Author: दीपक मोहिते

सचिन सावंत,विरार बविआच्या महिला कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा संपन्न, विरार पूर्व येथे बहुजन विकास आघाडीच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा माजी महापौर प्रवीणा हितेंद्र ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली व संघटक-सचिव तथा प्रवक्ते अजीव पाटील यांच्या उपस्थितीत विरार पूर्व येथील जीडी गार्डन हॉल,विवा तारांगण येथे काल सायं. मोठ्या उत्साहात पार पडला. या स्नेहमेळाव्याला उपस्थित माजी महापौर प्रवीणा हितेंद्र ठाकूर यांचे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले.त्यानंतर त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.प्रविणा ठाकुर यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या लोकांच्या समस्या सोडवणे यावर भर दिला.लोकांची कामे आपण करत आलो आहोत आणि यापुढेही करतच राहणार आहोत.त्यासाठी जी काही मदत तुम्हाला लागेल,ती…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.११, प्रभाग क्र.११ हा भौगोलिकदृष्ट्या विचित्र व त्रासदायक, या प्रभागात बाहेरून स्थायिक झालेले सर्वसामान्य नागरिक व स्थानिक रहिवाश्यांचा समावेश आहे.समेळपाडा,निळेगाव,उमराळे तलाव,पाटील आळी,खवणे आळी,करमाळे या परिसरात स्थानिक भूमीपुत्राचा भरणा आहे.त्यामध्ये सामवेदी,कुपारी,या समाजाचा समावेश आहे.तर म्हाडा कॉलोनी सिद्धिविनायक हॉस्पिटल,यशवंत नगर,श्रीप्रस्थ,सिविक सेंटर व साईबाबा मंदिर येथील नागरी वसाहतीमध्ये बाहेरून आलेल्यांची संख्या लक्षणीय आहे.पूर्वी येथील मतदार हा कायम बहुजन विकास आघाडीचा समर्थक म्हणून ओळखला जायचा.सामवेदी हा समाज कायम हिंदुत्वाचा समर्थक राहिला असून तो आपली मते शिवसेनेला देत असतो.यावेळी ती मते भाजपच्या पारड्यात जातील,असा अंदाज आहे.उर्वरित ख्रिस्ती समाजाची मते ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व बहुजन विकास आघाडी या दोघांमध्ये…

Read More

दीपक मोहिते, मुंबई नव्हे तर अहमदाबाद,देशाची आर्थिक राजधानी बनवण्याचे कटकारस्थान, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षात केंद्र व राज्य सरकारने विविध प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. त्यासाठी सरकार,आवश्यक असलेल्या जमिनी साम,दाम,दंड,भेद,निती वापरून ताब्यात घेत आहे.जमिनी ताब्यात घेण्यासाठी सरकारने पैश्याच्या थैल्या सध्या मोकळ्या केल्या आहेत.या जमिनी बाजारभावापेक्षा अधिक भाव देऊन खरेदी करण्याचा सरकारने धुमधडाका लावला आहे.त्यामुळे सरकारच्या या गोरखधंद्या विरोधात आंदोलने होत नाहीत.सरकारच्या या कुटील डावाला स्थानिक भूमिपुत्र बळी पडत आहेत.जमीन खरेदी व्यवहारात सरकार सध्या कोटी कोटीची उड्डाणे घेत आहे.अपेक्षेपेक्षा अधिक पैसा हाती खुळखुळू लागल्यामुळे भूमिपुत्राचा आवाजच दबला गेला.पूर्वी जमीन संपादन हा विषय अत्यंत ज्वलंत,असा होता.उरण येथे काही वर्षांपूर्वी…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.१०, गुजराती व उत्तर भारतीयांचे मतदान निर्णायक ठरणार… प्रभाग क्र.१० ची रचना विचित्र अशी असून या प्रभागात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची प्रचारादरम्यान चांगलीच दमछाक होणार आहे.या प्रभागात एकूण ४६ हजार ९८९ मतदार असून त्यामध्ये अनु.जमाती – २ हजार १६५ तर अनु.जाती – १ हजार २८ मतदारांचा समावेश आहे. या प्रभागात सर्वाधिक मतदार गुजराती भाषिक आहेत,त्यानंतर उत्तर भारतीय मतदारांचा नंबर लागतो.या दोन्ही समाजाच्या तुलनेत मराठी समाजाची लोकसंख्या फार कमी आहे.गेल्या दोन निवडणुकीत येथील मतदारांनी बहुजन विकास आघाडी व काही प्रमाणात एकसंघ शिवसेनेच्या पदरात मताचे दान टाकले.परंतु आता मात्र चित्र पालटले आहे.येथील मतदारांमध्ये सध्या बदलाचे वातावरण आहे.वर्षानुवर्षे…

Read More

दीपक मोहिते, सामाजिक भान, अर्नाळा जलमार्गांवरील पुलाचे काम सूरू होण्याची शक्यता, वसईच्या आ.ॲड.स्नेहा दुबे पंडित यांनी गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत आपल्या वसई मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांचा शासनस्तरावर सतत पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे अनेक विकासकामे आता मार्गी लागत आहेत.गेल्या जून महिन्यात त्यांना अर्नाळा ग्रामपंचायतीने अर्नाळा किल्ला व अर्नाळा गाव दरम्यान जलमार्गावरील वर्षानुवर्षे रखडलेला पूल बांधण्यात यावा,अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली होती.त्या निवेदनाच्या आधारे आ.स्नेहा दुबे पंडित यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन त्यांच्या कानावर सदर बाब घातली होती.या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरण विभागाला याप्रकरणी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार शासनस्तरावर हालचाली…

