दीपक मोहिते,
आम्हाला ” मन की बात,” नको तर ” दिलसे निकली हुई बात सुननी है,”
येत्या १५ ऑगस्ट रोजी आपण स्वातंत्र्याच्या ७९ वर्षात प्रवेश करीत आहोत.बेरोजगारी,दुष्काळ,
शेतकऱ्याच्या आत्महत्या,कुपोषण,शिक्षण व्यवस्थेतील विस्कळीतपणा व
बालमृत्यु इ.समस्या आजही आमच्या पाचवीला पूजल्या आहेत.येणाऱ्या काळातही त्या तशाच राहणार आहेत.कारण हल्लीच्या राजकारण्यांना लोकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी व समस्याशी काहीही देणे घेणे नाही.कारण त्यांनी आपली घरं भरण्याचे एकमेव काम करण्यात कायम धन्यता मानली.त्यामुळे स्वातंत्र्याची आठ दशके उलटल्यानंतरही ग्रामीण भागातील जनता आजही अंधारात चाचपडत आहे.त्यांच्या जीवनात त्यांना उष्क:काल कधीच पाहायला मिळाला नाही.
भारतीय संविधानाच्या २१ अ कलमाकड़े गेल्या ७९ वर्षात एकाही सरकारने जाणीवपूर्वक लक्ष दिले नाही.शिक्षणाचा हक्क मंजूर झाला,पण दुसरीकडे निरक्षरतेचे प्रमाण कमी न होता ते वाढतच राहिले. ग्रामीण भागात उद्योगधंदे-कारखानदारी निर्माण करण्याऐवजी सरकारने ते एकमेकांच्या राज्यात पळवण्याचे ऐतिहासिक कार्य पार पाडले. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुण,स्वातंत्र्याला आठ दशके झाल्यानंतरही रोजगारा अभावी वैफल्यग्रस्त आहे.स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होईल,आता पुन्हा ” मन की बात,” कानावर पडेल,पण ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण व आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांची ” दिल की बात,” आपले मायबाप सरकार तयार होणार नाही.मूठभर ” धन्नाशेठ,” साठी दिवसरात्र राबणाऱ्या सरकारला ” सर्वासामान्याचे सरकार, ” असे म्हणता येणार नाही.

