- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- राज्य सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा…
- रितिका चोप्रा यांच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच….
- येणाऱ्या काळात खा. सुनील तटकरे यांची अग्निपरीक्षा,
- उत्तर प्रदेशात काँग्रेस, सपासोबत लढणार कि भाजपशी थेट भिडणार ?
- भाजपच्या कार्यकर्त्याकडून वसुलीच्या कामाना वेग,
- महाराष्ट्रात लवकरच समान नागरी कायदा लागू होणार,
- दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करा – विरोधी पक्ष नेते मनोज पाटील,
- उशीरा का होईना, मुख्यमंत्री फडणवीस अखेर शेतीच्या बांधावर आले…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात १३८ टक्क्यांनी वाढ,मग देशात दररोज सरासरी ८० शेतकरी आत्महत्या का करताहेत ? गेल्या १० वर्षाच्या मोदी सरकारच्या राजवटीत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुपटीहुन अधिक वाढ झाल्याचा दावा निती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी केला आहे. हे उत्पन्न १३८ टक्क्यांनी वाढले असल्याचे त्यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हंटले आहे. त्यांच्या या दाव्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.त्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी द्यायला हवी. राष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र व धोरण संशोधन केंद्राचे माजी संचालक रमेश चंद यांनी गेल्या १० वर्षात कृषी व संलग्न क्षेत्राने ४.४५ टक्के उत्पन्न वाढले व ही वाढ ऐतिहासिक अशी असून यापूर्वी कधीही इतकी वाढ झाली नव्हती, असा…
दीपक मोहिते, कांदा उत्पादक शेतकरी मरणासन्न अवस्थेत जीवन जगतोय, कांद्याच्या दरात यंदा झालेली प्रचंड घसरण कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आत्महत्येच्या दिशेने नेणारी ठरली आहे. राज्याच्या तमाम बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात प्रचंड घसरण सुरू झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. मात्र त्याला या अस्मानी संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारकडून कोणतीही हालचाल होत असल्याचे पाहायला मिळत नाही. निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. निर्यातीवर बंदी येण्यापूर्वी कांद्याला प्रति क्विंटल साडेचार हजार रु.दर मिळत होता. आज त्याच कांद्याला प्रति क्विंटल एक हजार रु.दर मिळत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यापेक्षा कांदा खाणाऱ्या ग्राहकांची संख्या असल्यामुळे सरकार केवळ त्यांच्या मताचा विचार करते. पण आता सरकारच्या दिशाहीन…
दीपक मोहिते, घराणेशाहीचे भयावह वास्तव ; खासदार, आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमावस्थेत, ” हल्लाबोल,” अजित पवार यांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या घमासान सुरू झाले आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार व मुलगा पार्थ पवार विरुद्ध सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल असा फड रंगला आहे. गेल्या २९ एप्रिल रोजी निवडणूक आयोगाला सादर केलेले पत्र निवडणूक आयोगाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्यानंतर वादाला तोंड फुटले असून अंतर्गत घमासान सुरू झाले आहे. या पत्रात सुनील तटकरे यांचा सरचिटणीस व प्रफुल्ल पटेल यांचा कार्याध्यक्ष म्हणून उल्लेखच करणे, टाळण्यात आले आहे. तसेच या दोघांना दिल्लीतील पक्ष कार्यालयात प्रवेशबंदी करण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यामुळे हा…
दीपक मोहिते, आखाती देशातील युद्ध ; परिस्थिती हाताबाहेर चालली आहे, इराण व अमेरिका / इस्त्रायल युद्धात आता युद्धविराम होण्याची शक्यता दुरावली आहे.दोन्ही बाजूकडून ताठर भूमिका सोडण्याची शक्यता नसल्यामुळे संपूर्ण जग आता तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत ढकलले जाणार आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या हट्टाला पेटले असून कोणत्याही परिस्थितीमध्ये आता समझोता नाही,अशा निर्णयाप्रत ते आले आहेत,तर दुसरीकडे आम्ही उध्वस्त झालो तरी बेहत्तर, पण आम्ही शरण जाणार नाही,असे इराणने जाहीर केले आहे.त्यांच्या या भूमिकेमुळे अवघे जग आता चिंतेत सापडले आहे.इराणने होर्मुझ खाडीतून होणारी तेलाची वाहतूक रोखल्यामुळे जगावर ऊर्जेचे संकट घोंगावू लागले आहे.या युद्धात नाटो संघटनेतील देशानी अलिप्ततावादी धोरण स्विकारल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी ” युद्धानंतर…
