- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- पोषणासोबत महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन,
- ऐतिहासिक वसई नगरीची अवघ्या काही वर्षात वाताहात झाली…
- कोकण कात टाकतोय, फक्त स्थानिकांचे पाठबळ हवे,
- आश्रमशाळा ; सरकारला उशिराने पण जाग आली…
- अबब… ९५७ कोटींचा कचरा घोटाळा ; कचऱ्यात सोने दडलेले असते,
- परिवहन समिती सदस्यानो, ” लगे रहो, “
- तीन पैश्याचा तमाशा बंद करा…
- जागतिक पर्यटन दिन ; आपल्या देशात पर्यटनवाढीसाठी चांगले वातावरण,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईडीच्या धाडीचे सत्र पुन्हा सुरू, महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पुन्हा ईडीचे हत्यार उपसले आहे.आज मुंबई व केरळ राज्याच्या प्रमुख शहरात ईडीने धाडी टाकल्या.त्यामध्ये आदित्य ठाकरे यांचा जिगरी दोस्त दिनो मोरीयाचा समावेश आहे.तसेच ठाणे,वसई-विरार,उल्हास नगर या महानगरपालिका व पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने ईडीचे पुढील लक्ष्य आहे.इडीच्या धाडी पुन्हा सुरू झाल्यामुळे राजकीय नेते व अधिकाऱ्यामध्ये सध्या भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिठी नदीचा गाळ उपसण्याच्या निविदेत १३०० कोटींचा आर्थिक घोटाळा झाल्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्या मित्रमंडळीवर सुमारे आरोप ठेवण्यात आले होते.या प्रकरणी अटकेत असलेल्या एका संशयीत आरोपीने या प्रकरणात माझा काही संबंध नसून पैश्याची जी काही देवाणघेवाण झाली,ती…
वसंत भोईर,वाडा किरीट सोमय्या यांनी कुडूस व वडवली ग्रामपंचायतीना भेटी देऊन जन्मप्रमाणपत्रा बाबतची घेतली माहिती, भाजपचे नेते व माजी खा.किरीट सोमय्या यांनी आज वाडा तालुक्यातील कुडूस व वडवली,या ग्रामपंचायतीला भेट देऊन जन्मनोंदणी प्रमाणपत्र यासंदर्भात माहिती घेतली.यावेळी त्यानी ग्रामसेवकाला अनेक प्रश्न विचारले. राज्यात मोठ्या स॔ख्येने बांगलादेश घुसखोर आले असून त्याबाबत किरीट सोमय्या राज्यभर फिरून माहिती घेत आहेत.याचाच एक भाग म्हणून वाडा तालुक्यातील काल त्यांनी कुडूस व वडवली,या ग्रामपंचायतीत विलंबित जन्म नोंदणी व प्रमाणपत्र १ जाने.२०२४ ते १ जाने.२०२५ या दोन वर्षांत या दोन्ही ग्रामपंचायतीकडून किती विलंबित जन्मनोंद करण्यात आली.त्या विषयीची संख्या व किती लोकांना यादरम्यान अनुपलब्धता प्रमाणपत्र देण्यात आली याबाबतची माहिती…
नदीम शेख,पालघर १५ व्या वित्त आयोगाकडून मिळालेल्या लाखो रु.च्या निधीच्या दुरुपयोग, १५ व्या वित्त आयोगातर्फे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था मूलभूत सेवा पुरवण्यासाठी मिळालेल्या निधीचा दुरुपयोग केल्याचा आरोप कुडणवासियांनी केला आहे.या निधीचा वापर स्वच्छता,पाणीपुरवठा आणि पाण्याचा पुनर्वापर,यांसारख्या कामांसाठी केला जातो.परंतु प्रशासनच्या उदासीनतेमुळे ठेकेदारांकडून नित्कृष्ट दर्जाची कामे केल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत, असाच एक प्रकार पालघर तालुक्यातील कुडण ग्रामपंचायतीमध्ये पाहायला मिळाला आहे. कुडण ग्रामपंचायत हद्दीतील “अ,” प्रभागात पंधरा वित्त आयोग योजनेतून सोलर पंप योजना,बोअरवेल व पाणी टाकी,यासाठी यंत्रणा राबवण्याच्या नावाखाली राज एंटरप्राइजेस या ठेकेदाराकडून रु.४ लाख ६८ हजार १२० रु. रकमेचे निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले होते. या कामात शासनाच्या…
दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण ; सरकारने सर्वप्रथम बंद पडणाऱ्या सरकारी शाळा वाचवाव्या… राज्याचा शिक्षण विभाग सध्या हेलकावे खात असून या विभागाच्या दिशाहीन धोरणामुळे आपल्या शिक्षण विभागाचा सध्या पार बट्ट्याबोळ झाला आहे.शिक्षणमंत्री अधूनमधून नवीन योजना जाहीर करत असतात,पण त्याचा फारसा उपयोग होत नाही.महाविकास आघाडीच्या काळात आदित्य ठाकरे यांनी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये इंग्रजी विषय सुरू करण्याचे जाहीर केले होते.ती योजना किती यशस्वी झाली,कळायला मार्ग नाही.आता शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर प्राथमिक. सैनिकी प्रशिक्षण देणार असल्याचे जाहीर केले आहे.राज्यात अडीच लाख माजी सैनिक असून त्यांच्या सहकार्याने हे धोरण राबवण्याचे त्यांनी जाहीर केले आहे.भुसे यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही…
सुरेश वैद्य,पालघर, ” नाविन्यपूर्ण उपक्रम,” पालघर जिल्ह्यात ५० लाख बांबू वृक्षलागवडीचा शुभारंभ, बांबू लागवडीसाठी पालघर जिल्हा हा उपयुक्त असा जिल्हा आहे.येथे नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या लागवडीतून जिल्ह्यातून होणारे स्थलांतर देखील रोखता येणे शक्य आहे.बांबूचे उत्पन्न,आपण महिला बचत गटाच्या माध्यमातून मार्केट लीकेज आणि प्रक्रिया उद्योगाला जोडण्याचे पुढील तीन ते पाच वर्षात प्रयत्न करणार आहोत.शेतकऱ्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा लाभ घेऊन बांबू लागवडीतून आपले जीवन बदलावे,असे प्रतिपादन राज्य कृषी मूल्य आयोग व कार्यकारी मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी आज धानिवरी ता.डहाणू येथे केले. जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना महाराष्ट्राच्या दुर्गम पालघर जिल्ह्यातील धानिवरी…
दीपक मोहिते, सुखद दिन, आजच्या दिवशी शिवाजी महाराज छत्रपती झाले. ६ जून १६७४ रोजी महाराष्ट्रातील रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा छत्रपती म्हणून औपचारिक राज्याभिषेक झाला.हिंदवी स्वराज्याचे प्रणेते व थोर मराठा योद्धा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त राज्यभरात शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो.याच दिनी भारतात हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. छत्रपती शिवाजी महाराज,हे महाराष्ट्राचेच नव्हे तर अखिल भारतवर्षाचे प्रेरणास्थान आहेत.राष्ट्र निर्माता असलेल्या या महापुरुषाच्या, लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजे ६ जून १६७४ म्हणजेच राज्याभिषेक दिन होय.हे रयतेचे राज्य शाश्वत चिरंतन रहावे,म्हणून महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला व शिवाजी महाराज,छत्रपती झाले,याच दिवशी स्वराज्याचे सार्वभौमत्व दुर्ग रायगडाच्या सदरेवरून घोषित…
