- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा ; सोहळे मोठे व लक्षण खोटे,
- नाना, कोणालाही न सांगता निघून गेले ; अवघे सिनेजगत स्तब्ध,
- सरकार सुमारे ५० हजार शेतकऱ्यांच्या उरावर उभारतोय शक्तिपीठ महामार्ग,
- केवळ धर्मेंद्र प्रधान व ज्ञानेशकुमारला हटवून व्यवस्था सुधारणार का ? संपूर्ण व्यवस्थेतच बदल हवा,
- पालघर जिल्ह्याच्या राजकारणात भाजपच सरस ठरणार…
- ठाणे जिल्ह्यात शिंदे गटाची प्रतिमा डागाळतेय…
- … अन्यथा शेतकरी आत्महत्येच्या वाटेवर जातील,
- अन्न संकटाचे काळे ढग ; दीर्घकालीन कठोर उपाययोजना करणे गरजेचे….
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” स्पॉटलाईट, ” प्रशासकीय राजवटीतील एफएसआयचे घोटाळे चव्हाट्यावर, वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रशासकीय राजवटीत मंजूर झालेल्या अतिरिक्त एफएसआयच्या प्रकरणांची सखोल चौकशी झाल्यास मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी विकासक, आर्किटेक्ट व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत मिळत आहेत.राज्याचे अप्पर सचिव असीम गुप्ता यांनी महानगरपालिकेला तसे निर्देश दिले आहेत. अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशकांचा वापर केल्याचे समोर आलेल्या ८८ पुनर्विकास प्रकल्पांवर नगररचना विभागाने सुनावण्या घेतल्यानंतर आता २०२२ ते २०२५ या कालावधीत ऑफलाइन पद्धतीने देण्यात आलेल्या बांधकाम परवानग्यांचीही तपासणी करण्यात होणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या दप्तरी असलेल्या नोंदी व महारेराकडे नोंद करण्यात आलेल्या प्रकल्पांची पडताळणी होणार आहे.नियमबाह्य अतिरिक्त एफएसआयचा वापर…
दीपक मोहिते, ” साहित्य संपदा, ” रेखा चवरे यांच्या पुस्तकाचे थाटामाटात प्रकाशन, प्रसिद्ध लेखिका रेखा चवरे यांच्या ‘ ये हृदयी चे ते हृदयी, ‘ या पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी कथन केलेल्या गाण्यांच्या सर्जनशील आठवणींच्या पुस्तकाचे प्रकाशन सकाळ समूहाचे अध्यक्ष पद्मश्री प्रतापराव पवार यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृह पुणे येथे झाले. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या ९७ व्या जन्मदिनानिमित्त पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सादर केलेल्या लतादीदी आशाताई आणि मी या सांगीतिक कार्यक्रमात या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषाताई मंगेशकर, भारतीताई मंगेशकर, प्रतापराव पवार ,अमोल पालेकर ,सुरेश वाडकर या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला. सदर पुस्तक म्हणजे कला…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” मुंबई – गोवा महामार्ग लवकर पूर्ण होण्याची शक्यता नाही… गेली १३ वर्षे रखडलेला मुंबई – गोवा महामार्ग ( एनएच – ६६ ) हा महाराष्ट्राचा सर्वात दुर्देवी प्रकल्प ठरला आहे. राज्यकर्त्यांच्या नालायकपणामुळे हा महत्वाचा प्रकल्प खड्ड्यात गेला आहे. इतर प्रकल्पासाठी बळजबरीने जमिनी संपादन करणारे सरकार या प्रकल्पासाठी जमिनी संपादन करू शकत नाही, ही बाब दुर्देवीच म्हणावी लागेल. राज्यात फडणवीस सरकारने गेल्या चार वर्षात समृद्धी, द्रूतगती,ग्रीनफिल्ड, मेट्रो, कोस्टल असे अनेक प्रकल्प मार्गी लावले, पण हा महामार्ग मार्गी लावण्यात या सरकारला अपयश का आले ? यावर विचार करायला हवा. भुसंपादनाचा वाद हे सर्वात मोठे कारण असल्याचे शासकीय अधिकाऱ्यांचे…
दीपक मोहिते, खातेदारांना दिलासा, सूर्या प्रकल्पग्रस्तांना दिलासा, नवीन सातबारे मिळणार, पालघर तालुक्यातील मौजे हनुमाननगर व मौजे नेवाळे येथील सूर्या प्रकल्पग्रस्त खातेदारांच्या जमीन नोंदींबाबत राज्य मंत्रिमंडळाने नुकताच महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयानुसार संबंधित प्रकरणांचे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम २५७ अन्वये प्रकरणनिहाय पुर्ननिरीक्षण करण्यात येणार आहे. उपलब्ध वाटप आदेश, महसुली अभिलेख, प्रत्यक्ष ताबा, शेतीवहिवाट आणि आवश्यक क्षेत्रीय पडताळणीच्या आधारे पात्र खातेदारांच्या नोंदी अद्ययावत करून नवीन ७/१२ उतारे तयार करण्यात येणार आहेत. अद्ययावत ७/१२ नोंदींमुळे पात्र खातेदारांना जमीनविषयक व्यवहार, पीक कर्ज, पीक विमा तसेच विविध शासकीय योजनांसाठी आवश्यक अभिलेख उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. वाढवण बंदराशी संबंधित ग्रीनफिल्ड महामार्गाच्या भूसंपादन…
