दीपक मोहिते,
सामाजिक भान,
अर्नाळा जलमार्गांवरील पुलाचे काम सूरू होण्याची शक्यता,
वसईच्या आ.ॲड.स्नेहा दुबे पंडित यांनी गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत आपल्या वसई मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांचा शासनस्तरावर सतत पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे अनेक विकासकामे आता मार्गी लागत आहेत.गेल्या जून महिन्यात त्यांना अर्नाळा ग्रामपंचायतीने अर्नाळा किल्ला व अर्नाळा गाव दरम्यान जलमार्गावरील वर्षानुवर्षे रखडलेला पूल बांधण्यात यावा,अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली होती.त्या निवेदनाच्या आधारे आ.स्नेहा दुबे पंडित यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन त्यांच्या कानावर सदर बाब घातली होती.या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरण विभागाला याप्रकरणी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार शासनस्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत.दरम्यान या संदर्भात प्राधिकरणाने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने बैठक लावावी,अशी मागणी आ.ऍड.स्नेहा दुबे पंडित यांनी केली आहे.त्यामुळे लवकरच ही बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

गेल्या काही वर्षापासून अर्नाळा किल्लावासीय या जलमार्गावर पूल बांधण्यात यावा,जेणेकरून स्थानिक भूमिपुत्रांना दिलासा मिळू शकणार आहे.त्यासाठी त्यांनी विविध स्तरावर प्रयत्न चालवले होते.दर पावसाळ्यात होडीने येजा करणे,अत्यंत धोकादायक झाले असून गरोदर महिला,विद्यार्थी,विद्यार्थिनी व दररोज मुंबईला कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना या जलप्रवासात अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते.त्यामुळे या जलमार्गांवर पूल व्हावा,अशी मागणी केली होती.पण आर्थिक व पर्यावरण आदी समस्यामुळे सदर महत्वाचे विकासकाम रखडले होते.त्या समस्या आता मार्गी लागल्या असुन हा पूल हलकी वाहने व दुचाकी येजा करू शकतील,इतका रुंद असावा, अशी स्थानिक रहीवाश्यांची मागणी आहे.त्यासाठी होणारा वाढीव खर्च मंजूर होण्याची गरज असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्वेक्षणाच्या वेळी हे वाढीव काम सध्या करता येणार नाही, असे स्पष्ट केले.

पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता या प्रकरणी स्वतः जातीने लक्ष घालुन प्राधिकरणाला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे प्राधिकरणाची लवकरात लवकर बैठक होऊन वाढीव खर्चाविषयीं चर्चा होणार आहे.त्यामुळे या महत्वाच्या पुलाचे काम लवकरात लवकर सुरु होण्याची शक्यता आहे.

