- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर : खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार….
- ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज,
- भारतीय संविधानाचे देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान,
- मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात,
- प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक….
- अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली,
- ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार, कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता,
- कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, विरोधकांच्या टीकेला उत्तर देत बसू नका,भाजपकडून कार्यकर्त्यांना टिप्स, वसईतील राजकीय घडामोडीसंदर्भातील माहिती घेण्यासाठी मी दोन दिवसांपूर्वी दोन राजकीय पक्षाच्या मुंबईस्थित मुख्यालयात गेलो होतो.यावेळी अनेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या.अनेक नेत्यांशी चर्चा झाली असता चर्चेच्या ओघात मंत्रिमंडळाच्या गमती जमती देखील ऐकायला मिळाल्या.त्यामध्ये शिंदे गटाच्या परतीच्या सुरस कथांचा समावेश होता.पण वसईत घडणाऱ्या राजकीय घडामोडीसंदर्भात काही हाती लागत नव्हते.आपली ही मुंबई फेरी वाया जाते की काय ? असे वाटू लागले.त्यामुळे येथे काही मिळणे शक्य नाही,असे समजून बॅलॉर्ड इस्टेट येथील सक्तवसुली संचालनालयाचे कार्यालय गाठूया,असे मनोमनी ठरवून निघत असताना एका पदाधिकाऱ्याने शिपायाला पाठवून मला बोलावून घेतले.तत्कालीन केंद्रीय पेट्रोलियममंत्री राम नाईक यांच्या जनसंपर्काचे काम करणारा…
दीपक मोहिते, आपण लोकप्रतिनिधीना का व कशासाठी निवडून पाठवतो ? वाचा आणि विचार करा …. १ ) नगरसेवक :- परिसर स्वच्छता,गटारव्यवस्था, पाणीपुरवठा, चांगले रस्ते व परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी, परंतु ही कामे करण्याऐवजी आपले नगरसेवक अनधिकृत बांधकामे,विकासकाना नळजोडण्या मिळवून देणे,त्यांच्या अनधिकृत बांधकामाना संरक्षण देणे,ठेकेदाराकडून टक्केवारी मिळवणे,इ.कामांवर लक्ष देत असतात. २ ) आमदार :- मतदारसंघातील विकासाच्या जटील समस्या सोडवणे,उद्योगधंदे वाढ,शिक्षण,कृषी, रोजगार,कायदा व सुव्यवस्था स्थिती बिघडु नये,जातीय सलोखा अबाधित राखणे,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अडचणी व समस्यांचा शासनस्तरावर पाठपुरावा करणे व परिसर विकासाला चालना मिळावी,यासाठी राज्य सरकारकडून आर्थिक निधी मिळवणे,प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी अधिवेशनात आवाज उठवणे, परंतु ही सार्वजनिक कामे करण्याऐवजी साखर कारखाने काढणे,दुग्ध…
दीपक मोहिते, ७९ वा स्वातंत्र्यदिन ; ” ख़ुशी कम,जादा गम,” येत्या १५ ऑगस्ट रोजी आपला देश स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्षात पदार्पण करत आहे.गेल्या ७९ वर्षाच्या काळात आपल्या देशाने बरीच प्रगती केली.आर्थिक,सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात आपण भरीव कामगिरी करू शकलो.आज जगातील विकसनशील देशाच्या रांगेत आपला क्रमांक सहावा आहे.संरक्षण क्षेत्रात आपण सक्षम तसेच अन्न-धान्य उत्पादनातही आपण स्वयंपूर्ण झालो आहोत.१९६४ ते १९७२ हा काळ आपल्यासाठी कसोटीचा काळ होता.एकामागोमाग तीन युध्ये,दुष्काळ,अन्न-धान्यटंचाई व बेरोजगारी इ.समस्यानी देश आर्थिक खाईत सापडला होता.पण त्याकाळी दूरदृष्टी असलेल्या शासनकर्त्यांनी या सर्व संकटाचे धनुष्य यशस्वीपणे पेलले व देश त्यातून बाहेर पडला.देशाची धुरा जनतेने स्व. जवाहरलाल नेहरू त्यानंतर स्व. लालबहादूर शास्त्री व…
