते,याचा अनुभव यापूर्वी आपण घेतला आहे.मुंबई ते थेट कोकण,अशी ही ७५० चौ.कि. मी.किनारपट्टी,त्यापैकी ११२…
दीपक मोहिते, मोठ्या संकटाची चाहूल, भविष्यात आपला पण चेन्नई होऊ शकतो… काही वर्षांपूर्वी एका दैनिकात आलेल्या वृत्ताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.निसर्गाने भविष्यात आपल्यासमोर काय वाढून ठेवले आहे,हे स्पष्ट करणारे सदर वृत्त होते.निसर्गाची खोडी काढली तर काय होते,याचा अनुभव आता चेन्नईवासीयाना घ्यावा लागत आहे.भविष्यात अशीच स्थिती देशाच्या प्रत्येक शहरात आपल्याला पाहायला मिळणार आहे. मानवाच्या असंख्य चुका म्हणा किंवा ओरबाडून खाण्याची वृत्ती म्हणा,आज जगभरातील देश विविध नैसर्गिक संकटांना सामोरे जात आहे.वादळे,अतिवृष्टी, महापूर,दरडी कोसळणे,इ.संकटाचा त्यामध्ये समावेश आहे.पण यामध्ये आता आणखी एका भीषण संकटाचा समावेश झाला आहे.चेन्नई शहरातील भूजल पातळी सुमारे २ हजार फुटाखाली गेली असून सरकारने शहरातील बोअरिंगद्वारे पाणी उपसा करण्यावर बंदी…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आमचे संकटमोचक बाप्पा स्वतः भितीच्या सावटाखाली … पालघर व ठाणे जिल्ह्यातील रस्त्याची दुरावस्था लक्षात घेऊन आमचे बाप्पा सध्या खूप धास्तावले आहेत.भक्तांच्या घरी कसे पोहोचायचे ? अशा विवंचनेत ते सापडले आहेत. गणेशोत्सव सणाच्या तोंडावर स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी आपल्या क्षेत्रात दरवर्षी आढावा बैठका घेत असतात.मात्र या सर्व बैठका केवळ एक औपचारिकता असते,अशा बैठकांमधून फारसे काही निष्पन्न होत नसते.या बैठकांमध्ये महसूल,पोलीस,महावितरण,सार्व.बांधकाम विभाग,अग्निशमन दल,आरोग्य व वैद्यकीय सेवा,आपत्कालीन यंत्रणा व अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात येत असते.पण गणेशोत्सव काळात या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे,हे सर्वसामान्य नागरिकांसाठी एक मोठे दिव्य असते.या काळात संबधित अधिकाऱ्यांचे मोबाईल बंद असणे,हे सर्वसामान्याच्या पाचवीला पुजले…
सचिन सावंत,विरार मालवाहू जहाजाची मच्छीमार नौकेला जोरदार धडक ; चौदा खलाशांचे प्राण वाचले, समुद्रकिनाऱ्यापासून तीन नॉटिकल मैल अंतरावर भर समुद्रात ” श्री साई,” या मच्छीमार बोटीला काल रात्री एका मालवाहू जहाजाने जोरदार धडक दिली. या घटनेची माहिती मिळताच ” जय साईप्रिया,” आणि ” जय साईराम, ” या दोन बोटींनी अपघातग्रस्त नौकेला मदत केली.त्यामुळे १४ खलाश्याचे प्राण वाचू शकले. १४ ऑगस्ट रोजी रात्री ९.२५ च्या सुमारास ” श्री साई,” ही मासेमारी बोट समुद्रात असताना एका मालवाहू जहाजाने तिला जोरदार धडक दिली.या धडकेमुळे बोटीवर असलेले १५ पैकी ४ खलाशी समुद्रात फेकले गेले.काळोख असल्याने त्यांना कसेबसे पुन्हा बोटीजवळ येणे शक्य झाले. अपघाताची माहिती…
वसंत भोईर,वाडा मुख्य कार्यकारी अधिकारी यांची खानिवली ग्रा.पं.ला भेट, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी काल ग्रामपंचायत खानिवलीला भेट देऊन राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची पाहणी केली.महिला स्नेही ग्रामपंचायत म्हणून ग्रामपंचायतीची देशात निवड झाली असुन त्यांनी ग्रामपंचायत कार्यकारिणीचे त्यांनी अभिनंदन केले. यावेळी सरपंच भरत हजारे यांनी ग्रामपंचायतीच्या उपक्रमांची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केली.ग्रामपंचायतीला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्कार,माझी वसुंधरा अभियान ४.० पुरस्कार,पंचायत लर्निंग सेंटर पुरस्कार,असे अनेक पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांनी ग्रामपंचायतीचे कौतुक केले.गावातील विविध उपक्रमांना व कामांना भेटी दिल्या.ग्रामपंचायतीतर्फे सुरु असलेल्या प्लास्टिक बॉटल क्रशिंग मशीन,तालुक्याचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प,कचरा विलगीकरण शेड,माझी वसुंधरा अभियानाची कामे,व्यायामशाळा,अमृत सरोवर येथील नाविन्यपूर्ण…
