दीपक मोहिते,
स्था.स्व.सं.च्या निवडणुकीत उद्धव,राज यांच्या मदतीने शिंदे गटाला डोके वर काढू देणार नाही…
राज व उद्धव,या ठाकरे बंधुच्या एकत्र येण्याच्या चर्चेमुळे महाविकास आघाडी मध्ये सध्या अस्वस्थता निर्माण झाली आहे.त्याच सुमारास खा.संजय राऊत यांनी महानगरपालिका निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवणार नसल्याचे संकेत दिले आहेत. मात्र राज्यात महाविकास आघाडी व देशात इंडिया आघाडीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मनसेची परप्रांतीयांच्या संदर्भात असलेली भूमिका महाविकास आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला ( शरद पवार ) परवडणारी नाही. तसेच या दोन्ही पक्षाची धर्मनिरपेक्षिता मनसेला कधीच मान्य झाली नाही.त्यामुळे राज ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये सामील न होता शिवसेनेचा मित्रपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
गेल्या महिन्यात हिंदीच्या सक्तीला विरोध करण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले होते.दोघांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.त्यानंतर हिंदी सक्तीचा निर्णय महायुती सरकारने मागे घेतला.त्यानंतर विजय सभा घेऊन दोन्ही ठाकरे बंधू यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकत्र येण्याचे संकेत दिले होते.
या घडामोडीनंतर महाराष्ट्रात राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेला वेग आला असून, महापालिकेच्या निवडणुकीत दोघे सोबत लढतील,अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.पण भारतीय राष्ट्रीय
काँग्रेसचा राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत सहभागी करण्यास विरोध आहे.तर दुसरीकडे शरद पवार यांनी याबाबत अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
हिंदी सक्तीविरोधी आंदोलनानंतर दोन्ही भावांच्या भेटीगाठी वाढल्या असून, त्यांच्या युतीमुळे भाजपची डोकेदुखी वाढणार असुन एकनाथ शिंदे गटही प्रचंड तणावाखाली आला आहे.
मुंबईत आपल्याला धोका होता कामा नये,यासाठी देवेंद्र फडणवीस,उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे,यांचा एकमेकांना भेटण्याचा सिलसिला सुरु झाला आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी होण्याची होण्याची चर्चा सुरु झाली आहे.
महाविकास आघाडीत राज ठाकरे यांना घेण्यास काँग्रेसचा प्रखर विरोध आहे,त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडेल,अशी शक्यता आहे.
शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप याबाबत आपली भूमिका जाहीर केलेली नाही.मात्र,नागपूरमध्ये काल शरद पवार यांनी आधी त्यांना एकत्र येऊ तर द्या,नंतर आम्ही आमचा निर्णय कळवू,असे सांगत,सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकले आहे.
हिंदी सक्तीचा निर्णय महायुती सरकारने मागे घेतला,त्यामुळे शिवसेना व मनसेच्या गोटात सध्या आनंदाचे वातावरण आहे.त्यानंतर विजय सभा घेऊन दोन्ही ठाकरे बंधू यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपण एकत्र येणार असल्याचे संकेत दिले होते.
या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही सहभागी झाले होते. मंचावर फक्त राज आणि उद्धव ठाकरे बसले होते.मात्र खा.सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी या विजयी सभेला हजेरी लावली होती.आ.रोहित पवार यांनी मराठीसाठी सर्वांनी या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. दरम्यान उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते.
यावरून सध्या महाराष्ट्राच्या राज्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.दोन्ही भाऊ एकत्र आल्यास महापालिकेच्या निवडणुकीचे समीकरण बदलणार,असे सांगण्यात येत आहे.मात्र राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत घेण्यास काँग्रेसचा विरोध आहे.राज-उद्धव ठाकरे एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटेल,असेही दावे करण्यात येत आहेत.
दोन भावांच्या युतीवर शरद पवार यांनी नुकतेच भाष्य केले आहे. दोन भाऊ काय निर्णय घेतात,हे त्यांचे त्यांना ठरवू द्या. ते एकत्र येत असल्याने अनेकांची झोप उडाली आहे. ते सोबत येणार असतील तर आम्हाला आनंदच आहे.आल्यानंतर आम्ही आमचा निर्णय घेऊअसे शरद पवार यांनी सांगितले.
या सर्व धामधूमीत शिंदे गटाची अवस्था मात्र ” सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, ” अशी झाली आहे.शिंदे गटाला या निवडणुकीत पुन्हा डोके वर काढता येऊ नये,यासाठी देवेंद्र फडणवीस हे उद्धव व राज या दोघांशी हातमिळवणी करतील,अशी चर्चा आता सर्वत्र सुरु झाली आहे.