दिपक मोहिते, असे काय घडले महेश पाटील बाहेर पडले ? काल सांयकाळी साडेसातच्या सुमारास अचानक माझा मोबाईल खणखणला,संध्याकाळी ५.०० ते ८.०० दरम्यान माझे दुसऱ्या दिवसाच्या कामाचे नियोजन सुरू असते.त्यामुळे मला या दरम्यान कोणाचे सहसा कॉल येत नसतात.पण काल याच दरम्यान मला कॉल आला.मी वैतागलेल्या चेहऱ्याने कॉल उचलला.पलीकडून आवाज आला.” मोहिते साहेब,तुमच्या वेबपोर्टलसाठी ब्रेकिंग आहे.” ते ऐकल्यावर माझी उत्सुकता एका क्षणात टिपेला पोहोचली.तो कॉल माझ्या एका जवळच्या मित्राचा होता, त्याने जे काही सांगितले ते ऐकल्यानंतर मी चक्क उडालो,त्याची ब्रेकिंग होती,बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक व माजी आ.हितेंद्र ठाकूर यांचे निकटवर्तीय,त्यांच्या सुखदुःखात सतत त्यांना साथ देणारे प्रसिद्ध उद्योजक व माजी नगरसेवक महेश…
दिपक मोहिते, निवडणूक आयोगाचा दणका, केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी कारवाई ; ३३४ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द, केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन दिवसापूर्वी ३३४ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली आहे.निवडणूक आयोगाने फक्त सहा राजकीय पक्षांचाच राष्ट्रीय पक्षांचा दर्जा कायम ठेवला आहे. राष्ट्रीय सहा पक्षांमध्ये भाजप आणि काँग्रेस,आम आदमी पक्ष,माकप,एनपीपी आणि स्व.कांशीराम यांनी स्थापन केलेल्या आणि मायावती यांचे नेतृत्त्व असलेल्या बहुजन समाज पार्टी’चा त्यामध्ये समावेश आहे.याव्यतिरिक्त इतर अनेक राजकीय पक्षांचा प्रादेशिक दर्जा कायम ठेवला आहे.समाजवादी पक्ष,तृणमुल काँग्रेस,दोन्ही शिवसेना,दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस,द्रमुक अण्णाद्रमुक,तेलंगणा राष्ट्रीय समिती,हरियाणा विकास पार्टी,आसाम गण परिषद, वायएसआर काँग्रेस,बिजू जनता दल,राजद,ज.द.( धर्मनिरपेक्ष ) अनेक राज्यातील प्रादेशिक पक्षांचा समावेश आहे.निवडणूक आयोगाचा सदर निर्णय बहुजन…
दीपक मोहिते, राजकारणातील सभ्य व आदर्श व्यक्तिमत्व, आ.गणपतराव देशमुख ; तेथे कर माझे जुळती आज देशभरातील विधीमंडळांच्या इतिहासातील, एकाच मतदारसंघातून ११ वेळा निवडून येण्याचा अबाधित विक्रम ज्यांच्या नावावर आहे,ते शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आ. गणपतराव देशमुख यांचा जन्मदिन आहे. १० ऑगस्ट १९२७ रोजी मोहोळ तालुक्यातल्या पेनूर या गावी,एका गरीब शेतकऱ्याच्या घरी जन्म झाला. जवळचे लोक गणपतराव देशमुख यांना आबा म्हणत असत.मोहोळ-पंढरपूर रस्त्यावर असलेलं पेन्नूर हे त्यांचं गाव.मॅट्रिकचे शिक्षण पुण्यात घेतल्यानंतर गणपतराव देशमुख यांनी पुण्यात पुढील शिक्षण पूर्ण केलं.त्यांचे शिक्षण एल.एल.बी.पर्यत झाले. गणपतरावांची खरी जडणघडण झाली ती पुण्यातच.शिकत असतानाच ते शेतकरी कामगार पक्षाच्या विद्यार्थी सभेत काम करू लागले. स्वातंत्र्य नुकतच…
