दीपक मोहिते,
माणुसकीचा झरा,
बहुजन विकास आघाडीकडून हजारो बाधित कुटुंबांना दिलासा,
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने वसई विरार परिसराला अक्षरशः झोडपून काढले.या अशा नैसर्गिक आपत्तीमुळे या भागातील लोकांचे जनजीवन पार विस्कळीत झाले.अनेक भागातील नागरी वसाहतीमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेक कुटुंबाच्या घरात आज चूल पेटू शकली नाही.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन माजी आ.हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या बहुजन विकास आघाडी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्याना लोकांच्या मदतीसाठी पाचारण केले होते.

आज पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिवसभर भरपावसात बाधित कुटुंबांना अन्नपाकीटे वाटप,साचलेल्या पावसाळी पाण्याचा निचरा होण्याचे मार्ग मोकळे करणे,जेसीबीद्वारे माती हटवणे इ.कामे वेगाने हातावेगळी केली.त्यामुळे लोकांना मोठ्याप्रमाणात दिलासा मिळू शकला.

वसईचे माजी आ.हितेंद्र ठाकूर हे नैसर्गिक आपत्तीच्या वेळी लोकांच्या मदतीसाठी नेहमी पुढाकार घेत असतात.दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या काळात त्यांनी जे मदतीचे कार्य केले,त्याची दखल राज्यपातळीवर घेण्यात आली होती.या काळात सुमारे ७० लाख लोकांना वर्षभर दोन वेळचे जेवण देण्याचे ऐतिहासिक काम त्यानी पार पाडले होते.गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो कुटुंबे हवालदिल झाली होती.सदर बिकट परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी आज सकाळपासून आपल्या कार्यकर्त्यांना लोकांच्या मदतीसाठी घराबाहेर पडण्याचे आवाहन केले.त्यानंतर त्यांच्या पक्षाचे शेकडो कार्यकर्ते बाधित नागरिकांच्या घरोघरी पोहोचले व त्यानी अन्नपाकिटे वाटप केली.तसेच साचलेल्या पाण्याचा निचरा जलदगतीने व्हावा,यासाठी महानगरपालिकेच्या मदतीने बचावकार्य सुरू केले.याकामी जीवदानी ट्रस्ट व यंग स्टार ट्रस्टनेही मोलाची कामगिरी बजावली.आजचे मदतकार्य माजी नगरसेवक अजीव पाटील,प्रशांत राऊत यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पदाधिकारी,माजी नगरसेवक नगरसेविका / कार्यकर्ते यांनी भरपावसात यशस्वीपणे पार पाडले.