दीपक मोहिते, ” स्पॉटलाईट, ” ” अल निनो,” च्या संकटाची चाहूल… अल निनोची भिती सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे. या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे, हे सर्वप्रथम जाणुन घेवूया.स्पॅनिश भाषेत ” ” लहान बाळ, ” असा या शब्दाचा अर्थ आहे. प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान ०.५ सेंटीग्रेड पेक्षा अधिक वाढले कि अल निनोचा प्रभाव वाढतो. थोडक्यात सांगायचे झाल्यास समुद्र तापला कि जगभरातील पावसाचे गणित बिघडते. परिणाम :- १ ) पाऊस लांबणीवर पडतो किंवा तो कमी होतो. २ ) मान्सून पंधरा ते वीस दिवस उशिरा येतो. ३ ) परिणामत : धरणाच्या पाणीसाठ्यात घट होते. ४ ) कृषी उत्पन्न १५ ते २० टक्क्याने…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक ; सर्वोच्च न्यायालय सर्व बाजूने तपास करणार, गुजरातचा कुख्यात गुंड सोहराबुद्दीन शेख याच्या कथित बनावट चकमकीप्रकरणी विशेष न्यायालय, उच्च न्यायालयाने २१ पोलीस आणि एक फार्म हाऊस मालकासह २२ जणांना निर्दोष ठरवल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल झाले आहे. सध्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा संशयितांमध्ये समावेश होता. परंतु शहा यांना सत्र न्यायालयाने खटला सुरू होण्यापूर्वीच दोषमुक्त केले. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीमध्ये काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २१ वर्षांपूर्वी २३ नोव्हें. २००५ रोजी गुजरातमधील कुख्यात गुंड सोहराबुद्दीन शेख, त्याची पत्नी कौसर बी आणि सहकारी तुलसीराम प्रजापती या तिघांना हैदराबादहून…
दीपक मोहिते, प.रेल्वे प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना होण्याची गरज, बोरिवली ते डहाणू रेल्वे प्रवासा दरम्यान दररोज साडेतीन लाख जीव मुठीत धरून प्रवास करत असतात. गेल्या २५ वर्षात या पट्ट्यात प्रचंड नागरिकरण झाल्यामुळे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सकाळच्या पीक अवर्समध्ये प्रवाशांना ट्रेनमध्ये शिरणे देखील कठीण झाले आहे. गेल्या वर्षी या मार्गावर रुळ ओलांडणे, चालत्या गाडीत चढणे – उतरणे, दरवाजावर लटकत प्रवास करणे, यामध्ये हजारो नागरिकांचे बळी गेले. लोकसंख्या वाढीच्या तुलनेत प. रेल्वे प्रशासनाने यापूर्वी कधीही उपाययोजना केल्या नाहीत. प्रवासी वाढले, महसूल खोऱ्याने वाढला, पण त्याप्रमाणात सोयी – सुविधामध्ये वाढ झाली नाही. सकाळी पीक अवर्सला ट्रेनमध्ये सोडा पण फलटावर उभे राहणे…
दीपक मोहिते, स्पॉटलाईट, ( भाग क्र.३ ) ( एकूण २० भाग ) वसईत शिक्षणाचा प्रसार व्हावा, यासाठी समाजधुरीणानी सर्वस्व झोकून दिले… वसई तालुक्याची वाटचाल हळुवारपणे काँक्रिटच्या दिशेने सुरु झाली आहे. कृषी उत्पन्न व वनसंपदा यामुळे नावारूपाला आलेल्या या नगरीला हल्ली विकृत स्वरूप येऊ लागले आहे. अल्पावधित सुंदर अशा या ऐतिहासिक नगरीचे बकाल शहरात रूपांतर झाले. शेती, बागायतीना लागणारी खते, बैल, पेंढा, चारा, अवजारे व लाकूड इ. वस्तू खरेदीसाठी आवश्यक असलेले कर्ज घेण्यासाठी शेतकरी सावकार व शेठजीच्या घराचे उंबरठे झिजवू लागले. सावकार कर्ज देताना शेतकऱ्यांच्या जमिनी लिहून घेऊ लागले. आजही अनेक शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर सावकारांची नांवे पाहायला मिळतात. येथूनच तालुक्यातील शेती व…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” भाजपला गेल्या दीड वर्षात विकासाची व्याख्याच कळली नाही… वसई विरार शहर महानगरपालिकेच्या तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर वसईच्या राजकारणात एकप्रकारे मरगळ आली आहे. तर दुसरीकडे मतदार देखील ” आपण हे काय करून बसलो, ” अशा अवस्थेत असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपकडे पर्याय म्हणून पाहणाऱ्या मतदारांना आता कपाळावर हात मारून घेण्याची पाळी आली आहे. तालुक्यातील वर्षानुवर्षे रखडलेली विकासकामे मार्गी लागावीत यासाठी परिवर्तनाच्या माध्यमातून त्यांनी केलेला प्रयत्न त्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. पण आता वेळ निघून गेली आहे. त्यांच्या दिशाहीन कारभारामुळे पुढची चार वर्षे वसईच्या मतदारांना खूप काही भोगायचे आहे. वसईचा विकास सध्या मृत्यूशय्येवर लोळण घेत आहे. लोकप्रतिनिधी जो…
दीपक मोहिते, पालघर जिल्ह्यात २१ ठिकाणी महाकुंभ रोजगार मेळाव्याचे आयोजन, पालघर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या प्रत्यक्ष संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या २१ रोजगार महाकुंभ रोजगार मेळाव्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यांमध्ये प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून २२६ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली. पालघर जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील विविध नामांकित कंपन्या या रोजगार मेळाव्यांमध्ये सहभागी झाल्या होत्या. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, कौशल्य, अनुभव आणि उपलब्ध रिक्त पदांच्या आवश्यकतांनुसार थेट मुलाखती घेऊन निवड प्रक्रिया राबवण्यात आली. त्यामुळे रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना एकाच व्यासपीठावर विविध कंपन्यांशी संपर्क साधण्याबरोबरच उपलब्ध पदांसाठी प्रत्यक्ष मुलाखत…
