Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, दिल्लीत भीषण स्फ़ोट ; आठ जणांचा जागीच मृत्यू,तर अनेक जण जख्मी… काल सांय. ७.०० च्या सुमारास दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या भीषण स्फ़ोटात ८ जणांचा मृत्यू तर अनेक जण जख्मी झाले आहेत.या प्रकरणी सुरक्षा यंत्रणानी एका महिला डॉक्टरसह आठ जणांना ताब्यात घेतले आहे.हा आत्मघाती हल्ला असल्याचे स्पष्ट झाले आहे.या घटनेनंतर देशभरात सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पोलिसांनी रात्री ९.३० वाजता दिलेल्या माहितीनुसार,या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला आहे.दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते संजय त्यागी यांनी माध्यमाशी फोनवरून बोलताना मृतांच्या संख्येबाबत ही माहिती दिली.स्फोटाच्या कारणाचा शोध घेण्यात येत आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ एका कारमध्ये हा स्फोट…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” पालघर जिल्ह्यात महाविकास आघाडी चमकदार कामगिरी करू शकणार नाही… बहुजन विकास आघाडी,अखेर महाविकास आघाडीमध्ये सामील झाली.वाडा नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका ते एकत्रितपणे लढणार आहेत.पण या आघाडीमध्ये मनसेला सामावून घेतले की कसे,याचा मात्र उलगडा होऊ शकला नाही.कारण पालघर येथे झालेल्या बैठकीत मनसे सहभागी झाला नव्हता.जर मनसे सहभागी झाला तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची भूमिका काय असेल,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) शिवसेना ( उबाठा ) बहुजन विकास आघाडी व भारतीय राष्ट्रीय काँगेस,या घटक पक्षाची धुरा ज्या पदाधिकाऱ्याकडे सोपवण्यात आली आहे,त्यांच्या कारकीर्दीवर एक नजर टाकणे जरुरीचे ठरते.कारण,चार पैकी तिघांना…

Read More

दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” निवडणुका जिंकण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतो… बिहार राज्यातील निवडणुकांचा निकाल येत्या १४ नोव्हें.रोजी लागणार आहे.हा निकाल कसा असेल,यावर विविध संस्थांनी आपले एक्झिट पोलही जाहीर केले आहेत.ते किती खरे ठरतात,हे उद्या पहिल्या दोन तासात होणाऱ्या मतमोजणीतुन स्पष्ट होणार आहे. बिहार राज्यात भाजप व नितीशकुमार यांच्या जनता दल ( निरपेक्ष ) यांच्या समोर जनसुराजचे प्रशांत किशोर व राजदचे तेजस्वी यादव यांनी प्रचंड आव्हान उभे केले आहे.भाजप व जेडीयु यांच्या युतीला खरा धोका प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाचे असून,या निवडणुकीत भाजप व जेडीयु युतीचा पराभव झाल्यास त्याचे पडसाद देशभरात उमटण्याची शक्यता आहे.मात्र या निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यास महाराष्ट्रात…

Read More

दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” महानगरपालिका काबीज करण्यासाठी आ.स्नेहा दुबे पंडित यांच्या नेतृत्वाखाली भाजप सज्ज, भाजपचे ज्येष्ठ नेते व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणात ” आम्हाला आगामी निवडणुकांमध्ये कोणाच्या कुबड्यांची गरज नाही,” असे वक्तव्य केल्यानंतर राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून स्वबळाचा नारा दुमदुमू लागला आहे.पुणे,भंडारा,मुंबई,पालघर,ठाणे,नागपूर व अन्य जिल्ह्याचा त्यामध्ये समावेश आहे.ठाण्यात तर भाजपची सारी यंत्रणा शिंदे गटाची डाळ या निवडणुकीत शिजता कामा नये,यासाठी सक्रिय झाली आहे.भाजपने राजकीय पक्षाचे महत्वाचे नेते,पदाधिकारी व कार्यकर्त्याना आपल्या जाळ्यात ओढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. भाजपने पालघर जिल्ह्यातही असेच धोरण राबवण्यास सुरुवात केली आहे.बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी,नेते व कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क सुरू झाला आहे.वसई विधानसभा मतदारसंघात बहुजन…

