दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
तरुणासोबत वकिलही उतरले रस्त्यावर ; साडेतीन हजार तरुण व १०० वकील अटकेत,
देशात दुसऱ्या आणीबाणीची चाहूल लागली असून आज दिल्ली पोलिसांनी माध्यमाच्या प्रतिनिधीना जंतरमंतर वरून हाकलून दिले. पोलिसांची ही कृती नव्या आणीबाणीला आमंत्रण देणारी असल्याचे मानण्यात येत आहे.
तरुणांनी जंतरमंतरवर होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सामील होऊ नये, यासाठी मोदी सरकार आता साम, दाम दंङ व भेद अशी निती वापरू पाहत आहे.आज सकाळपासून होणाऱ्या या आंदोलनाचे वृत्तसंकलन करण्यासाठी मैदानावर गोळा झालेल्या मीडियाच्या प्रतिनिधीना दिल्ली पोलिसांनी अक्षरशः हाकलून दिले. तर दुसरीकडे आंदोलनस्थळी येणाऱ्या तरुणांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली पोलिसांनी संविधानाने दिलेले हक्क व अधिकार पायदळी तुडवण्यास सुरुवात केली आहे. आज दिवसभरात दिल्ली पोलिसांनी शेकडो आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. १९७५ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जी चूक केली होती, तीच चूक मोदी सरकार करत आहे. त्यामुळे इंदिरा गांधी यांच्या सरकारचे जसे पतन झाले, तसेच पतन मोदी सरकारचे होणार आहे. देशभरात सध्या ज्या काही घडामोडी घडत आहेत, त्या पाहता आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे पावलोपावली जाणवू लागले आहे. आज मुंबई पोलिसांनी महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना अटक केली आहे. तर सीजेपीच्या नेत्या रत्नासिंग यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यासर्व घडामोडीचा निषेध करण्यासाठी दिल्लीतील वकील रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.त्यापैकी १०० वकिलांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. या सर्व वकिलांना यमुना क्रीडा संकुलात ठेवण्यात आले आहे. पोलिसांकडून दडपशाही होत असतानाही आंदोलक मागे हटण्यास तयार नाहीत. हे आंदोलन चिरडण्यासाठी सरकार ज्या पद्धतीने पोलीसबळाचा वापर करत आहे, त्याचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे.
दरम्यान भाजपचे प्रवक्ते खा. संबित पात्रा यांनी जंतरमंतरवर अराजक पसरवाणाऱ्या काही शक्ती सक्रिय झाल्याचा आरोप केला आहे. पण सरकार हे आंदोलन दडपण्यासाठी जी काही दडपशाही करत आहे, त्याची तुलना आणीबाणीच्या काळात झालेल्या दडपशाहीशी करण्यात येत आहे.अभिजित दीपके व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना अटक करण्यात आल्यानंतर सीजेपीने आंदोलनाचे नेतृत्व अजिंक्य शिंदे याच्याकडे सोपवले आहे.आज दिवसभरात दिल्ली पोलिसांनी सुमारे साडेतीन हजार तरुणांना अटक केली आहे.तरीही तरुणांचे लोंढे जंतरमंतरच्या दिशेने येत आहेत.

