दीपक मोहिते,
मोदी सरकारची घाबरगुंडी,
अभिजित दिपके व त्याचे सहकारी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात,
कॉक्रोच जनता पार्टीच्या धसक्याने मोदी सरकारने लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवत पोलीसराज प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चालवला आहे. आज सकाळी दिल्ली पोलिसांनी सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके याला दिल्ली विमानतळावर विमानातून ताब्यात घेतले. तसेच अभिजित दिपके याचे सहकारी सौरव दास, आशुतोष राका व युट्युबर ध्रुव राठी यांना अगोदरच अटक करण्यात आली आहे.
अभिजित दिपके याला अटक करण्यासाठी दिल्ली पोलीस विमानात शिरले असता अभिजित याने संताप व्यक्त करत ” आपला देश कोणत्या दिशेने चालला आहे ? इंदिरा गांधी यांनीही असं कधी केले नव्हते. तुमच्या या कारवाईला आम्ही घाबरत नाही.असे पोलिसांना सुनावले. सरकारने दिल्लीकडे जाणाऱ्या ट्रेन्स रद्द केल्या आहेत. सुमारे ४५ मेट्रो स्थानके बंद करण्यात आली. संपूर्ण दिल्लीत प्रशासनाने हजारो पोलीस तैनात केले आहेत.ही हिटलरशाही असून त्याला घाबरून आम्ही गप्प बसणार नाही.असे आंदोलकांनी जाहीर केले आहे.
एकंदरीत ही परिस्थिती लक्षात घेता, मोदी सरकारने विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी सरकारी यंत्रणेचा बेकायदेशीर वापर करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाचा मोदी सरकारने धसका घेतल्याचे स्पष्ट होत आहे.

