Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, नवनिर्वाचित महापौर अजीव पाटील यांच्या समोर असलेली आव्हाने… १ ) विकासकामात ठेकेदारांचा होत असलेला मनमानीपणा रोखणे व विकासकामांना वेग देणे, ( शहर स्वच्छता, वैद्यकीय सेवा, रस्त्याची दुरावस्था, अपुरा पाणीपुरवठा, मच्छर व भटक्या कुत्र्यांचा वाढता सुळसुळाट, प्रशासकीय कामकाजात सुधारणा, मनपाच्या स्वतःच्या मालकीच्या शाळा, रखडलेल्या रुग्णालयाचे काम जलदगतीने मार्गी लावणे, चार शहरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करणे, फेरीवाले व पार्किंग व्यवस्था करणे, नालेसफाईच्या कामातील बजबजपुरी रोखणे व मनपाची परिवहन सेवा अधिक प्रभावी करणे, ) २ ) करदात्यांची कैफियत व तक्रारी ऐकण्यासाठी तीन महिन्यातून एकदा ” तक्रार निवारण दरबार, ” चे आयोजन करणे,या दरबारात करण्यात येणाऱ्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडणे..…

Read More

दीपक मोहिते, ” न्यूजलाईन,” ७ फेब्रु.रोजी १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका, येत्या ७ फेब्रु. रोजी १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत. एकूण ३४ जिल्हा परिषदापैकी पहिल्या टप्यात रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली,सोलापूर, कोल्हापूर, छ.संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर या १२ जिल्हा परिषदांचा त्यामध्ये समावेश आहे.प्रशासकीय राजवटीचा दीर्घकालीन अनुभव घेणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेला आता या निवडणुकांमुळे दिलासा मिळणार आहे.या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जय्यत तयारी केली असून पहिल्या टप्यात होत असलेल्या निवडणुकीत ग्रामीण भागातील मतदार कोणाच्या पाठीशी उभा राहतो,हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. या निवडणूकासोबत सुमारे १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत.त्यामध्ये १ )…

Read More

दीपक मोहिते, ” न्यूजलाईन,” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अर्थमंत्रीपदाची जणू लॉटरीच लागली, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण रद्द होणे,ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पथ्यावर पडली आहे.उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना अर्थखाते दिले जाणार नाही,ही काळ्या दगडावरची रेष होती.हे विलिनीकरण झाले असते तर अर्थमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात जयंत पाटील यांना द्यावे लागले असते.त्यामुळे सध्या फडणवीस यांनी हे मंत्रीपद तूर्तास आपल्याकडे ठेवले आहे.एकाच व्यक्तीकडे दोन महत्वाची खाती देणे,हे अत्यंत चुकीचे आहे.पण चूक किंवा योग्य या दोन शब्दाशी भाजपला कोणतेही देणेघेणे नाही.त्यामुळे फडणवीस यांनी योग्य खेळी करत गृह व अर्थ ही दोन्ही महत्वाची खाती आपल्याकडे ठेवली आहेत. अर्थखाते हे गृह खात्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे अत्यंत…

Read More

दीपक मोहिते, अर्थसंकल्प ; ” ख़ुशी कम, जादा गम,” शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या या अर्थसंकल्पामध्ये सरकारने तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि सामाजिक सुरक्षा या क्षेत्रावर विशेष भर देण्यात आल्याचे पाहायला मिळाले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत सादर केलेला २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प हा मध्यमवर्गासाठी दिलासा देणारा नाही. भारताची दिशा ठरवणारा दस्तऐवज म्हणून भाजपचे नेते गुणगान गात असले तरी हा अर्थसंकल्प म्हणजे आकड्याचा खेळ असल्याचे जाणवते. या अर्थसंकल्पातून सरकार दुरगामी विकासाचा आराखडा मांडण्याचा प्रयत्न असल्याचे जरी सांगत असले तरी तो तसा नाही. आर्थिक स्थैर्यासोबत मूलभूत गरजांवर भर…

Read More

दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ; भाजप व शिवसेना ( शिंदे गट ) सरस ठरणार, राज्यातील १२ जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका येत्या ७ फेब्रु. रोजी होत आहेत.जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन टप्यात घेण्याचा निर्णय आयोगाने घेतल्यामुळे पहिल्या टप्यातील निवडणुका या आठवड्यात होत आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली सोलापूर, कोल्हापूर, छ. संभाजी नगर, परभणी धाराशिव व लातूर या जिल्हा परिषदांचा त्यामध्ये समावेश आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषदा, नगरपंचायती व महानगरपालिका निवडणुकीत महायुतीमधील भाजप व शिवसेना ( एकनाथ शिंदे ) या दोन प्रमुख पक्षानी अभूतपूर्व यश प्राप्त केले. त्यामुळे तमाम राजकीय पक्षांचे…

