- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- १३ वी राष्ट्रीय वसई – विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धा १३ डिसें. २०२६ रोजी होणार,
- पालघर जिल्ह्याला दुष्काळ यादीतून का वगळले ? शेतकऱ्यांचा आक्रोश,
- राज्याच्या धरणातील पाण्याची स्थिती चिंताजनक,
- आपण कुठे निघालो आहोत ?
- संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेसाठी खा. डॉ. हेमंत सवरा यांची निवड,
- शिवसेना नांव बाव चिन्हाचा वाद ; न्यायाला विलंब म्हणजे न्याय नाकारण्यासारखेच,
- संसदेत घटनादुरुस्ती केल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणे कठीण ; हट्टीपणामुळे आरक्षणाची लढाई भरकटली,
- सरकारने समंजसपणा दाखवायला हवा ; चर्चेचे दरवाजे त्वरित उघडायला हवेत,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” रितिका चोप्रा यांच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच…. पत्रकारितेतील चाटूगिरीच्या बजबजपुरीत इंडियन एक्सप्रेसच्या महिला पत्रकार रितिका चोप्राच्या रूपाने एक आशेचा किरण दिसू लागला आहे. पत्रकारितेला चाटूगिरीचे ग्रहण लागले असताना रितिका चोप्रा यांनी जे धाडस दाखवले, त्याची तुलना अमेरिकेतील वॉटरगेट प्रकरणांशी केली तर ते चुकीचे ठरणार नाही. सर्वप्रथम ५० वर्षांपूर्वी घडलेले हे वॉटरगेट प्रकरण काय होते ? ते कसे घडले ? व राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन हे कसे चोर ठरले ? ते सर्वप्रथम समजून घेऊया. वॉशिंगटन डी. सी.मधील वॉटरगेट या आलिशान इमारतीमध्ये डेमोक्रेटीक पक्षाचे राष्ट्रीय मुख्यालय होते.१७ जून १९७२ रोजी रात्री दोन वाजता सुरक्षा रक्षक फ्रॅंक विल्स याला…
दीपक मोहिते, राजकीय विश्लेषक रायगड जिल्हा,राजकीय स्थिती, येणाऱ्या काळात खा. सुनील तटकरे यांची अग्नीपरीक्षा, रायगड जिल्ह्याचे राजकारण म्हणजे सगळ्यात मोठा ” गेम ऑफ थ्रोन्स, ” असा आहे. सरकारमधील तीन राजकीय पक्ष एकमेकांच्या उरावर बसण्यात धन्यता मानतात व ते एकमेकांच्या विरोधात सतत लढत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार ) सुनील तटकरे, पालकमंत्री भरत गोगावले ( शिवसेना शिंदे गटाचे ) व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण या तिघांमधून सध्या विस्तव जात नाही. या जिल्ह्यात एकूण सात आमदार आहेत. अलिबाग – महेंद्र दळवी – शिवसेना ( शिंदे गट ), पेण – रवि पाटील – भाजप, महाड – भरत गोगावले – शिवसेना ( शिंदे…
दीपक मोहिते, राजकीय विश्लेषण, उत्तर प्रदेशात काँग्रेस सपासोबत लढणार की भाजपशी थेट भिडणार ? उत्तर प्रदेशात २०२७ च्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वात मोठा प्रश्न आहे, कि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षासोबत राहणार की स्वबळावर लढणार ? हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन लढले नाही तर भाजपला मतविभागणीचा फायदा होऊ शकतो.त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा सपा सोबतच राहणार आहे. पण जागावाटपावरून त्यांच्यामध्ये सध्या मोठी रस्सीखेच सुरू आहे. २०२४ च्या लोकसभेत समाजवादी पक्ष व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या इंडिया आघाडीने भाजपला यूपीमध्ये ४३ जागांवर रोखले होते. त्यामुळे २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठीही आघाडी कायम राहीली आहे. राहुल गांधी आणि…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाजपच्या कार्यकर्त्याकडून वसुलीच्या कामाना वेग, नालासोपारा शहर विविध कारणामुळे सतत बदनाम होत असते. गुन्हेगारी, पाणीटंचाई, वाहतूककोंडी, अनधिकृत रिक्षा व्यवसाय व बांधकामे व पोलिसांकडून होणारी वसुली, इ. गैरप्रकार या शहरातील नागरिकांच्या पाचवीला पुजली आहे. याच सुमारास आज एका व्यापाऱ्याला धमकावणारा विडिओ कॉल समोर आला आहे. भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याचा पती या व्हिडियो क्लिपमध्ये व्यापाऱ्याला धमकी देत असल्याचे ऐकायला मिळाले. या व्यापाऱ्याने माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास भाजपच्या तीन कार्यकर्त्यांना जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी माध्यमासमोर केली. हे तिघे व त्यांचे अन्य दहा ते बारा सहकारी शहराच्या भाजीमार्केटमध्ये लहान विक्रेत्यांना धमकावून वसुली करत असतात, असा थेट आरोप त्या…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” महाराष्ट्रात समान नागरी कायदा लवकरच लागू होणार, राज्य सरकार लवकरच समान नागरी कायदा विधेयक आणणार आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या ७ सदस्यीय समितीला ६ महिन्यांत अहवाल देण्यास सांगण्यात आले असून येत्या हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. देशात सध्या गोवा आणि उत्तराखंड या दोन राज्यात समान नागरी कायदा लागू आहे. गोव्यात पोर्तुगीज काळापासून म्हणजे १८७० पासून हा कायदा लागू आहे. तर उत्तराखंडने १२ मार्च २०२४ रोजी देशात पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर युसीसी लागू केला. आसाममध्येही याच महिन्यात युसीसी विधेयक मांडण्यात आले आहे. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा…
