दीपक मोहिते,
सुखद दिन,
आजच्या दिवशी शिवाजी महाराज छत्रपती झाले.
६ जून १६७४ रोजी महाराष्ट्रातील रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा छत्रपती म्हणून औपचारिक राज्याभिषेक झाला.हिंदवी स्वराज्याचे प्रणेते व थोर मराठा योद्धा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त राज्यभरात शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो.याच दिनी भारतात हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.
छत्रपती शिवाजी महाराज,हे महाराष्ट्राचेच नव्हे तर अखिल भारतवर्षाचे प्रेरणास्थान आहेत.राष्ट्र निर्माता असलेल्या या महापुरुषाच्या, लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजे ६ जून १६७४ म्हणजेच राज्याभिषेक दिन होय.हे रयतेचे राज्य शाश्वत चिरंतन रहावे,म्हणून महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला व शिवाजी महाराज,छत्रपती झाले,याच दिवशी स्वराज्याचे सार्वभौमत्व दुर्ग रायगडाच्या सदरेवरून घोषित झाले.याच दिवशी श्री शिवराज्यभिषेक शकाची निर्मिती करून महाराज शककर्ते झाले,तो हा शुभ दिन. महाराजांनी तत्कालीन प्रस्थापित सत्तांना पालथे करून स्वतःच्या सार्वभौम स्वराज्याचा पवित्र मंगल कलश जनतेला अर्पण केला व रयतेची झोळी सुख समृद्धीने भरली,असा हा पवित्र दिवस.या मंगल व पवित्र दिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा,

