Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, आपण,आणखी किती काळ ठराविक कुटुंबाची गुलामी करणार आहोत ? स्वातंत्रपूर्व काळात आपण इंग्रजाची गुलामी स्विकारली होती. त्यामुळे देशातील संसाधनाची त्यांनी चांगलीच लूट केली.ईस्ट इंडिया या छोटेखानी कंपनीने दीड ते शतकापूर्वी आपल्या देशात घुसखोरी केली व हां हां म्हणता त्यांनी देश ताब्यात घेतला. १५ ऑगस्ट १९४७ साली आपला देश गुलामगिरीतून मुक्त झाला. गुलामगिरीचे हे जोखड भिरकावण्यासाठी झालेल्या देशव्यापी आंदोलनात अनेक स्वातंत्र्यवीरानी आपले देह ठेवले. अनेकांची कुटुंबे त्या लढ्यात बेचीराख झाली. १४ ऑगस्टच्या मध्यरात्री शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या व आपण मोकळा श्वास घेऊ लागलो. या ऐतिहासिक घडामोडीनंतर आपल्याला खूप काही भोगावे लागले. इंग्रजानी त्यावेळी देशाचे भारत…

Read More

deepak mohite, Grandmother’s Footsteps – The Grandson’s Journey ” Frontline,” Author: Deepak Mohite, Exactly 49 years ago from today, on 23rd August 1977, for the first time after independence, the Indian National Congress and Indira Gandhi suffered a crushing defeat. A wave of anger against the Congress had swept across the country.During the counting of votes for the 1977 Lok Sabha elections in the premises of Delhi’s Tis Hazari court, the Janata Party and the then Jana Sangh, now the BJP, came up with a slogan – “Show a Congressman and get Rs. 100.” This slogan hurt many Congressmen deeply.…

Read More

दीपक मोहिते, कॉक्रोचच्या दणक्याने भाजपचा तरुणाईशी संवाद, अभिजित दिपके याच्या कॉक्रोच जनता पार्टीने भाजपची झोप उडवून टाकली आहे. भविष्यात आपल्यासमोर उभ्या ठाकणाऱ्या संकटाची चाहूल भाजप व त्यांची मातृ संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जाणवू लागली आहे. त्यामुळे या दोघांनी तरुणाईशी संवाद साधण्याच्या उपक्रमाची घोषणा केली आहे. आजपासून नागपूरच्या रेशीमबागमध्ये होणाऱ्या या अधिवेशनात भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तरुण पदाधिकारी झेन-जी पिढीच्या ३० हजार तरुणाशी संवाद साधणार आहेत. तर दुसरीकडे मोदी सरकार देखील तरुणांसाठी नव्या उपक्रम सुरु करण्याच्या तयारीला लागले आहे.” एक दिवस,एक उपक्रम,”असा हा कार्यक्रम असून दररोज एका मंत्र्याने एका विद्यापीठाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधयचा आहे. या भेटीत विद्यार्थ्यांच्या…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आम्ही करदात्यांनी तुमचं काय घोडं मारले ? वसई तालुक्यात गेल्या वर्षी परिवर्तन झाल्यापासून भाजप व इतर सामाजिक संघटना चांगल्याच सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. वर्षानुवर्षे सत्तेत असलेल्या बहुजन विकास आघाडीचा आपण पराभव करू शकतो, असा विश्वास त्यांच्यामध्ये दुणावला व तालुक्यात वेगळे वारे वाहू लागले. यंदा झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला जबरदस्त फटका बसल्यामुळे भाजप व या सामाजिक संघटना अधिक आक्रमक झाल्या.त्यांचे आक्रमक होण्यामुळे बहुजन विकास आघाडीची अवस्था चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूसारखी झाली आहे. महानगरपालिकेच्या प्रत्येक महासभेत विरोधी पक्षाने विकासाच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना घेरण्यास सुरुवात केली. गेली १६ वर्षे या महानगरपालिकेत जाब विचारणारा विरोधी पक्ष नव्हता, त्यामुळे अकरा वर्षे…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” महानगरपालिकेत ” लुटालूट,” हा एकमेव कार्यक्रम सुरू आहे…🤦‍♂️🤦‍♂️ वसई विरार शहर महानगरपालिका गेल्या अनेक वर्षांपासून विविध भानगडीमुळे चांगलीच प्रकाशझोतात आली आहे. गेली सतरा वर्षे या महानगरपालिकेत विरोधी पक्ष नावापुरता होता. त्यामुळे सत्ताधारी पक्षाला मनमानी कारभार करता आला. पण गेल्या निवडणुकीत भाजपने ४४ जागा जिंकल्या व विरोधी पक्ष म्हणून सूत्रे हाती घेतली व विरोधी पक्षाने राखणदाराची भूमिका यशस्वीपणे राबवण्यास सुरुवात केली. त्यामुळे अनेक आर्थिक घोटाळे लोकांसमोर येऊ शकले. भाजपच्या आक्रमक पवित्र्यामुळे सत्ताधारी पक्षाला अनेकदा माघार घ्यावी लागली. माध्यमाचा बेमालूम वापर करत भाजपच्या लोकांनी आजवर कधीही बाहेर न आलेले आर्थिक घोटाळे चव्हाट्यावर आणले. आजच्या घडीला भाजपला रोखणे, सत्ताधारी…