दीपक मोहिते, स्था.स्व.सं.च्या निवडणुकीत उद्धव,राज यांच्या मदतीने शिंदे गटाला डोके वर काढू देणार नाही… राज व उद्धव,या ठाकरे बंधुच्या एकत्र येण्याच्या चर्चेमुळे महाविकास आघाडी मध्ये सध्या अस्वस्थता निर्माण झाली आहे.त्याच सुमारास खा.संजय राऊत यांनी महानगरपालिका निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवणार नसल्याचे संकेत दिले आहेत. मात्र राज्यात महाविकास आघाडी व देशात इंडिया आघाडीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मनसेची परप्रांतीयांच्या संदर्भात असलेली भूमिका महाविकास आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला ( शरद पवार ) परवडणारी नाही. तसेच या दोन्ही पक्षाची धर्मनिरपेक्षिता मनसेला कधीच मान्य झाली नाही.त्यामुळे राज ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये सामील न होता शिवसेनेचा मित्रपक्ष…
दीपक मोहिते, आदिवासी समाजाने ” शिका व संघर्ष,” करा,अशी निती स्विकारायला हवी… काल जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.अनेक आदिवासी संघटनानी आपली समाजव्यवस्था,संस्कृती व पारंपारीक कलेचे दर्शन विविध उपक्रमातुन घडवले.स्वातंत्र्याच्या ७९ वर्षानंतरही हा समाज अद्याप ” वंचित घटक,” म्हणून जगभरात प्रचलित आहे.यामागची नेमकी कारणे काय आहेत ? याचा शोध ना सरकारने घेतला ना या समाजाच्या लोकप्रतिनिधीनी घेतला.निरक्षरतेचे वाढते प्रमाण हे,राज्यकर्त्यांच्या पथ्यावर पडले.”आदिवासी विकास,” या गोंडस नावाखाली राजकीय नेते व शासकीय अधिकाऱ्यांनी अक्षरश: लूट केली.आश्रमशाळा व आदिवासी विकास महामंडळे चराऊ कुरणे बनली.आदिवासी हा केवळ नावापुरताच ” जंगलचा राजा,” राहिला.त्यास आपली जगभरात नावाजलेली,परंतु आतून पोखरलेली ” लोकशाही व्यवस्था,” च कारणीभुत…
दीपक मोहिते, आम्हाला ” मन की बात,” नको तर ” दिलसे निकली हुई बात सुननी है,” येत्या १५ ऑगस्ट रोजी आपण स्वातंत्र्याच्या ७९ वर्षात प्रवेश करीत आहोत.बेरोजगारी,दुष्काळ, शेतकऱ्याच्या आत्महत्या,कुपोषण,शिक्षण व्यवस्थेतील विस्कळीतपणा व बालमृत्यु इ.समस्या आजही आमच्या पाचवीला पूजल्या आहेत.येणाऱ्या काळातही त्या तशाच राहणार आहेत.कारण हल्लीच्या राजकारण्यांना लोकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी व समस्याशी काहीही देणे घेणे नाही.कारण त्यांनी आपली घरं भरण्याचे एकमेव काम करण्यात कायम धन्यता मानली.त्यामुळे स्वातंत्र्याची आठ दशके उलटल्यानंतरही ग्रामीण भागातील जनता आजही अंधारात चाचपडत आहे.त्यांच्या जीवनात त्यांना उष्क:काल कधीच पाहायला मिळाला नाही. भारतीय संविधानाच्या २१ अ कलमाकड़े गेल्या ७९ वर्षात एकाही सरकारने जाणीवपूर्वक लक्ष दिले नाही.शिक्षणाचा हक्क मंजूर…
जव्हार,प्रतिनिधी जव्हारमध्ये ” बालमैत्रीपूर्ण आश्रमशाळा,” कार्यशाळा संपन्न. आदिवासी विकास विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,जव्हार आणि इंडियन सोशल सर्व्हिस युनिट ऑफ एज्युकेशन ( नागपूर ) यांच्या संयुक्त विद्यमाने ” बाल संरक्षण प्रणाली, ” स्थापित करणे,असा डोळ्यासमोर ठेवुन नुकतीच जव्हार येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये जिल्ह्यातील ३० शासकीय आदिवासी आश्रमशाळांच्या मुख्याध्यापक सहभागी झाले होते.कार्यशाळेचे उद्घाटन प्रकल्प अधिकारी डॉ.अपूर्वा बासुर ( भा.प्र.से ) यांनी केले. सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) सुभाष परदेशी, शिक्षण विस्तार अधिकारी सोमनाथ शेवाळे आणि ‘ईश्यू’ संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक व संचालक राजीव थोरात यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रार्थना गीताने कार्यशाळेला सुरुवात झाली.‘ईश्यू’ या…
