दीपक मोहिते,
प.रेल्वे प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना होण्याची गरज,
बोरिवली ते डहाणू रेल्वे प्रवासा दरम्यान दररोज साडेतीन लाख जीव मुठीत धरून प्रवास करत असतात. गेल्या २५ वर्षात या पट्ट्यात प्रचंड नागरिकरण झाल्यामुळे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सकाळच्या पीक अवर्समध्ये प्रवाशांना ट्रेनमध्ये शिरणे देखील कठीण झाले आहे.
गेल्या वर्षी या मार्गावर रुळ ओलांडणे, चालत्या गाडीत चढणे – उतरणे, दरवाजावर लटकत प्रवास करणे, यामध्ये हजारो नागरिकांचे बळी गेले. लोकसंख्या वाढीच्या तुलनेत प. रेल्वे प्रशासनाने यापूर्वी कधीही उपाययोजना केल्या नाहीत. प्रवासी वाढले, महसूल खोऱ्याने वाढला, पण त्याप्रमाणात सोयी – सुविधामध्ये वाढ झाली नाही. सकाळी पीक अवर्सला ट्रेनमध्ये सोडा पण फलटावर उभे राहणे देखील कठीण होत आहे.त्यामुळे रेल्वे प्रशासनाने खालील उपाययोजना करण्याची गरज आहे.
१ ) गर्दी नियंत्रणासाठी पायाभूत उपाय : सर्व लोकल्स १२ डब्याऐवजी १५ डब्याच्या करणे, ( बोरिवली – विरार दरम्यान सध्या सुरु आहेत, त्या डहाणूपर्यंत वाढवणे,)
२ ) नवीन एफओबी, लिफ्ट व एस्कलेटर उभारणे,
३ ) प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर बसवणे, गाडी थांबल्यानंतरच दरवाजे उघडतील,त्यामुळे ९० % अपघात कमी होतील.
१ ) अपघात रोखण्यासाठी तंत्रज्ञान :
एआय क्राऊड डिटेक्शन, सीसीटीव्ही,
गर्दी वाढली कि कंट्रोल रूमला अलर्ट, आरपीएफचे जवान तात्काळ रवाना होऊ शकतील,
२ ) पिवळी रेष व ऑटो अनाऊन्समेंट, ” कृपया पिवळ्या रेषेच्या मागे उभे रहा,” मराठी,हिंदी व इंग्रजी भाषेत उदघोषणा,
३ ) ट्रेसपासिंग रोखण्यासाठी भिंत :
रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूस ५ फूट उंच संरक्षक भिंत उभारणे,
प्रवासी जागरूकता :
चालत्या गाडीत चढू – उतरू नका,
एफओबीचा वापर करा, शॉर्टकटसाठी जीव धोक्यात घालू नका,
लहान मुले व ज्येष्ठ व्यक्तींना घट्ट धरा, त्यांना गर्दीत ढकलू नका,
संशयास्पद वस्तू आढळल्यास आरपीएफ किंवा १८२/ हेल्पलाईन १३९ वर कळवा,
वेळापत्रकात बदल :
सकाळी ८.०० ते ११.०० दरम्यान विरार – डहाणूवरून दर ७ मिनिटांनी एक फेरी,
महिला, दिव्यांग बाव ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रांग व डबा,
अशा उपाययोजना केल्यास रेल्वेप्रवाशांना नक्कीच दिलासा मिळू शकतो. तसेच अपघाताचे प्रमाण देखील कमी होऊ शकेल.