Read More

दीपक मोहिते, विश्लेषण, नेपाळमधील अस्थिरता ही भारतासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. नेपाळमधील स्फोटक राजकीय परिस्थिती आशिया खंडाला अशांततेच्या खाईत ढकलणारी आहे. दोन वर्षापूर्वी श्रीलंका,त्यानंतर म्यानमार,बांगला देश व आता नेपाळ,या दक्षिण आशियाई देशात झालेल्या राजकीय उलथापालथी लक्षात घेऊन भारताने सावध होणे आवश्यक आहे.नेपाळमध्ये जो उठाव झाला,त्यामागे तेथील सरकारची निष्क्रियता हे एकमेव कारण नाही,तर अमेरिका व चीन या दोन महासत्तामध्ये सुरू असलेल्या सुप्त संघर्षाची झालर देखील आहे.नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे घेतल्यानंतर अवघ्या १३ महिन्यात नेपाळची आर्थिक स्थिती पार ढासळली.देशातील बेरोजगारी,महागाई व विकासाची गती खुंटणे,या कारणामुळे तरूणवर्ग बिथरला व अखेर ओली यांना देश सोडून पळ काढावा लागला.संतप्त तरुणांनी संसद,सर्वोच्च…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक पर्व – जिल्हा परिषद / पंचायत समिती निवडणुका, संघर्षाला तोंड फुटले, पालघर जिल्ह्यात महायुती तुटण्याची शक्यता… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सारे राजकीय पक्ष आतापासूनच एकमेकांच्या उरावर बसू लागले आहेत.महायुतीमध्येही भाजप व एकनाथ शिंदे गटात एकमेकांवर कुरघोडी करण्याचे राजकारण सुरू झाले आहे.दुसरीकडे बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना त्याच्या कृष्णकृत्याचा पाढा वाचत पक्ष सोडण्यासाठी भाजपकडून दबाव आणण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर रुपेश जाधव यांचे अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी खूप आतुर झाले आहेत.हे कार्यकर्ते सतत भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत.बहुजन विकास आघाडीचे दोन महत्वाचे पदाधिकारी देखील आपली कृष्णकृत्ये बाहेर येऊ नयेत,त्यासाठी आपल्याला…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.९, अनधिकृत इमारतींचा सुळसुळाट असलेला प्रभाग ; या निवडणुकीत परिवर्तन अटळ, प्रभाग क्र.९ हा अत्यंत गजबजलेला असा प्रभाग आहे.या प्रभागात परप्रांतीयांचे प्रचंड प्राबल्य आहे.त्यामुळे या प्रभागात मराठी माणसाला उमेदवारी देणे,म्हणजे ” हात दाखवून अवलक्षण,” करून घेण्यासारखे आहे.गेल्या दोन निवडणुकीत या प्रभागात बहुजन विकास आघाडीने बाजी मारली होती.पण या निवडणुकीत त्यांना ते शक्य होणार नाही.या प्रभागात गेल्या दहा वर्षात बेसुमार अनधिकृत इमारती उभारण्यात आल्या,त्यांचे जनक कोण आहेत,हे सांगायला नको.गेली दहा वर्षे येथील परप्रांतीय मतदार हा बहुजन विकास आघाडीला भरभरून मतदान करत आला.पण या निवडणुकीत हा मतदार भाजपकडे वळेल,अशी शक्यता आहे.हा प्रभाग देखील अस्वच्छ प्रभाग म्हणून…

Read More

दीपक मोहिते, ३४ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल लवकरात लवकर वाजण्याची शक्यता आहे.काल ग्रामविकास विभागाने ३४ जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर केले आहे. त्यानुसार अनु.जमाती पुरुष : २ पुरुष,अनु.जमाती महिला : ३ एकूण ५ जागा, सर्वसाधारण पुरुष : ७,सर्वसाधारण महिला : ७,एकूण १४,जागा, अनु.जाती पुरुष : ३,अनु.जाती महिला : २,एकूण ५ जागा, नागरिकांचा मागासवर्ग पुरुष : ४ नागरिकांचा मागासवर्ग महिला : ६ एकूण १० जागा, असे एकूण ३४ जिल्हा परिषदेचे आरक्षण पडले आहे. ३४ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण खालीलप्रमाणे – ठाणे -सर्वसाधारण ( महिला ) पालघर – अनुसूचित जमाती रायगड- सर्वसाधारण रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.८, सर्वात बदनाम प्रभाग क्र.८ बविआच्या हातून निसटणार, नालासोपारा पूर्वेस असलेला हा प्रभाग अत्यंत मागासलेला तसेच ८० % अनधिकृत बांधकामाचा वेढा असलेला प्रभाग म्हणून ओळखला जातो.अठरापगड अस्वच्छता व अश्मयुगातील रस्त्याची आठवण करून देणारा असा हा प्रभाग आहे.या प्रभागात मराठी माणूस अल्पसंख्यांक म्हणून ओळखला जातो.मुस्लिम,उत्तर भारतीय व मारवाडी व्यापारी हे या प्रभागात बहुसंख्यांक आहेत.झोपडपट्या,अनधिकृत चाळी व अनधिकृत इमारती इ.चा प्रचंड सुळसुळाट,जागोजागी कचऱ्याचे ढीग,गुंडाचा मुक्त वावर,गुरुचरण,वन व सरकारी जमिनी या आपल्या बापजाद्यांची जायदाद असल्याची मानसिकता बाळगणारे चाळमाफिया,याना सर्वच राजकीय पक्षांनी पोसले आहे.पाणी,आरोग्य व शिक्षण,कायदा व सुव्यवस्था,स्वच्छता इ. समस्या या प्रभागाच्या पाचवीला पूजल्या आहेत.गेल्या पंधरा वर्षात या…

Read More