दीपक मोहिते, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा – विरोधी पक्ष नेते मनोज पाटील, वसई-विरार महानगरपालिकेतील सत्ताधारी बहुजन विकास आघाडी आणि पालिका प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराविरोधात, तसेच नागरिकांच्या वाढत्या समस्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली पालिका प्रवेशद्वारावर तीव्र निदर्शने केली. आज सकाळी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी पालिका प्रशासनावर आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. यावेळी ते म्हणाले,घनकचरा व्यवस्थापनातील ३८ कोटी रु.च्या घोटाळ्यात केवळ ठेकेदारच दोषी नसून ज्या अधिकाऱ्यांनी ही बिले तपासून मंजूर केली, ज्या कन्सल्टंटने प्रक्रियेला मान्यता दिली आणि ज्यांनी पेमेंट दिले, ते सर्व अधिकारी जबाबदार आहेत. ठेकेदाराने…
दीपक मोहिते, ” स्पॉटलाईट, ” उशीरा का होईना, मुख्यमंत्री अखेर शेतीच्या बांधावर आले… उशीरा का होईना, पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुष्काळी जिल्ह्याच्या दौऱ्यावर रवाना झाले. या दौऱ्यात त्यांनी शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या व चर्चा केली. कर्नाटक सरकारने त्यांच्या राज्यात पाऊस कमी झाल्यामुळे त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विलंब न लावता आपल्या राज्यात दुष्काळ जाहीर केला. त्यामुळे महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आपल्या राज्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी लावून धरली. पण सरकार याविषयीं चकार शब्द बोलायला तयार नव्हते. पण महायुतीमधील पक्षातील आमदारामध्ये याविषयी असलेली नाराजी लक्षात घेऊन मुख्यमंत्री फडणवीस हे आज लातूर, धाराशिव व सोलापूर या तीन अतिगंभीर जिल्ह्याच्या…
दीपक मोहिते, केंद्रिय निवडणूक आयोगात बेदीली, निवडणूक आयोगात जी बेदीली माजली आहे, तीचा निषेध करावा, तेवढा थोडाच, एका मराठी दैनिकाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयुक्ताविरोधात इतर दोन आयुक्तानी कॅबिनेट सचिवाकडे तक्रार केल्याचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर केंद्र सरकारही आता अडचणीत आल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दहा महिन्यात सुखबीरसिंग संधू व विवेक जोशी, या दोन आयुक्तानी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेकुमार यांच्याविरोधात १४ वेळा आक्षेप नोंदवले आहेत. पण त्यावर कारवाई न झाल्यामुळे त्यांनी अखेर कॅबिनेट सचिवाकडे तक्रार केली आहे.या घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे. अनेक प्रकरणात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी मनमानीपणा केल्याचे या दोन आयुक्ताचे म्हणणे आहे. यामध्ये फॉर्म ६ मधील बदल,मतदारयाद्यांचे केंद्रिकरण,…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” नाशिक राज्यव्यापी शिबिरानंतर सुनील तटकरे यांचे राजकीय भवि्तव्य पणाला लागणार, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या जोरदार उलथापालथी सूरू आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व त्यांचे चिरंजीव पार्थ पवार या दोघांनी पक्षातील प्रस्थापित नेत्यांना वेसण घालण्यासाठी कंबर कसली आहे. याकामी त्यांना निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांची मदत होत आहे. आई व लेकाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सुनिल तटकरे व प्रफुल्ल पटेल यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. नाशिक येथे होणाऱ्या पक्षाच्या राज्यव्यापी अधिवेशनात सुनेत्रा पवार यांचे री – लॉंचिंग होणार आहे. यावेळी पक्षाचा नारा बदलण्यात येणार आहे. अजितदादा हयात असताना ” एकच वादा, अजित दादा असा नारा होता, त्याऐवजी ” आपल्या…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन, ” वन नेशन, वन इलेक्शन ; २०२९ किंवा २०३४ पासून लागू होण्याची शक्यता ? मोदी सरकारची तिसरी टर्म सूरू झाल्यानंतर देशात ” वन नेशन,वन इलेक्शन, ” या योजनेच्या चर्चेला वेग आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा या दोघांनी २ सप्टेंबर २०२३ रोजी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय समिती नियुक्त केली.या समितीमध्ये गृहमंत्री अमित शहा, माजी खा. गुलाम नबी आझाद, १५ व्या वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष एन.के. सिंग, लोकसभेचे माजी सरचिटणीस सुभाष कश्यप, ज्येष्ठ वकील हरीश साळवे, माजी दक्षता आयुक्त, केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल, यांचा समावेश आहे. या समितीने १९१ दिवस…
