नदीम शेख,पालघर
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्ह्यात भव्य वृक्षारोपण मोहीम,
खावडा ट्रान्समिशन प्रकल्पातर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पालघर जिल्ह्यात महत्त्वपूर्ण पर्यावरणीय उपक्रम राबवण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.हा उपक्रम पर्यावरणीय शाश्वततेबाबतच्या प्रकल्पाच्या कटिबद्धतेचे निदर्शक आहे, जो भारताच्या वीज प्रेषण पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या त्यांच्या मुख्य उद्दिष्टासोबत असा सुसंगत आहे.
या वृक्षारोपण मोहिमेत स्थानिक समुदायांचा, विशेषतः शालेय विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.ज्यामुळे पर्यावरण संवर्धनाबाबत सामायिक जबाबदारीची भावना निर्माण झाली.विक्रमगड तालुक्यातील उटवली गावाच्या आदर्श विद्यालयात १०० रोपांची लागवड करण्यात आली, ज्यामध्ये ३० विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी झाले.विद्यार्थ्यांना रोपे देखील देण्यात आली. जेणेकरून त्यांनी त्यांची काळजी घेत पर्यावरणाबद्दल जबाबदारीची भावना कळावी.
जव्हार तालुक्यातील डेहरे गावात शेतकऱ्यांच्या जमिनीवर ३० रोपे लावण्यात आली,ज्यामुळे स्थानिक हरित पट्टा वाढण्यास आणि कृषी समुदायास मदत झाली. त्याशिवाय विक्रमगडमधील टाटा स्टोअर्स जवळ व कुर्झे उपकेंद्र येथे ५० रोपे लावण्यात आली.
खावडा ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड, ही एक विशेष उद्दिष्टासाठी स्थापन केलेली संस्था असून,महाराष्ट्राच्या वीजेची मागणी पूर्ण करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे.सदर कंपनी पालघर आणि ठाणे जिल्ह्यांतून जवळपास १६० कि.मी.लांबीच्या ट्रान्समिशन लाईनचे बांधकाम करत आहे, ज्यामध्ये जव्हार, वाडा, विक्रमगड आणि भिवंडी या तालुक्यांचा समावेश आहे.

