सुरेश काटे,तलासरी
मुसळधार पावसामुळे तलासरीतील जनजीवन विस्कळीत,
तलासरी तालुक्यात गेल्या दोन दिवसापासुन पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पार विस्कळीत झाले आहे.तालुक्याच्या अनेक भागात नदी नाल्यावरून पाणी वाहत असल्यामुळे अनेक गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटला आहे.तलासरी भागात आज दिवसभरात मि.मि.पावसाची नोंद झाली. तालुक्यात झालेल्या पावसामुळे कोणतीही दुर्घटना घडली नसल्याचे तलासरी महसूल आणि पोलिसाकडून सांगण्यात आले.
सततच्या पावसामुळे तालुक्यातील कोचाई – अन्वीर रस्त्यावरील नाल्यावरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद पडली असुन अनेक गावाचा संपर्क तुटला आहे.तसेच सूत्रकार – वेलूगांव रस्त्यावरील काळू नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे या रस्त्यावरून केंद्रशासित दादरा नगर हवेली कडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.या परिसरात तलासरी पोलीस दाखल झाले असून परिस्थितीचा अंदाज घेऊन पुढील उपाययोजना करत आहेत.