Read More

दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” महानगरपालिका निवडणुका ; राज्यात भाजपची चौफेर फटकेबाजी, नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपने अपेक्षेनुसार सर्वाधिक महानगरपालिका जिंकून पहिला क्रमांक पटकावला.या निवडणुकीत ठाणे,वसई – विरार व कल्याण – डोंबवली वगळता इतर २६ महानगरपालिका निवडणुकीत त्यांनी एकहाती झेंडा फडकावला आहे.तसेच,उर्वरित तीन महानगरपालिकेत दमदार एन्ट्री केल्यामुळे शिंदे यांची शिवसेना व बहुजन विकास आघाडीला भविष्यात धोका होऊ शकतो.उल्हासनगर महानगरपालिकेत भाजपला काठावरचे बहुमत असले तरी सोबत असलेल्या शिंदे गटाचे नगरसेवकांना ते आपल्या जाळ्यात ओढतील, अशी शक्यता आहे. ठाणे महानगरपालिकेत शिंदे गटाला पूर्ण बहुमत मिळाले आहे. येथे त्यांना शिंदे गटाला पाठिंबा दिल्याशिवाय गत्यंतर नाही. कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेत शिंदे गटाला बहुमतासाठी केवळ…

Read More

दीपक मोहिते, नॅशनल डेस्क, अजितदादाच्या जाण्यानंतर राजकीय हालचालींना वेग,सुनेत्रा पवार आज सांयकाळी शपथविधी होणार, अजितदादा यांच्या अपघाती मृत्यूनंतर महायुतीमधील सत्तास्पर्धेला चांगलाच वेग आला आहे.उपमुख्यमंत्री व अर्थ व नियोजन खाती कोणाकडे सोपवण्यात येणार ? यावर खलबते सुरू झाली आहेत.उपमुख्यमंत्रीपद सुनेत्रा पवार यांना देण्यात यावी,अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यानी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही मागणी मान्य करतील,अशी शक्यता आहे.पण अर्थ व नियोजन खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाऊ देणार नाहीत. कारण अर्थमंत्रीपद हे गृहमंत्रीपदा इतकेच महत्वाचे आहे. २०२४ मध्ये पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर गृहमंत्रीपद आपल्याला मिळावे,त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रयत्न केले होते. पण देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी त्यांची डाळ शिजू…

Read More

दीपक मोहिते, नॅशनल डेस्कसाठी, बॉटमलाईन, अजितदादा गटाचे आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरू होतील, अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात आता उलथापालथी होण्याची शक्यता आहे.ही दुर्घटना घडण्यापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.त्याच सुमारास महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात भाजपचे पार्थ पवार यांचे जमिनीचे गैरव्यवहार उजागर होणे तर अजित दादा पवार यांनी भाजपवर पलटवार करत पुणे मनपात भाजपने केलेला भ्रष्टाचार उघडकीस आणला.तेव्हापासून भाजप व अजितदादा पवार यांच्यातील संबंध ताणले गेले होते.तेव्हापासून अजितदादा पवार यांनी शरद पवार यांच्याशी जुळवून घेण्यास सुरुवात केली होती.अजित पवार व शरद पवार हे दोघे काका – पुतणे एकत्र आल्यास राज्यात आपल्या विरोधात प्रभावी पर्याय उपलब्ध…

Read More

दीपक मोहिते, ” संवेदना,” एका वादळाची अचानक झाली एक्झिट… काल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यू झाला.त्यांच्या अकाली निधनाने अवघा महाराष्ट्र स्तब्ध झाला.दादा इतक्या लवकर एक्झिट घेतील,असे कोणालाही वाटले नव्हते,पण काळाने घात केला.अशाप्रकारे एका वादळाचा शेवट झाला.त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.धाडस,अभ्यासूवृत्ती, स्वतःला झोकून देऊन काम करण्याची पद्धत व प्रशासकीय यंत्रणेवर पकड ठेवण्याचे कसब,या गुणामुळे त्यांनी अगदी लहान वयातच खूप काही साध्य केले होते.धाडसी वृत्तीमुळे ते अनेकदा अडचणीत देखील आले.पण आपल्याकडून चूक झाली,हे सांगण्याचे धाडस त्यांच्या अंगी होते.त्यांच्या या स्वभावामुळे ते यशाची एकेक पायरी यशस्वीपणे चढू शकले.निधीवाटपात ते अन्य पक्षाच्या आमदारावर अन्याय करतात,असा…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” महाराष्ट्राचा पुरोगामी चेहरा काळवंडत चालला आहे… गेल्या दोन दशकापासून महाराष्ट्र नासवण्याचे ऐतिहासिक काम, या राज्यातील अनेक राजकीय पक्षांनी केले व आजही करतच आहेत. त्यामुळे एकेकाळी पुरोगामी अशी ओळख असलेल्या महाराष्ट्राचा चेहरा पार काळवंडला गेला आहे.भगवा की हिरवा, अशा वादामुळे आपण एकमेकांकडे आता संशयाने पाहायला लागलो आहोत, ही बाब राज्याच्या पिछेहाटीला कारणीभूत ठरली आहे.या सर्व गदारोळात माझ्या तिरंगाचा कोणीच कसा विचार करत नाहीत,असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात उभा ठाकला आहे. आज, आपण सारे एका धोकादायक वळणावर येऊन पोहोचलो आहोत.भारतीय संविधानात हिरवा किंवा भगवा या दोन्ही शब्दाला स्थान नसताना मात्र ज्या लोकांनी राज्य नासवण्याचा विडा उचलला आहे, अशांना…

Read More