सुरेश काटे,तलासरी, मान्सूनपूर्व खरेदीसाठी आठवडा बाजारात शेतकऱ्यांची झुंबड, पावसाची चाहूल लागताच मान्सूनपूर्व खरेदीला लोकांनी सुरवात केली आहे. परिसरातील आदिवासीं शेतकऱ्यांची आठवडा बाजारात सध्या झुंबड उडाली आहे. तलासरी तालुक्यातील आजूबाजूच्या गाव खेड्यापाड्यावरील आदिवासी बांधव व शेतकरीवर्ग शेतीपूर्व कामाला लागतो.त्यामुळे त्याला तीन ते चार महिने बाजारहाट करता येत नाही. पावसाळ्यात शेती हंगाम सुरु झाल्यावर बाजारहाटासाठी जावून खरेदी करण्यास वेळही मिळत नाही.त्यामुळे तो मान्सूनपूर्व चौमासाची ( पावसाळ्याच्या हंगामात ) खरेदी करून ठेवतो.या चौमासासाठी सुकी मासळी, मसाले,कडधान्ये,डाळी,हळद, कांदे,बटाटे,चिंच,कोकम, फाटी,जनावरांसाठी पेंढा,शा अनेकविध गरजेच्या वस्तू खरेदी करून तीन ते चार महिने पुरेल,इतका साठा करून ठेवतो. तलासरी तालुक्यात तलासरी, झरी,आमगाव,उधवा,कोचाई- बोरमाळ,दापचरी,धुंदलवाडी, अशा ठिकठिकाणी भरणाऱ्या आठवडी बाजारात…
नदीम शेख,पालघर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्ह्यात भव्य वृक्षारोपण मोहीम, खावडा ट्रान्समिशन प्रकल्पातर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पालघर जिल्ह्यात महत्त्वपूर्ण पर्यावरणीय उपक्रम राबवण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.हा उपक्रम पर्यावरणीय शाश्वततेबाबतच्या प्रकल्पाच्या कटिबद्धतेचे निदर्शक आहे, जो भारताच्या वीज प्रेषण पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या त्यांच्या मुख्य उद्दिष्टासोबत असा सुसंगत आहे. या वृक्षारोपण मोहिमेत स्थानिक समुदायांचा, विशेषतः शालेय विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.ज्यामुळे पर्यावरण संवर्धनाबाबत सामायिक जबाबदारीची भावना निर्माण झाली.विक्रमगड तालुक्यातील उटवली गावाच्या आदर्श विद्यालयात १०० रोपांची लागवड करण्यात आली, ज्यामध्ये ३० विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी झाले.विद्यार्थ्यांना रोपे देखील देण्यात आली. जेणेकरून त्यांनी त्यांची काळजी घेत पर्यावरणाबद्दल जबाबदारीची भावना कळावी.…
जव्हार प्रतिनिधी, १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सिल्वर मेडल, ज्ञानराज इंग्लिश मिडीयम स्कूल,आळे,ता.जुन्नर,जि.पुणे येथे शिक्षण घेत असलेल्या ८ वीचा विद्यार्थी कु.भाग्येश संतोष रजपुत याने इंटरनॅशनल इंडो-नेपाळ स्पोर्ट्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये १०० मी.धावण्याच्या शर्यतीत उल्लेखनीय कामगिरी करत सिल्वर मेडल पटकावले आहे.या उल्लेखनीय यशासाठी भाग्येशला त्याचे आई-वडील, शाळेचे मुख्याध्यापक, प्रशिक्षक व शिक्षकवृंद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कठोर मेहनत,सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर त्याने हे यश मिळवले आहे. या यशामुळे त्याचे जव्हार तालुक्यातील ग्रामस्थ,शिक्षक, मित्रमंडळी व कुटुंबीयांनी मनःपूर्वक अभिनंदन केले असून,भाग्येश हा भविष्यातील एक आशादायक खेळाडू म्हणून पुढे येतो आहे, याबाबत संपूर्ण परिसरात अभिमान व्यक्त होत आहे.समस्त ग्रामस्थ जव्हार यांच्यातर्फे कु.भाग्येश रजपुत याचे मनःपूर्वक…