दीपक मोहिते, ” आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे,” मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर ; खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार…. आगामी मान्सूनच्या लवकर आगमनाची बातमी शेतकऱ्यांसाठी आनंदाची ठरली आहे. यंदा वेळेआधीच मान्सून अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे. ” स्कायमेट,” ने जाहीर केलेल्या अंदाजानुसार, मान्सून लवकरच अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते विषुववृत्तीय प्रदेशाजवळ आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पश्चिम भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. राज्यात सध्या कडक उन्हाळा आणि उकाडा जाणवत असतानाच हवामान खात्याकडून एक दिलासा देणारी बातमी प्रसिद्ध झाली आहे. यंदाचा मान्सून अंदमानात वेळेच्या आधीच दाखल होण्याची शक्यता आहे. खाजगी हवामान संस्था ” स्कायमेट,” च्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण…
दीपक मोहिते, सूर्यातीर, ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज, २०१४ साली केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपने देशभरात रस्तेबांधणी,रेल्वे व अन्य पायाभूत सोयी- सुविधांवर ( उड्डाणपूल,मेट्रो,वेगवान रेल्वे व आता बुलेट ट्रेन ) लक्ष केंद्रित केले आहे. या काळात केंद्रीय रस्ते बांधणी व विकास खात्याची जबाबदारी पेलणाऱ्या नितीन गडकरी यांनी रस्त्याचे जाळे विणले. ग्रामीण भाग व शहरांना एकमेकांशी जोडण्यासाठी समृद्धी,द्रुतगती व कोस्टल रोड,इ. योजना राबवण्यास सुरुवात केली. यामध्ये त्यांना भरीव यश देखील प्राप्त झाले.त्यांचे मंत्रालय व राज्य सरकारचे सार्वजनिक बांधकाम / रस्ते विकास महामंडळ यांच्या संयुक्त प्रयत्नातून ठाणे,नाशिक,अकोला यवतमाळ, नागपूर व अन्य शहरे एकमेकांशी जोडली गेली. एकेकाळी रस्ते…
दीपक मोहिते, फ्रंटलाईन, भारतीय संविधानाचे देशाच्या विकासात मोठे योगदान, गेल्या वर्षी आपण भारतीय संविधानाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे केले. ब्रिटिश साम्राज्याच्या जोखडातून मुक्ती मिळाल्याचा आनंद व संविधान अमलबजावणीचा उत्सव म्हणून दरवर्षी हा दिवस आपण साजरा करत असतो. १५ ऑगस्ट १९४७ साली आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोन वर्षानंतर देशाच्या संविधान समितीने २६ नोव्हें.१९४९ साली संविधानाचा मसुदा स्विकारला व २६ जाने.१९५० रोजी आपले संविधान अमलात आले. स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आपल्याला स्वतःचे असे संविधान नव्हते. १५ ऑगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या १४ दिवसात २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसुदा समिती स्थापन करण्यात आली. या…
दीपक मोहिते, मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात, पालघर जिल्ह्यात शेतीची कामे सुरू होईस्तोवर ग्रामीण भागातील आदिवासी विविध क्षेत्रात काम करून रोजगार मिळवत असतो. लाकडाच्या मोळ्या,रानभाज्या व फळे विक्री करून आदिवासी समाज आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात.पावसाळ्यानंतर या आदिवासी मजुरांच्या हाताला काम नसते. त्यामुळे तो शहरी भागात स्थलांतर करत असतो.बांधकाम क्षेत्रात बऱ्यापैकी आर्थिक आवक होत असल्यामुळे तो या क्षेत्रात स्थिरावतो. या मजुरांच्या हाताला आपल्या परिसरात काम मिळावे, यासाठी सुरू करण्यात आलेल्या मनरेगामध्ये अधिकाऱ्यांच्या अनागोंदी व भ्रष्ट कारभारामुळे आदिवासी हल्ली या कामावर यायला तयार नसतात. ग्रामीण भागातील नागरीक, शेती, मनरेगा व वाड्यावर मजूर म्हणून काम करत दिवसाकाठी २०० ते २५० रु.कमवतात.…
दीपक मोहिते, फ्रंटलाईन – संपादकीय लेख, प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक…. देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळात अनेक निवडणुका पार पडल्या, सत्तेच्या या रणधुमाळीत अनेक पक्ष नव्याने सामील झाले तर अनेक पक्षांची वाताहात झाली. आजच्या घडीला अस्तित्वात असलेल्या पक्षांची संख्या लक्षात घेता,” पायलीला पन्नास, ” असं वर्णन केल्यास ते चुकीचे ठरु नये. प्रादेशिक पक्षाची झालेली वाढ व त्यांना सोबत घेतल्याशिवाय ” सत्तेची पाऊलवाट, ” सापडत नाही,अशी स्थिती सध्या आपल्या देशात निर्माण झाली आहे. सन १९९० च्या दरम्यान प्रादेशिक पक्षांच्या संख्येत वाढ होत गेली.तत्पुर्वी अकाली दल, डीएमके, अण्णाडीएमके,शिवसेना,तेलगू देशम व ईशान्येकडील काही राज्यात प्रादेशिक पक्ष सक्रिय होते. आज ही संख्या दुपट्टीने…
दीपक मोहिते, बॉटमलाईन, अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली, इराण व अमेरिका – इस्त्रायल यांच्यामध्ये सध्या युद्धविराम झाला असला तरी या युद्धात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चांगलीच नाचक्की झाली आहे. इराण हा अमेरिकेच्या तुलनेत अतिशय लहान देश असताना त्यांनी अमेरिका व इस्रायलची दादागिरी झुगारून लावली.” आम्ही मरण पत्करू, पण मान झुकवणार नाही,” अशी भूमिका इराणने घेतली व त्यांचा प्रत्येक हल्ला यशस्वीपणे परतवून लावला. इराणने गेल्या काही वर्षात जी काही लष्करी तयारी केली,त्याचा थांगपत्ता त्यांनी अमेरिकेच्या सीआयए व इस्रायलच्या मोसाद या नावाजलेल्या गुप्तहेर संस्थांना लागू दिला नाही.त्यामुळे दोघांचे अतोनात नुकसान झाले.लष्काराच्या वाढीव खर्चासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना आता काँग्रेससमोर जावे लागणार आहे.पण…