Read More

” दीपक मोहिते,” ” बॉटमलाईन,” ” कारगिल विजय दिन ; भारतीय लष्कराची दैदिप्यमान कामगिरी , दरवर्षी संपूर्ण भारतात ” कारगिल विजय दिन,” साजरा करण्यात येतो.युद्धविषयक असलेले सर्व आंतरराष्ट्रीय कायदे धाब्यावर बसवत पाकिस्तानच्या लष्कराने आपल्या भूभागात घुसखोरी करत आपला भूभाग ताब्यात घेतला होता.३ मे १९९९ रोजी पाक लष्कराने घुसखोरी करत कारगिलमधील अनेक टेकड्यावर ताबा मिळवला. सुमारे ८५ दिवसाच्या घनघोर लढाईनंतर भारताने हा परिसर पुन्हा ताब्यात घेतला व पाक घुसखोरांना यमसदनी धाडले. या पराभवामुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगलीच नालस्ती झाली. भारताच्या तोफखान्याच्या माऱ्यासमोर पाकच्या सैन्याची धुळदाण उडाली व भयभीत झालेले लष्करप्रमुख मुशर्रफ यांनी पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ याना साकडे घातले. कोणत्याही परिस्थितीत…

Read More

दीपक मोहीते, ” बॉटमलाईन, ” आपले सरकार वैचारिक दारिद्राच्या उंबरठ्यावर… सुशिक्षित, पुरोगामी व वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ अशी जी आपली ओळख होती, ती आता सरकारच्या नाकर्तेपणामुळे हळूहळू नाहीशी होत चालली आहे. दिवसरात्र श्रीरामाचा जयघोष करणाऱ्यांनी या बदलामध्ये फार मोठी भूमिका पार पाडली आहे. आपल्या देशात शाहू, फुले व आंबेडकर यांना विसरायला लावण्याचे काम सध्या वेगाने सुरु झाले आहे, मात्र ते कदापि शक्य होणार नाही. ज्या शिक्षणमंत्र्यांच्या विभागाने शिक्षण व्यवस्थेचा बट्ट्याबोळ केला, त्या शिक्षणमंत्र्याला पाठीशी घालणे म्हणजेच वैचारिक दारिद्रपणा होय. प्रभू रामाचा जयघोष करत अभिजित दिपके याच्यावर शाईफेक करणे, हा देखील एकप्रकारे वैचारिक दारिद्रपणाच आहे. तुमचे आमचे पुरोगामी विचार ठेचायचेच, असा उद्देश उराशी…

Read More

दीपक मोहिते, सत्ताधारी व विरोधक एकाच माळेचे मणी ; करदाते प्रचंड नाराज, गेल्या काही दिवसांपासून वसईच्या महानगरपालिकेतील सत्ताधारी व विरोधक हे दोघेही बेधुंदपणे वागत आहेत. त्यांच्या या अशा वागण्यामुळे नागरिकांचे भले होईल, असा जर त्यांनी समज करून घेतला असेल तर ते मूर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत, असेच म्हणावे लागेल. गेल्या पंधरा वर्षापूर्वी म्हणजे महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर विकासाला गती येण्याऐवजी मनपा क्षेत्रातील विरार,नालासोपारा,नवघर – माणिकपूर व वसई या चार महानगराच्या विकासाचा बट्ट्याबोळ झाला. प्रशासकीय राजवटीत अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेची तिजोरी लुटून खाल्ली. करदात्याचा पैसा दिवसाढवळ्या लुटला गेला. त्याविषयी संबधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी सत्ताधारी व विरोधक एकमेकांच्या उरावर बसण्यात धन्यता मानत आहेत.…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” माजी आ.ठाकूर यांच्यासाठी येणारा काळ अत्यंत कठीण, वसई तालुक्याचे राजकारण २०२४ पासून वेगळ्या वळणावर आले असून,या दोन वर्षांच्या काळात वसईच्या राजकारणात फार मोठ्या उलथापालथी झाल्या. या प्रक्रियेत माजी आ.हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाला ग्रहण लागले. कालपर्यंत राज्याच्या राजकारणात ज्यांच्या शब्दाला मान होता, त्या ठाकुरांना गेल्या दोन वर्षात त्यांचे आप्तस्वकीय व भाजपने चांगलेच खिंडीत पकडले. ही अशी परिस्थिती का निर्माण झाली, यावर ठाकूर यांनी आत्मपरीक्षण करायला हवे होते. पण ” शेर कभी घास नही खाता,” अशा गुर्मीत राहून त्यांनी गेल्या दोन वर्षात खूप काही गमावले. त्यांच्या सतत अवतीभवती असणाऱ्यांनी त्यांच्या जीवावर खूप काही कमावले. पण,त्यांचे पक्षाच्या जडणघडणीमध्ये योगदान…

Read More

दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” लोक वर्षभरातच तुम्हाला कंटाळले, नालासोपारा हे शहर समस्याग्रस्त म्हणून कायम चर्चेत असते. अनधिकृत बांधकामे, वाढती गुन्हेगारी, तीव्र पाणीटंचाई, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा व दर पावसाळ्यात निर्माण होणारी पुरपरिस्थिती, अशा कारणामुळे हे शहर बदनाम झाले आहे. त्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीत या शहरातील मतदारांनी परिवर्तन केले. या मतदारांना नव्याने सत्तेत विराजमान झालेल्या लोकप्रतिनिधीकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या. आपण केलेला बदल, आपल्याला विकासाची वाट दाखवेल, बकाल झालेले आपले शहर कात टाकेल, आपल्या मुलाबाळांचे भविष्य घडवेल, अशा त्यांना अपेक्षा होत्या, पण कसले काय ? अवघ्या वर्षभरात या शहरातील नागरिकांवर कपाळावर हात मारून घ्यायची पाळी आली. कारण, विद्यमान लोकप्रतिनिधी हे केवळ…

Read More