दीपक मोहिते,
दिल्लीत भीषण स्फ़ोट ; आठ जणांचा जागीच मृत्यू,तर अनेक जण जख्मी…
काल सांय. ७.०० च्या सुमारास दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या भीषण स्फ़ोटात ८ जणांचा मृत्यू तर अनेक जण जख्मी झाले आहेत.या प्रकरणी सुरक्षा यंत्रणानी एका महिला डॉक्टरसह आठ जणांना ताब्यात घेतले आहे.हा आत्मघाती हल्ला असल्याचे स्पष्ट झाले आहे.या घटनेनंतर देशभरात सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

पोलिसांनी रात्री ९.३० वाजता दिलेल्या माहितीनुसार,या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला आहे.दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते संजय त्यागी यांनी माध्यमाशी फोनवरून बोलताना मृतांच्या संख्येबाबत ही माहिती दिली.स्फोटाच्या कारणाचा शोध घेण्यात येत आहे.
लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ एका कारमध्ये हा स्फोट झाला.या स्फ़ोटात ८ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक्सवर पोस्ट करत या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं.”आज संध्याकाळी दिल्लीतील स्फोटात ज्यांनी आपले नातेवाईक गमावले आहेत,त्यांच्या प्रती मी शोक व्यक्त करतो.जखमी झालेल्यांनी लवकरात लवकर बरं व्हावं, अशी प्रार्थना करतो,असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे.
तसेच,गृहमंत्री अमित शहा आणि इतर अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतल्याची माहितीही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये दिली.
गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त सतीश गोलचा आणि इतर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यापूर्वी त्यांनीही घटनेबाबतही सविस्तर माहिती दिली.
“आज संध्याकाळी ६.५२ च्या दरम्यान दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सुभाष मार्ग चौकात कारमध्ये स्फोट झाला.या स्फोटात तीसहून अधिक जण जखमी झाले असून काही गाड्यांचं नुकसान झालं आहे.प्राथमिक माहितीनुसार ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे,” असं शहा म्हणाले.
” एन.एस.जी.आणि एन.आय.ए.ची पथकं आणि एफ.एस.एल.नेही सखोल चौकशी सुरू केली आहे.परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.दिल्ली पोलीस आयुक्त आणि स्पेशल ब्रँचचे प्रमुख घटनास्थळी उपस्थित आहेत,” असंही ते पुढे म्हणाले.
आम्ही सर्व शक्यतांचा तपास करत आहोत.सर्व बाबींचा सखोल चौकशी करण्यात येणार आहे.
दिल्ली पोलिस आयुक्त सतीश गोलचा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, ” आज ६.५२ वाजता धिम्या गतीने चालणारी गाडी सिग्नलवर थांबली होती.त्या गाडीत हा स्फोट झाला व या स्फोटामुळे आसपासच्या गाड्यांचेही खूप नुकसान झालं.
एफ.एस.एल,एन.आय.ए.अशा सर्व यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत.
दरम्यान,दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईसह देशभरात सर्वत्र खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.