Read More

दीपक मोहिते, वसई पूर्व भागातील बविआच्या माजी नगरसेविकासह शेकडो कार्यकर्ते भाजपामध्ये दाखल, ” आधी राष्ट्र,नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः” या राष्ट्रहितप्रधान विचारधारेवर व देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वसई विधानसभा व बोईसर विधानसभा मतदारसंघातील बहुजन विकास आघाडीच्या माजी नगरसेविकासहित पक्षाचे प्रमुख पदाधिकारी,उबाठा गटातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काल ९ नोव्हें. रोजी भारतीय जनता पक्षात भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय नरिमन पॉईंट मुंबई येथे भव्य प्रमाणात जाहीर प्रवेश केला. या भव्य पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते नवीन कार्यकर्त्यांचे भाजपा परिवारात स्वागत करण्यात आले.…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” नोटबंदी करून सरकारने नक्की काय साधले ? ९ वर्षे उलटून गेल्या नंतरही प्रश्न अनुत्तरितच… ८ नोव्हें. २०१६ रोजी भारत सरकारने चलनातील ८५ % नोटा परत घेण्याचा निर्णय अचानकपणे जाहीर केला.त्यामुळे भारतीय जनतेच्या मनात भिती निर्माण झाली.सरकारच्या या निर्णयाने एका रात्रीत पाचशे आणि १ हजाराच्या नोटांवर बंदी आली.सरकारच्या या निर्णयाला काल ९ वर्षं पूर्ण झाली आहेत. काळा पैसा परत आणणं आणि बेहिशेबी संपत्तीच्या विरोधात हे पाऊल असल्याचं सरकारने त्यावेळी सांगितले होते.पण तसे झाले नाही. सरकारच्या या निर्णयामुळे जनतेला अल्पवाधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.त्यामुळे सरकारच्या या निर्णयाविरोधात जनतेमध्ये संतापाची लाट उसळली. सरकारने हा निर्णय घेऊन नक्की साधले…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” चौथी मुंबई ; मुख्यमंत्री फडणवीस यांचे ” मुंगेरीलाल के हसीन सपने,” राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या सीएनबीसी – टीव्ही १८ च्या ग्लोबल लिडरशीप समिट,मध्ये मुलाखत देताना,येत्या तीन वर्षात वाढवण बंदराचा पहिला टप्पा पूर्ण होईल,अशी ग्वाही दिली.तसेच या विषयी अधिक माहिती देताना येथील समुद्रकिनारी उभारण्यात येणाऱ्या विमानतळाला पण आता मंजुरी मिळाली आहे,असे स्पष्ट केले.या विकासकामामुळे नवी मुंबई येथे तिसरी मुंबई तर वाढवण परिसरात चौथी मुंबई आकाराला येणार आहे,असे त्यांनी आपल्या भाषणात पुढे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या या निर्णयाचे पालघरवासीय नक्कीच स्वागत करतील,पण आज या जिल्ह्याची भौगोलिक,आर्थिक व सामाजिक परिस्थिती कशी आहे ? लोकांचे राहणीमान,त्यांचे…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” निवडणूक रणसंग्राम,” तीन नगरपरिषदा व एक नगरपंचायतीच्या निवडणुकानंतर पालघर जिल्ह्याचे राजकीय चित्र पालटणार…. राज्यात पुढील महिन्यात नगरपरिषद व नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत.त्यासाठी सर्व राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत.पहिल्या टप्यातील या निवडणुका पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्यात जिल्हा परिषद/पंचायत समिती,त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत.या निवडणुकीनंतर पालघर जिल्ह्याचे राजकीय चित्र पार बदलण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका साधारणपणे फेब्रु.२०२६ मध्ये होतील,असा अंदाज आहे.ग्रामीण भागातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या या निवडणुकीचा प्रचाराचा भर हा प्रामुख्याने विकासकामांवर असेल.तर शहरी भागात मात्र समाज रचना,कडवे हिंदुत्व व विकासकामे,हे तीन मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी असतील.भाजप,या निवडणुकीत प्रभागात कोणत्या समाजाचे प्राबल्य आहे,हे…

Read More

दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” निवडणूक रणसंग्राम, कोकणात राणे विरुद्ध राणे असा संघर्ष रंगणार,आणखी एक घराणं दुभंगण्याच्या वाटेवर, राजकारणापायी आजवर अनेक घराणी दुभंगली.सत्तेच्या अमृताची गोडी फार काळ टिकत नाही,कालांतराने या अमृताचे विष होते व हे विष हळूहळू कुटुंबात पसरत जाते.राज्यात गेल्या पंधरा वर्षात अनेक कुटुंबे दुभंगली.पवार विरुद्ध पवार,मुंडे विरुद्ध मुंडे,ठाकरे विरुद्ध ठाकरे,हर्षवर्धन जाधव विरुद्ध त्यांची पत्नी संजना जाधव याव्यतिरिक्त अनेक कुटुंबाचा या यादीत समावेश आहे.आता नव्याने राणे विरुद्ध राणे असा संघर्ष कोकणात सुरू झाला आहे. खा.नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश व नितेश,ही दोन्ही मुले गेली अनेक वर्षे कोकणच्या राजकारणात सक्रिय आहेत.पण या दोघांमधून विस्तव जात नाही.अखेर गेल्या विधानसभा निवडणुकीत या दोघांनी…

Read More

दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” पुण्याचे राजकारण तापले,अजित पवार व मुरलीधर मोहोळ चांगलेच अडचणीत… शिवसेनेचे ( शिंदे गट ) अनेक मंत्री व आमदारांची लक्तरे वेशीला टांगण्यात भाजपला यश आल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना महायुतीमधील अदृश्य शक्तीने,राष्ट्रवादी काँग्रेसला ( अजित पवार ) अडचणीत आणण्यास सुरुवात केली आहे.अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे आजवर अनेक प्रकरणी अडचणीत आले असून आता पुणे कोरेगाव पार्क उच्चभ्रू नागरी वसाहतीमधील सुमारे १८०० कोटी रु.ची जमीन ३०० कोटी रु.विकत घेतल्याचे प्रकरण शिवसेनेचे ( शिंदे गट ) अंबादास दानवे यांनी उघडकीस आणले. याप्रकरणाशी आपला दुरान्वये संबंध नसल्याचा दावा अजित पवार जरी करत असले तरी…

Read More