जव्हार प्रतिनिधी,
१०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सिल्वर मेडल,
ज्ञानराज इंग्लिश मिडीयम स्कूल,आळे,ता.जुन्नर,जि.पुणे येथे शिक्षण घेत असलेल्या ८ वीचा विद्यार्थी कु.भाग्येश संतोष रजपुत याने इंटरनॅशनल इंडो-नेपाळ स्पोर्ट्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये १०० मी.धावण्याच्या शर्यतीत उल्लेखनीय कामगिरी करत सिल्वर मेडल पटकावले आहे.या उल्लेखनीय यशासाठी भाग्येशला त्याचे आई-वडील, शाळेचे मुख्याध्यापक, प्रशिक्षक व शिक्षकवृंद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कठोर मेहनत,सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर त्याने हे यश मिळवले आहे.
या यशामुळे त्याचे जव्हार तालुक्यातील ग्रामस्थ,शिक्षक, मित्रमंडळी व कुटुंबीयांनी मनःपूर्वक अभिनंदन केले असून,भाग्येश हा भविष्यातील एक आशादायक खेळाडू म्हणून पुढे येतो आहे, याबाबत संपूर्ण परिसरात अभिमान व्यक्त होत आहे.समस्त ग्रामस्थ जव्हार यांच्यातर्फे कु.भाग्येश रजपुत याचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून,त्याच्या पुढील वाटचालीसाठी यशस्वी व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

