वसंत भोईर,वाडा
मुख्य कार्यकारी अधिकारी यांची खानिवली ग्रा.पं.ला भेट,
पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी काल ग्रामपंचायत खानिवलीला भेट देऊन राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची पाहणी केली.महिला स्नेही ग्रामपंचायत म्हणून ग्रामपंचायतीची देशात निवड झाली असुन त्यांनी ग्रामपंचायत कार्यकारिणीचे त्यांनी अभिनंदन केले.
यावेळी सरपंच भरत हजारे यांनी ग्रामपंचायतीच्या उपक्रमांची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केली.ग्रामपंचायतीला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्कार,माझी वसुंधरा अभियान ४.० पुरस्कार,पंचायत लर्निंग सेंटर पुरस्कार,असे अनेक पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांनी ग्रामपंचायतीचे कौतुक केले.गावातील विविध उपक्रमांना व कामांना भेटी दिल्या.ग्रामपंचायतीतर्फे सुरु असलेल्या प्लास्टिक बॉटल क्रशिंग मशीन,तालुक्याचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प,कचरा विलगीकरण शेड,माझी वसुंधरा अभियानाची कामे,व्यायामशाळा,अमृत सरोवर येथील नाविन्यपूर्ण पवनचक्की,प्राथमिक आरोग्य केंद्र,गुरांचा दवाखाना,गावात सुरु असलेली घरकुले आदी उपक्रमांची पाहणी त्यांनी या भेटीच्या वेळी पाहणी केली.
यावेळी गटविकास अधिकारी वैभव शिंदे,उपसरपंच सागर पाटील,ग्रा.पं.सदस्य प्रेरणा पोटींदा,सारिका पाटील,निकिता वाघ,रमेश डुकले व ग्रामपंचायत अधिकारी शशिकांत ठाकरे उपस्थित होते.

